प्राणी, पक्षी व मासे

इसापने रचलेल्या गोष्टी केवळ उपदेशपर नसून अत्यंत रंजक आहेत.

Many stories included in Aesop's Fables, are distinguished by its own special characteristics and moral.


प्राणी, पक्षी व मासे

एकदा प्राणी व पक्षी यांची लढाई व्हायची होती. त्यावेळी मासे व प्राणी यांचा असा तह झाला, की माशांनी पक्ष्याविरुद्ध प्राण्यांना मदत करावी. पुढे लवकरच लढाई सुरू झाली. पण त्यावेळी माशांनी असा निरोप पाठविला की जमिनीवर येऊन लढण्यास आम्ही समर्थ नाही.

तात्पर्य - साहाय्य मिळावे म्हणून ज्यांच्याशी आपण मैत्री करतो त्यांच्याकडून आपल्याला किती साहाय्य मिळेल याचा विस्तार आधीच करावा. म्हणजे ऐनवेळी फजिती व्हायला नको.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-01-10T06:29:17.0170000