अभंग - ६७८२ ते ६७८७
तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा.
हुंबरी.
====
॥६७८२॥
तुशीं कोण घाली हुंबरी । साही पांगल्या अठरा चारी सहस्त्र मुखावरी हरी । शेष शिणविलें ॥२॥
चेंडुवासवें घातली उडी । नाथिला काळिया देऊनी बुडी ॥३॥
अशुद्ध पीतां करुणा नाहीं । तुवां माउशी ही मारियेली ॥४॥
रावणाचें घर बुडविलें सारें । त्याचीं रांडा पोरें मारियेलीं ॥५॥
जाणो तो ठावा आहेसी आह्मां । तुवां आपुला मामा मारियेला ॥६॥
याशीं खेळतां नाश थोरु । तुकयास्वामी सारंगधरु ॥७॥
=======
हमामा.
====
॥६७८३॥
मशीं पोरा घे रे वार । तुझें बुजीन खालील द्वार ॥१॥
पोरा हमामा रे हमामा रे ॥२॥
मशीं हमामा तूं घालीं । पोरा वरी सांभाळीं खालीं ॥३॥
तरी च मशीं बोल । पोरा जिव्हाळ्याची ओल ॥४॥
मशीं घेतां भास । जीवा मीतूंपणा नास ॥५॥
मज सवें खरा । पण जाऊं नेदी घरा ॥६॥
आमुचिये रंगीं । दुजें तगेना ये संगीं ॥७॥
तुक्यासवें भास । हरी जीवा करी नास ॥८॥
॥६७८४॥
हमामा रे पोरा हमामा रे । हमामा घालितां ठकलें पोर । करी येरझार चौर्याशीची ॥१॥
पहिले पहारा रंगासी आलें । सोहं सोहं सें बार घेतलें ॥ देखोनि गडी तें विसरलें । डाई पडिले आपणचि ॥२॥
दुसर्या पहारा महा आनंदें । हमामा घाली छंदछंदें । दिस वाढे तों गोड वाटे । परि पुढें नेणे पोर काय होतें तें ॥३॥
तिसर्या पहारा घेतला बार । अहंपणें पाय न राहे स्थिर ॥ सोस सोस करितां डाई पडसी । सत्य जाणें हा निर्धार ॥४॥
चौथ्या पहारा हमामा । घालिसी कांपविसी हातपाय ॥ सुर्या पाटिलाचा पोर यम । त्याचे पडसील डाई ॥५॥
हमामा घालितां भ्याला तुका त्यानें सांडिली गडयाची सोई । यादवांचा मूल एक विठोबा त्यासवें चारितो गाई ॥६॥
====
कांडण.
====
॥६७८५॥
सिद्ध करुनियां ठेविलें कांडण । मज सांगतीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥
आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटींचा गे ॥२॥
सम तुकें घाव घालीं वो साजणी । मी तुज मिळणी जंव मिळें ॥३॥
एक कशी पांखडी दुसरी निवडी । नि:शेष तिसडी ओज करी ॥४॥
सरलें कांडण पाकसिद्धि करी । मेळवण क्षिरीसाकरेचें ॥५॥
उद्धव अक्रुर बंधु दोघेजण । बाप नारायण जेवणार ॥६॥
तुका ह्मणे मज माहेरी आवडी । ह्मणोनी तांतडी मूळ केलें ॥७॥
॥६७८६॥
सावडीं कांडण ओवी नारायण । निवडे आपण भूस सार ॥१॥
मुसळ आधारीं आवरुनी धरीं । सांवरोनी थिरीं घाव घाली ॥२॥
वाजती कांकणें अनुहात गजरें । छंद माहियेरे गाऊं गीति ॥३॥
कांडितां कांडण नव्हे भाग शीण । तुजमजपण निवडे तों ॥४॥
तुका ह्मणे रुप उमटे आरिसा । पाक त्या सरिसा शुद्ध झाला ॥५॥
====
आडसण दळण. अभंग.
====
॥६७८७॥
शुद्धीचें सारोनी भारियेली पाळी । भरडोनी वोंगळी नाम केलें ॥१॥
आडसोनी शुद्ध करीं वो साजणी । सिद्ध कां पापिणी नासियेलें ॥२॥
सुपीं तोंचि पाहें धड उगटिले । नव्हता नासिले जगझोडी सुपीं तोचि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥
सुपीं तोंचि संग घेई धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥५॥
सुपीं तोंचि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका ह्मणे ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2019
TOP