स्कंध ८ वा - अध्याय १४ वा
सर्वमतखंडन आणि ब्रह्मविद्यारहस्य
९२
परीक्षिति म्हणे कार्याची योजना । निवेदावी जाणा सकळ मुने ॥१॥
शुकमुनि तदा बोलती रायासी । अवतार जो युगीं तोचि श्रेष्ठ ॥२॥
पाळिताती आज्ञा सकळ तयाची । सद्धर्मप्रवृत्ति करिती ऋषि ॥३॥
मनोनिग्रहानें मनु रक्षी धर्म । प्रजांचें पालन करिती पुत्र ॥४॥
ऐश्वर्य भोगूनि वृष्टि करी इंद्र । ईशपदीं नम्र वासुदेव ॥५॥
९३
ऐसी व्यवस्था करुनि । पाळी ईश्वर अवनी ॥१॥
सनकादिक सिद्धरुप । धरुनि कथी ज्ञान ईश ॥२॥
याज्ञवल्क्यादिक कर्म । दाविताती आचरुन ॥३॥
दत्तात्रेयादिक रुपें । योग दावी तो जनांतें ॥४॥
होऊनियां मरीच्यादि । करी देव प्रजोत्त्पत्ति ॥५॥
रावरुपें वधी दुष्टां । कालरुपें पंचभूतां - ॥६॥
कोपवूनि, सर्व नाश । करी न कळे अज्ञांस ॥७॥
वासुदेव म्हणे ऐसें । केलें वर्णन कल्पाचें ॥८॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2019
TOP