नाडीशोधन प्राणायाम
‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.
प्राण किंवा शक्ती यांच्या अभिसरणासाठी रक्तवाहिनीप्रमाणे नलिकेसारखे जे अवयव शरीरात असतात त्यांना नाडी असे म्हणतात. वेष्टित तारेप्रमाणे नाडीला वेष्टणाचे तीन थर असतात. सगळ्यात आतल्या थराला ‘शिरा’, मधल्या थराला ‘दमनी’, आणि बाहेरच्या थराला व सर्वच अवयवाला ‘नाडी’ म्हणतात. शोधन म्हणजे शुध्दीकरण, स्वच्छ करणे. त्याचप्रमाणे नाडीशोधन प्राणायाम हा नाडया शुध्द करण्यासाठी असतो. पाण्याच्या नळात छोटासा अडथळा आला तरी पाण्याचा पुरवठा पूर्णपणे थांबू शकतो. नाडयांमध्येही असा बारीकसा अडथळा आल्यास अतिशय त्रास होणे आणि एखादा अवयव किंवा इंद्रिय लुळे पडणे शक्य असते.
पध्दती
१. सूर्यभेदन प्राणायामात क्र. १ ते ८ या परिच्छेदांमध्ये दिलेल्या पध्दतीचे अनुसरण करा. (चित्र क्र.५९९)
२. उजव्या नाकपुडीतून श्वास सोडून फुफ्फुसे पूर्णपणे मोकळी करा. उजव्या आंगठयाच्या आतल्या - (नखापासून दूरच्या) बाजूने उजवी नाकपुडी निय़ंत्रित करा.
३. आता संथ, स्थिर आणि दीर्घ श्वास उजव्या नाकपुडीतून आत घ्या. उजव्या आंगठयाच्या टोकाच्या नखाजवळच्या भागाने नाकपुडीच्या छिद्रावर नियंत्रण ठेवा. फुफ्फुसे पूर्णपणे भरुन घ्या. (पूरक) श्वास घेत असताना डावी नाकपुडी अनामिका व करंगळी यांनी पूर्णपणे बंद केलेली असते.
४. पूर्ण पूरकानंतर आंगठयाच्या दाबाने उजवी नाकपुडी पूर्णपणे बंद करा आणि डाव्या नाकपुडीवरचा अनामिका व करंगळी यांचा दाब काढून घ्या. डाव्या नाकपुडीच्या बाहेरच्या कडेवर ती बोटे आता अशा तर्हेने ठेवा की ती कड विभाजकाशी समांतर राहील. डाव्या नाकपुडीमधून संथ, स्थिर व दीर्घ रेचक करा. फुफ्फुसे पूर्णपणे रिकामी करा. (रेचक) अनामिका व करंगळी यांच्या टोकांच्या नखांजवळील भागाचा दाब नाकपुडीवर राहील.
६. आता डाव्या नाकपुडीने संथ स्थिर व दीर्घ पूरक करुन फुफ्फुसे पूर्णपणे भरुन टाका.
७. डाव्या नाकपुडीने पूर्ण पूरक केल्यावर ती बंद करा व वरील परिच्छेद क्र. २ मध्ये सांगितल्याप्रमाणे उजव्या नाकपुडीवरील उजव्या आंगठयाचा दाब योग्य तेवढा ठेवून उजव्या नाकपुडीने रेचक करा.
८. येथे नाडीशोधन प्राणायामाचे एक आवर्तन पूर्ण होते. येथे श्वसनाची लय पुढीलप्रमाणे असते.
८.१ उजव्या नाकपुडीने रेचक,
८.२ उजव्या नाकपुडीने पूरक,
८.३ डाव्या नाकपुडीने रेचक,
८.४ डाव्या नाकपुडीने पूरक,
८.५ उजव्या नाकपुडीने रेचक,
८.६ उजव्या नाकपुडीने पूरक,
८.७ डाव्या नाकपुडीने रेचक,
८.८ डाव्या नाकपुडीने पूरक,
८.९ उजव्या नाकपुडीने रेचक,
८.१० उजव्या नाकपुडीने पूरक .... अशाच क्रमाने पुढे चालू.
