कपालभाती
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
कपालभाती
(कपाल म्हणजे कवटी; भाती म्हणजे प्रकाश,) तेजोक्रिया, हा भस्त्रिका प्राणायामाचा सौम्य प्रकार आहे. कपालभातीमध्ये पूरक संथ असतो, पण रेचक जोराचा असतो. प्रत्येक रेचकानंतर निमिषमात्र कुंभक असतो. भस्त्रिका जर त्रासदायक वाटू लागली, तर तिच्याऐवजी कपालभातीची काही आवर्तने करावी. कपालभाती पूर्ण झाल्यावर शवासनात पडून राहा. (चित्र क्र.५९२)
परिणाम
भस्त्रिका व कपालभाती या दोन्हीमुळे यकृत, प्लीहा, स्वादुपिंड व पोटाचे स्नायू यांचे चलनवलन होऊन त्यांना जोम लाभतो. त्यामुळे पचन सुधारते, नासिकामार्ग कोरडा होतो, डोळ्यांना थंडावा व एकूण आल्हाद वाटतो.
इशारा
१. आगगाडीच्या इंजिनात ज्याप्रमाणे गाडी ओढणारी वाफ निर्माण करण्यासाठी कोळसा फार टाकला तरे इंजिनाचा बाँयलर जळून जातो, त्याचप्रमाणे भस्त्रिकेतील श्वसन जोरदार असल्यामुळे भस्त्रिकेची क्रिया फार वेळ केली, तर सबंध यंत्रणेची हानी होते.
२. दुबळी शरीरयंत्रणा व फुफ्फुसांची मर्यादित पोकळी असणार्या व्यक्तींनी भस्त्रिका किंवा कपालभाती करु नये.
३. कानाच्या किंवा डोळयाच्या तक्रारी (कानात पू, निसटलेले नेत्रपटल किंवा ग्लाँकोमा) असलेल्या व्यक्तीनीही हे दोन्ही प्राणायाम करु नयेत.
४. तीव्र किंवा कमी रक्तदाब असणारांनीही ते करु नयेत.
५. नाकातून रक्त येऊ लागले किंवा कानात धडधड व वेदना होऊ लागल्या तर ताबडतोब भस्त्रिका किंवा कपालभाती थांबवावी.
६. काही काळ हे दोन्ही प्रकार करण्याचे थांबवावे.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP