एका मोराने बगळ्याला पाहून आपला सुंदर पिसारा फुलवला व हा कोणी फालतू प्राणी आहे असे मनात आणून त्याला तो आपल्या रंगीत पिसार्याचे सौंदर्य दाखवू लागला. त्याचा गर्व कमी व्हावा म्हणून बगळा त्याला म्हणाला, 'अरे, सुंदर पिसं हे तुझ्या मोठेपणाचे लक्षण असतं तर तुमची जात श्रेष्ठ आहे हे मी कबूल केलं असतं, पण मला वाटतं जमिनीवर चालून खेळ खेळण्यात, अन् नाचण्यापेक्षा आकाशात फिरण्याची शक्ती असणं हेच खरं मोठेपणाचं आहे !'
तात्पर्य - आपल्या अंगी असलेला गुण दुसर्याजवळ नसला म्हणजे त्याला हिणवावे असे जर असेल तर दुसर्याजवळच्या गुणासाठी त्याने आपल्याला का हिणवू नये ? सगळेच गुण एकाच माणसाजवळ असतात असे नाही म्हणून कोणी कोणास हिणवू नये.