वरिलपैकी (अ) टप्पा पूर्वतयारीचा आहे. नाडीशोधन प्राणायामाच्या पहिल्या खर्या आवर्तनाला सुरुवात (आ) टप्प्यापासून होऊन ते (उ) टप्प्याशी पूर्ण होते. दुसरे आवर्तन (ऊ) टप्प्याशी होऊन (ओ) टप्प्यापाशी संपते. धाप लागणे, श्वास अडणे व हृदयावरील ताण टाळण्यासाठी (औ) हा टप्पा आवर्तन संपल्यावर सुरक्षिततेचा उपाय म्हणून करायचा असतो.
९. वर वर्णन केल्याप्रमाणे ८ ते १० आवर्तने सलगपणे करा. याला सुमारे ६ ते ८ मिनिटे लागतील.
१०. प्रत्येक बाजूकडील पूरक व रेचक यांना सारखाच वेळ लागायला हवा. सुरुवातीला हा अवधी कमीजास्त असेल. परंतु समतोल साधेपर्यंत चिकाटीने प्रयत्न करा.
११. कोणत्याही बाजूंकडील पूरक व रेचक यांना समान अवधी व अचूकपणा यांवर ताबा मिळाला म्हणजे श्वास आत घेतल्यावर तो रोधण्याचा आंतर-कुंभक करण्याचा प्रयत्न सुरु करावा.
१२. हा अचूकपणा दीर्घकाळ अभ्यास केल्यानंतरच साधू शकतो.
१३. कुंभकामुळे पूरक आणि रेचक यांची लयबध्दता आणि समतोलपणा ही बिघडता कामा नये. यापैकी एकामध्येही दोष निर्माण होऊ लागला तर कुंभकाचा अवधी कमी करा किंवा एका आवर्तनाआडच्या आवर्तनात कुंभक करा.
१४. आंतरकुंभाच्या वेळी मूलबंध करा. (पृष्ठ २४३ पाहा.)
१५. आंतरकुंभकामध्ये प्रावीण्य मिळण्यापूर्वी बाह्य कुंभके (चित्र क्र.६००) करण्याचा प्रयत्न करु नका. बाह्य कुंभक करताना मूलबंधासह (पाहा पृष्ठ २४३) उड्डियान (चित्र क्र.५९३, ५९४) करा.
१६. कुंभक आणि पूरक व रेचक यांच्या अवधीतील वाढ या गोष्टी अनुभवी गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि त्याच्या साहाय्याने कराव्या.
१७. प्राणायामाच्या अखेरीस नेहमीच शवासन (चित्र क्र.५९२) करीत जा.
परिणाम
नेहमीच्या श्वसनापेक्षा नाडीशोधन प्राणायामामध्ये रक्ताला आँक्सिजनचा पुरवठा अधिक होतो. त्यामुळे ताजेतवानेपणा वाटतो व मज्जा शांत व शुध्द बनतात. मन स्वस्थ आणि नितळ बनते.
टीप - प्रारंभीच्या काळात शरीराला घाम व कंप सुटतो आणि मांडया व हात यांच्या स्नायूंना ताण जाणवतो. असा ताण टाळावा.
इशारा
१. तीव्र रक्तदाब किंवा हृदयविकार असणार्या व्यक्तींनी कुंभक करण्याचा प्रयत्न कधीही करु नये. कुंभकविरहित नाडीशोधन प्राणायाम त्यांनी केल्यास तो लाभदायक होतो.
२. कमी रक्तदाब असलेल्यांनी प्राणायामाचा हा प्रकार फक्त आंतरकुंभकसहित केल्यासच त्यांना लाभदायक होईल.
N/A
References : N/A
Last Updated : September 12, 2020
TOP