मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य|स्कंध ८ वा| अध्याय १९ वा स्कंध ८ वा अष्टम स्कंधाचा सारांश अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा स्कंध ८ वा - अध्याय १९ वा सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य Tags : bhagavatpothiपोथीभागवत स्कंध ८ वा - अध्याय १९ वा Translation - भाषांतर १२२संतोषऊनि देव बोलले बळीसी । आदर तुजसी साजेसा हा ॥१॥शुक्रासम गुरु, प्रल्हाद पूर्वज । नकार ठाऊक नसे कुळीं ॥२॥संपत्ति वा युद्ध याचील जो जें जें । अर्पिलें तयातें पूर्वजांनीं ॥३॥शूर दानवीर होते त्वत्पूर्वज । प्रल्हाद तो चंद्र कुळामाजी ॥४॥प्रपितामह तो वीर हिरण्याक्ष । विष्णूही कौतुक करी त्याचें ॥५॥हिरण्यकशिपु धांवतां त्वेषानें । हृदयीं विष्णूनें केला वास ॥६॥वासुदेव म्हणे सन्निधचि देव । शोधितो हें विश्व परी अज्ञ ॥७॥१२३पिता तव विरोचन । उदारांत अग्रगण्य ॥१॥देव, आयुष्ययाचना । करितां, भय त्या वाटेना ॥२॥वैरी देवांतेंही निज । अर्पी औदार्ये आयुष्य ॥३॥राया, पूर्वजांसमान । वाटे उदार तूं पूर्ण ॥४॥मागतों मी मम पादें । तुज त्रिपाद भूमीतें ॥५॥मागूं कासया बहुत । देणें जरी तुज शक्य ॥६॥वासुदेव म्हणे ज्ञाते । घेती कारणापुरेसें ॥७॥१२४बळि म्हणे बाळा, बोलसी तें सत्य । बालभावें स्वार्थ न कळे तुज ॥१॥त्रैलोक्याधिपति तुष्ट मी तुजसी । काय इतुकेंचि मागसी हें ॥२॥पुनर्याचनेचा येवो न प्रसंग । ऐसें कांहीं माग मजसी बाळा ॥३॥वासुदेव म्हणे ऐकूनि वामन । अमृतवचन बोले ऐका ॥४॥१२५त्रैलोक्यींचे सर्व लाभतां विषय । कदाही न होय तृप्त मूढ ॥१॥सप्तद्वीपपति होते गय, वैन्य । परी संतोष न तेणें तयां ॥२॥यास्तव नृपाळा, मागितलें तेंचि । लाभतां मजसी परम सौख्य ॥३॥यदृच्छलाभें जो होतसे संतुष्ट । तोचि जगीं एक सौख्य पावे ॥४॥असंतोष अर्थ कामें तो संसार । जन्म-मरण मूळ असंतोष ॥५॥यदृच्छलाभें ज्या विप्रांसी संतोष । वाढे त्याचें तेज्ल, इतर नष्ट ॥६॥वासुदेव म्हणे हरीहूनि धूर्त । असे त्रैलोक्यांत अन्य कोण ॥७॥१२६ऐकूनि तें बळि हांसूनियां बोले । स्वीकारीं हवें जें तेंचि तुज ॥१॥उदक सोडाया सज्ज होतां, शुक्र । बोलले तयास हितेच्छेनें ॥२॥राया, अविचार वाटतो हा मज । पातला प्रत्यक्ष विष्णु येथें ॥३॥देवकार्यास्तव अवतार याचा । पुत्र अदितीचा होई देव ॥४॥हरुनि सर्वस्व अर्पील इंद्रातें । शरीर अवघें विश्व यासी ॥५॥त्रिपादें त्रैलोक्य व्यापील हा जाण । वचनही पूर्ण कैसें व्हावें ॥६॥वासुदेव म्हण दूरदृष्टि शुक्र । कथिती बळीस पुढील कर्म ॥७॥१२७एका पादें भूमि, अन्य पादें स्वर्ग । व्यापील हा नभ निजांगेंसी ॥१॥तृतीय ठेवावा चरण तो कोठें । म्हणतां वचनभंगें नरकलाभ ॥२॥निर्वावही जेणें अशक्य तें दान । कदाही स्तवी न ज्ञाता जाणें ॥३॥धर्म अर्थ काम कीर्ति कुटुंबांत । वांटी निज अर्थ तोचि सुखी ॥४॥।दिलें जें तें केंवी नाकारुं ? न म्हणें । असत्येंचि जाणें सत्याफल ॥५॥सत्य हेंचि पुष्प-फल या देहाचें । अनृतचि त्याचें मूळ परी ॥६॥वासुदेव म्हणे सत्यार्थ असत्य । रक्षावया शुक्र कथिती दैत्या ॥७॥१२८राया, सत्यही सदोष । गुण कांहीं असत्यांत ॥१॥देतों ऐसें म्हणतां कांहीं । दात्यासी न जगीं राही ॥२॥नाहीं नाहीं म्हणे त्यासी । जन आणूनियां देती ॥३॥परी ऐशा लाभास्तव । नसो नित्यचि असत्य ॥४॥नाहीं म्हणतांचि अकीर्ति । संभाविता मरण तेंचि ॥५॥परी प्राणरक्षणादि - । कार्यी, दोष न त्यामाजी ॥६॥वासुदेव म्हणे शुक्र । बोध करिती बळीस ॥७॥ N/A References : N/A Last Updated : December 01, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP