दोन प्रवासी अरण्यातून प्रवास करीत असता त्यांनी एक गाढव पाहिले मग ते गाढव कोणी घ्यावे याविषयी त्या दोघांचे भांडण सुरू झाले. काही वेळाने ते भांडण इतके वाढले की, त्या दोघांची गुद्दा-गुद्दी सुरू झाली व ते एकमेकांना लाथाबुक्क्याही मारू लागले ही त्यांची मारामारी पहात गाढव बराच वेळ शांतपणे उभे राहिले व ते दोघेही अगदी थकून गेले असे पाहताच हळूच निघून गेले.
तात्पर्य - दोघांचे भांडण तिसर्याचा लाभ.