आज्ञापत्र - पत्र २६
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
परंतु, केवळ नृपानें स्वतांच इतकाहि धंदा करीन म्हणतां होतो यैसे नाहीं. याकरिता हा सकळ राज्यभार चालवावयाकारणें आपले प्रतिनिधी प्रधान करावे लागता. प्रधानविरहित राज्यभार चालत नाहीं. मागें जे जे राजे जाले त्यांणी स्वहित चित्तांत आणून राज्यभारार्थ प्रधान निर्माण केले. त्यांचे आपणांसारखे बहुमान वाढवून राज्यभार चालविले. प्रधान म्हणजे राज्यलक्षणगृहाचे स्तंभ आहेत. राज्य यथोचित संरक्षून नूतन निर्माण करणें याचें मुख्य कारण प्रधान. प्रधान म्हणजे हत्तीचे अंकुश. किंबहुना प्रधान म्हणजे यहलोकीं राज्यकृत्यसंपादनामुळे नृपाची विश्रांती, धर्मप्रतिपालनामुळे परलोकपंथींची दीपिका. प्रधानापेक्षा राजेलोकांस इतर आप्त व अधिलोत्तर किमपि नाहीं. सकळ सेवकांपेक्षा प्रधानाचा बहुमान विशेष आहे. प्रधान हेच राजे लोकांची बाजू. प्रधान हेच राजबंधू. यैसें राजेलोकीं पूर्ण चित्तांत आणून लाक्षणिक प्रधान पाहून करावें. त्यांवरी सर्व राज्यभार ठेवावा.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP