आज्ञापत्र - पत्र ४९
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
कदाचित कोण्ही मामलेदार स्थळास संकट जालें म्हणोन स्थळ गनिमास देऊन आपला जीव वांचऊन तो गनिमाकडे गेला तरी तो यत्नेंकरुन हस्तगत होय ते गोष्ट करावी. अगदी हातास न लागे तरी त्याचे लेक गुलाम करावे. बायका बटकी कराव्या, त्यासहि विष अथवा मारेकरी घालोन हरप्रयत्नें तेथील तेथें मारवावा. जर सामान सरलें, उपराळा राहिला, धण्याचा हात न पावें यैसे जाहलियावरी निदानी मामलेदारांनी गड गनिमांस देऊन गनिमाकडे गेला त्याचीं मुले-लेकरें सोडावी, त्यास घरीं बसवावा. स्थळाचा उपाय करील तरी करुन द्यावा. कितीकां दिवसांउपरीं हरयेक मामला सांगावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP