एका माणसाचा नोकर महामूर्ख होता. त्याला तो माणूस सारखा, 'तू मूर्खांचा राजा आहेस.' असे म्हणत असे. एकदा तो याप्रमाणे बोलत असता तो नोकर संतापून त्याला म्हणाला, 'तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी खरोखरच सगळ्या मूर्खांचा राजा झालो तर फार बरं होईल, कारण मग जगातले तुमच्यासारखे सगळे लोक माझे प्रजानन होतील.'
तात्पर्य - वस्तुतः जगातले सगळेच लोक मूर्ख असतात, पण जो कमी मूर्ख असेल तो स्वतःला मोठा शहाणा समजतो इतकेच.