श्री. मयुरानंद धारामृत - पारायण पध्दत
श्री. मयुरानंद सरस्वती उमराळे चरित्रगाथा
हा लेख श्री स्वामी मयुरेश कृपेने मंत्रगर्भ झाला आहे. तो गद्यात्मक लेख वस्तुत: गद्याध्यायच आहे. परंतु पारायण पध्दतीने याचे पठण करता यावे म्हणून श्री स्वामी समर्थ कृपेने सोबत पद्यमय स्वरुपात देत आहो. श्री स्वामी समर्थ स्वरुप, श्री गणेश, श्री शिव, श्री शक्ती व श्रीराम - पंचायतन अधिष्ठित आहेत, तेव्हा कोणत्याही देवतेच्या उपासकाने याचे पारायण करण्यास हरकत नाही. स्त्री आदी सर्वांस या पारायणाची मुभा आहे. दिन-शुध्दी पाहून पारायणास आरंभ करावा. पारायणाचा काल साधकाने संकल्पीत करावा. आवश्यक आन्हिक करुन `ब्रह्मरुपाय विद्महे, परब्रह्माय धीमही तन्नो स्वामी प्रचोदयात्' या गायत्रीचा किमान ११ आदीअंती जप करावा. ज्यांना गायत्रीचा अधिकार नाही, त्यांनी नमाम्यहम् दिव्यरुपं जगतानंद दायकं, महायोगेश्वरं वंदे ब्रह्मा विष्णू महेश्वरम्, शक्तीं गणपतिं चैव सर्व देवमयं अहम् ॥
या श्लोकाचा आदीअंती ११ वेळा जप करावा. पारायणाच्या प्रारंभी व शेवटी श्रीस्वामी कृपातीर्थ तारक मंत्र अवश्य म्हणून तीर्थ घ्यावे. पारायण समाप्तीचे दिवशी ब्राह्मण सुवासिनी भोजन व दक्षिणा द्यावी किंवा येणार्या अतिथीला भोजन व दक्षिणा द्यावी. समाप्तीचे दिवशी अतिथी विन्मुख पाठवू नये. माध्यान्हीनंतर केव्हाही सायंकाल पर्यंत अतिथीस प्रसाद द्यावा. इति शुभम् पर्यंत अध्याय वाचावा. पारायणाचे समाप्तीस नैवेद्यांत बेसन लाडू किंवा क्षिप्रा (गव्हाची गूळ मिश्रित खीर, यांत वेलची जास्त असावी) व पालेभाजी अवश्य असावी. परिस्थितीनुरुप नैवेद्य करावा. श्री स्वामी दृष्टांत देतील अगर कामना पूर्ण करतील. गाणगापूराहून येणार्या स्त्रीस स्वामींनी नैवेद्यास हे पदार्थ करण्यास सांगितले होते. ज्यांना नैवेद्याही करणे अशक्य असेल त्याने ३ पाठ जास्त करावेत.
N/A
References : N/A
Last Updated : March 27, 2024
TOP