मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|तुकाराम बाबा अभंग संग्रह|आख्यानें| ६६८१ ते ६६९० आख्यानें ६६६४ ते ६६६७ ६६६८ ते ६६८० ६६८१ ते ६६९० ६६९१ ते ६७०० ६७०१ ते ६७१० ६७११ ते ६७२० ६७२१ ते ६७३० ६७३१ ते ६७४० ६७४१ ते ६७५० ६७५१ ते ६७६० ६७६१ ते ६७६७ ६७६८ ते ६७६९ ६७७० ते ६७७८ ६७७९ ते ६७८० ६७८२ ते ६७८७ ६७८८ ते ६७९८ ६७९९ ते ६८१७ ६८१८ ते ६८२९ ६८३० ते ६८६९ ६८७० ते ६९१४ ६९१५ ते ६९२४ ६९२५ ते ६९३० ६९३१ ते ६९३४ बाळक्रीडा - ६६८१ ते ६६९० तुकारामबाबा आणि त्यांचे शिष्य यांच्या अभंगांची गाथा. Tags : abhangmarathisanttukaramअभंगतुक्राराममराठीसंत बाळक्रीडा - ६६८१ ते ६६९० Translation - भाषांतर ॥६६८१॥नेणतियांसाठी नेणता लहान । थिंकोनी भोजन मागे माये ॥१॥माया दोनी यास बाप नारायणा । सारखी भावना तयांवरी ॥२॥तयांवरी त्याचा समचित्त भाव । देवकीवसुदेव नंद दोघे ॥३॥घेऊनियां एके ठायीं अवतार । एकी केला थोर वाढवूनी ॥४॥उणा पुरां यासी नाहीं कोणी ठाव । सारिखाचि देव अवघियांसी ॥५॥यांसी दोनी ठाव सारिखें अनंता । आधील मागुता वाढला तो ॥६॥वाढला तो सेवा भक्तिचिया गुणें । उपचारमिष्टानें करुनियां ॥७॥करुनी सायास मेळविलें धन । तेंही कृष्णार्पण केलें तिहीं ॥८॥कृष्णासी सकळ गाई घोडे ह्मैसी । समर्पिल्या दासी जिवें भावें ॥९॥जीवें भावें त्याची करितील सेवा न विसंबती नांवा क्षणभरी ॥१०॥क्षणभरी होतां वेगळा तयांस । होती कासावीस प्राण त्यांचे ॥११॥त्यांचे ध्यानीं मनीं सर्वभावें हरि । देह काम करी चित्त त्यापें ॥१२॥त्याचेंचि चिंतन कृष्ण कोठे गेला । कृष्ण हा जेविला नाहीं कृष्ण ॥१३॥कृष्ण आला घरा कृष्ण गेला दारा । कृष्ण हा सोयिरा भेटों कृष्णा ॥१४॥कृष्ण गातां ओंव्या दळणीं कांडणीं । कृष्ण हा भोजनीं पाचारिती ॥१५॥कृष्ण तयां ध्यानीं आसनीं शयनीं । कृष्ण देखे स्वप्नीं कृष्णरुप ॥१६॥कृष्ण त्यांस दिसे अभास दुश्चितां । धन्य मातापिता तुका ह्मणे ॥१७॥॥६६८२॥कृष्ण हा परिचारी कृष्ण हा वेव्हारी । कृष्ण घ्या वो नारी आणिकी ह्मणे ॥१॥ह्मणे कृष्णाविण कैसें तुह्मां गमे । विळ हा करमे वायांविण ॥२॥वांयांविण तुह्मी पिटितां चावटी । घ्या गे जगजेठी क्षणभरी ॥३॥क्षणभरी याच्या सुखाचा सोहळा । पहा एकवेळा घेऊनियां ॥४॥याचें सुख तुह्मां कळलियावरी । मग दारोदारीं न फिराल ॥५॥लटिकें हें तुह्मां वाटेल खेळणें । एका कृष्णेविना अवघेचि ॥६॥अवघ्यांचा तुह्मी टाकाल सांगात । घेऊनी अनंत जाल राना ॥७॥नावडे तुम्हांस आणीक बोलिलें । मग हें लागलें हरि ध्यान ॥८॥न करा हा मग या जिवा वेगळा । टोंकवाल बाळा आणिका ही ॥९॥आणिकां ही तुह्मां येती काकुलती । जवळी इच्छितीं क्षण बैसों ॥१०॥बैसों चला पाहों गोपाळाचें मुख । एकी एक सुख सांगतील ॥११॥सांगे जंव ऐसी मात दसवंती । तंव त्या धरिती चित्तीं बाळा ॥१२॥बाळा एकी घरा घेऊनियां जाती । नाहीं त्या परती तुका ह्मणे ॥१३॥॥६६८३॥तुका ह्मणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥याच्या मुखें नये डोळ्यासी वीट । राहिले हे नीट तटस्थचि ॥३॥ताटास्थ राहिलें सकळ शरीर । इंद्रियें व्यापार विसरलीं ॥४॥विसरल्या तान भूक घर दार । नाहीं हा विचार असों कोठें ॥५॥कोठें असों कोण झाला वेळ काळ । नाठवे सकळ विसरल्या ॥६॥विसरल्या आह्मी कोणीये जातीच्या । वर्णाही चहूंच्या एक झाल्या ॥७॥एक झाल्या तेव्हां कृष्णाचिया सुखें । नि:शंक भातुकें खेळतील ॥८॥खेळती भातुकें कृष्णाच्या सहित । नाहीं आशंकित चित्त त्यांचें ॥९॥चित्तीं तो गोविंद लटिकें दळण । करिती हें जन करी तैसें ॥१०॥जन करी तैसा खेळतील खेळ । अवघा गोपाळ करुनियां ॥११॥करिती आपला अवघा गोविंद । जना साच फंद लटिका त्या ॥१२॥त्यांनी केला हरि सासुरें माहेर । बंधुहे कुमर दीर भावे ॥१३॥भावना राहिली एकाचिये ठायीं । तुका ह्मणे पायीं गोविंदाचे ॥१४॥॥६६८४॥गोविंद भ्रतार गोविंद मुळहारी । नामें भेद परि एकचि तो ॥१॥एकाचींच नामें ठेवियेंली दोनी । कल्पितील मनीं यावें जावें ॥२॥जावे यावें तिही घरींचिया घरीं । तेथींची सिदोरी तेथें न्यावी ॥३॥विचारितां दिसे येणें जाणें खोटें । दाविती गोमटें लोका ऐसें ॥४॥लोक करुनियां साच वर्तताती । तैशा त्या खेळती लटिक्याची ॥५॥लटिकी करिती मंगळदायकें । लटिकींच एकें एकां व्याही ॥६॥व्याही भाई हरि सोयरा जांवयी ॥ अवघियांच्या ठायीं केला एक ॥७॥एकासीच पावें जें कांहीं करिती । उपचार संपत्ति नाना भोग ॥८॥भोग देती सर्व एका नारायणा । लटिक्या भावना व्याही भाई ॥९॥लटिकाच त्यांणीं केला संवसार । जाणती साचार वेगळा त्या ॥१०॥त्यांणीं मृत्तिकेचे करुनी अवघें । खेळतील दोघें पुरुषनारी ॥११॥पुरुषनारी त्यांणीं ठेवियेली नांवे । कौतुकभावें विचरती ॥१२॥विचरती जैसे भावें लोक । तैसें नाहीं मुख खेळतीया ॥१३॥यांणीं जाणितलें आप आपणया । लटिकें हें वांयां खेळतों तें ॥१४॥खेळतों ते आह्मी नव्हों नारीनर । ह्मणोनी विकार नाहीं तयां ॥१५॥तयां ठावें आहे आह्मी अवघीं एक । म्हणोनी नि:शंक खेळतील ॥१६॥तयां ठावे नाहीं हरीचिया गुणें । आह्मी कोण कोणें काय खेळों ॥१७॥ काय खातों आह्मी कासया सांगातें । कैसें हें लागतें नेणों मुखीं ॥१८॥मुखीं चवी नाहीं वरी अंगीं लाज । वर्ण याती काज न धरिती ॥१९॥न धरिती कांहीं संकोच त्या मना । हांसतां या जना नाइकती ॥२०॥नाइकती बोल आणिकांचे कानीं । हरि चित्तीं मनीं बैसलासे ॥२१॥बैसलासे हरि जयांचियें चित्तीं । तयां नावडती मायबापें ॥२२॥मायबापें त्यांचीं नेती पाचारुनी । बळे परि मनीं हरि वसे ॥२३॥वसतील बाळा आपापले घरीं । ध्यान त्या अंतरीं गोविंदाचें ॥२४॥गोविंदाचें ध्यान निजलिया जाग्या । आणीक वाउग्या न बोलती ॥२५॥न बोलती निजलिया हरिविण । जागृति सपन एक झालें ॥२६॥एकविध सुख घेती नित्य बाळा । भ्रमर परिमळालागीं तैसा ॥२७॥तैसा त्यांचा भाव घेतला त्यांपरी । तुका ह्मने हरि बाळलीला ॥२८॥॥६६८५॥लीलाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनियां करी स्तनपान ॥२॥नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हातें त्यासी ॥३॥हातें कुर्वाळुनी मुखीं घाली घांस । पुरे ह्मणे तीस पोट धालें ॥४॥पोट घालें मग देतसे ढेंकर । भक्तीचे तें फार तुळसीदळ ॥५॥तुळसीदळ भावें सहित देवा पाणी । फार तें त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचें तें जळ गोड देवा ॥७॥देवा भक्त जिवाहुनी आवडती । सकळहि प्रीति त्यांच्याठायीं ॥८॥त्यांचा हा अंकित सर्व भावें हरि । तुका ह्मणे करी सर्व काज ॥९॥॥६६८६॥जयेवेळीं चोरुनियां नेलीं वत्सें । तयालागीं तैसें होणें लागे ॥१॥लागे दोहीं ठायीं करावें पाळण । जगाचा जीवन मायबाप ॥२॥माय झाल्यावरी अवघ्या वत्सांची । घरीं वत्सें जीचीं तैसा झाला ॥३॥झाला तैसा जैसे घरींचे गोपाळ । आणिक सकळ माहेरी पांवे ॥४॥मोहरी पावे सिंगें वाहिल्या काहाळा । देखिला सोहाळा ब्रह्मादिकीं ॥५॥ब्रह्मादिका सुख स्वप्नींही नाहीं । तैसें दोहीं ठायीं वोसंडलें ॥६॥वोसंडल्या क्षीर अमुप त्या गायी । जैसी ज्याची आई तैसा झाला ॥७॥लाघव कळलें ब्रह्मयासी याचें । परब्रह्म साचें अवतरलें ॥८॥तरले हे जन सकळही आतां । ऐसें तो विधाता बोलियेला ॥९॥लागला हे स्तुति करुं अनंताचि । चतुर्मुख वाची भक्ति स्तोत्रें ॥१०॥भक्तिकाजें देवें केला अवतार । पृथ्वीचा भार फेडावया ॥११॥पृथिवी दाटिली होती या असुरीं । नासाहावे वरी भार तये ॥१२॥तया काकुलती आपल्या दासांची । तया लागी वेची सर्वस्वही ॥१३॥स्वहित दासांचे करावयालागीं । अव्यक्त हें जगीं व्यक्ती आलें ॥१४॥लेखा कोण करी त्यांचिया पुण्याचा । जयांसवें वाचा बोले हरी ॥१५॥हरी नाममंत्रे पातकांच्या रासी । तो आला घरासी गौळियांच्या ॥१६॥गौळिये अवघीं झालीं कृष्णमय । नामें लोकत्रय तरतील ॥१७॥तरतील नामें कृष्णाचिया दोषी । बहुत ज्यांपाशीं होईल पाप ॥१८॥पाप ऐसें नाहीं कृष्णनामें राहे । धन्य तोचि पाहे कृष्णमुख ॥१९॥मुख माझे काय जो मी वर्णू पार । नमस्कार घाली ब्रम्हा ॥२०॥ब्रह्मा नमस्कार घाली गोधनासी । कळला तयासी हाचि देव ॥२१॥देवचि अवघा झालासे सकळ । गाई हा गोपाळ वत्सें तेथें ॥२२॥तेथें पाहाणें जें आणिक दुसरें । मूर्ख त्या अंतरें दुजा नाहीं ॥२३॥दुजा भाव तुका ह्मणे जया चित्तीं । रवरव भोगिती कुंभपाक ॥२४॥॥६६८७॥कुंभपाक लागे तयासी भोगणें । अवघाचि नेणे देव ऐसा ॥१॥देव ऐसा ठावा नाहीं जया जना । तयासी यातना यम करी ॥२॥कळला हा देव तया साच खरा । गाई वत्सें घरा धाडी ब्रह्मा ॥३॥ब्रह्मादिकां ऐसा देव अगोचर । कैसा त्याचा पार जाणवेल ॥४॥जाणवेल देव गौळियांच्या भावें । तुका ह्मणे व्हावें संचित हें ॥५॥॥६६८८॥संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणें वांयां परि त्याचें ॥१॥त्याचिया पिकासी आलिया घुमरी । आल्या गाईवरी आणिक गाई ॥२॥गाई दवडूनि घालिती बाहेरी । तंव ह्मणे हरी बांधा त्याही ॥३॥त्याही तुह्मी बांधा तुमच्या सारिख्या । भोवंडा पारिख्या वाडयांतुनी ॥४॥पारिख्या न येती कोणाचिया घरा । सूत्रधारी खरा नारायण ॥५॥नारायण नांदे जयाचिये ठायीं । सहज तेथें नाहीं घालमेली ॥६॥मेलीं हीं शाहाणीं करितां सायास । नाहीं सुखलेश तुका ह्मणे ॥७॥॥६६८९॥तुका ह्मणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळी करुनी ध्वजा ॥१॥करुनियां टिरे आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥दगडाचे टाळ कोण त्यांचा नाद । गीत गातां छंद ताल नाहीं ॥३॥ताल नाहीं गातां नाचतां गोपाळां । घननीळ सांवळा तयांमध्यें ॥४॥मध्यें जया हरि तें सुख आगळे । देहभाव काळें नाही तयां ॥५॥तयांसी आळंगी आपुलिया करीं । जाती भूमीवरी लोटांगणीं ॥६॥निजभाव देखे जयांचिये अंगी । तुका ह्मणे संगीं क्रीडे तयां ॥७॥॥६६९०॥तयांसवें करी काला दहिभात । सिदोर्या अनंत मेळवुनी ॥१॥मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥नेदी चोरी करुं जाणें अंतरींचें । आपलें ही साचे द्यावें तेथें ॥३॥द्यावा दहीं भात आपले प्रकार । तयांचा वेव्हार सांडावावा ॥४॥वांटी सकळांसी हातें आपुलिया । जैसें मागें तया तैसें द्यावें ॥५॥द्यावें सांभाळुनी सम तुकभावें । आपणही खावें त्यांचे तुक ॥६॥तुक सकळांचे गोविंदाचे हातीं । कोण कोणें गति भला बुरा ॥७॥राखे त्यासी तसें आपलाल्या भावें । विचारुनी द्यावें जैसें तैसें ॥८॥तैसें सुख नाहीं वैकुंठीच्या लोका । तें दिलें भाविकां गोपाळांसी ॥९॥गोपाळांचे मुखीं देऊनी कवळ । घांस माखे लाळ खाय त्यांची ॥१०॥त्यांचिये मुखींचे काढूनियां घांस । झोंबता हातांस खाय बळें ॥११॥बळें जयाचिया ठेंगणें सकळ । तया ते गोपाळ पाडितील ॥१२॥पाठी उचलुनी वाहातील खांदीं । नाचतील मांदीं मेळवूनि ॥१३॥मांदीं मेळवूनी धणी दिली आह्मां । तुका ह्मणे जमा केल्या गाई ॥१४॥ N/A References : N/A Last Updated : May 26, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP