आत्मलिंग चंद्रशेखराची आरती
श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा
आरती चंद्रशेखराची पन्नग भूषण रायासी,
रविशशी झळकती दोन बाजू फणीवर मस्तक विराजी ॥धृo॥
निश्चित लाल अंगकान्ती, दर्शने होय जीवा शान्ती,
अभ्यंतरी नीर वाटे श्लेष्मता उपरी बहु लोटे ॥१॥
पुजिता स्थूल लघु कोठे पूजनी हर्षशान्त चिंतास,
जपे करण्यास मोदचिंतास भक्ती दे अखंडचरणासी, पन्नग भूषण रायासी ॥२॥
मयुरेश्वरा प्राप्त होसी प्रेमादरे पूजिले तुजसी,
भगवद्गीता पाठ करीसी भजनी दंग अर्हनिसी ॥३॥
कीर्तनी बोधामृत पाजी गायने, श्रोत्रृवृंदासी तवकृपेहोसी संन्यासी,
अक्षय पदास जन्मनच दास आत्मस्वरुपास,
शिवलोकास कलेवर प्रभूच्या चरणासी, पन्नग भूषण रायासी ॥४॥
मयुरात्मजे पुजियेला, शिवाच्या ध्यानी रत झाला,
अंती रामवेद वदिला, सूताच्या स्वाधीन हो केला ॥५॥
कुष्णे पुजूनी हो तुजला, प्रेम रची आरतीला,
मर्त्य देह त्यागियेला, अंती रमे वहिला ॥६॥
लागो अम्हास हाच ध्यास कृष्ण सूतास दे अम्हा आशिष भक्ती दे,
तुझीया चरणासी कीर्ती वाढो वंशाची ॥७॥
कार्तिक शुध्द एकादशी
१९५२
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP