१) पूजेचे स्थान स्वच्छ करून घ्यावे.
२) जेथे पूजनासाठी चौरंग ( वा पाट ) मांडायचा आहे त्या जागी रांगोळीने एक स्वस्तिक काढावे. मग चौरंग ( वा पाट ) मांडून त्याभोवती सुरेख रांगोळी काढावी.
३) चौरंगावर पिवळे कोरे वस्त्र घालावे.
४) त्या वस्त्राच्छादित चौरंगावर श्रीसंतोषी मातेची तसबीर ठेवावी. ती तसबीर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
५) चौरंगावर आपल्या उजव्या बाजुस थोड्या पिवळ्या अक्षता ठेवून त्यावर गणपतीपूजनासाठी ( गणपतीचे प्रतीक म्हणून) एक सुपारी ठेवावी.
६) देवीच्या तसबिरीची पूजा करता येईल. अशा प्रकारे चौरंगावर थोडे तांदूळ पसरून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवावा. त्यात अष्टगंध, हळद-कुंकू, अक्षता व फूल घालावे . त्याच्या मुखावर आंब्याच्या पानांच्या एक डहाळ ठेवावा. मग त्या तांब्यावर एक ताम्हन ठेवावे. त्या ताम्हनात गुळाचा एक खडा चणे ठेवावा. चौरंगावर मातेसमोर एक नारळ ठेवावा.
७) चौरंगावर डाव्या बाजूस एक घंटा ठेवावी. चौरंगावर उदबत्ती, निरांजन, नैवेद्य, विडा व दक्षिणा ठेवण्यास पुरेशी जागा असावी. पूजेचे साहित्य तबकात आपल्या उजव्या हातास ठेवावे.
८) समई प्रदीप्त करून चौरंगाच्या शेजारी आपल्या डाव्या बाजूस थोडी मागे ठेवावी.
९) स्वतःला बसण्यासाठी एक आसन मांडावे.