आज्ञापत्र - पत्र १६
ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.
राजे लोकांस विनोदाचें व्यसन येकंदर नसावें. सुहृद जाले तरी सेवक लोक; मर्यादा राहत नाहीं. ते आपली अमर्यादा आपण करुन घेतली यैसें होतें. यखादे समयीं क्रोध आलियाने त्यांचा घात होऊं नये. याकरितां विनोद प्रवृत्ति नसावी. आणि आपले शहाणपणाचीच रीझ चित्तांत आणू नये. चित्तांत आले कार्यभागाचे गुणदोष स्वतां शोधून पाहावें. कार्यभागी बुद्धिवंत असतील त्यांस पुसावें. आणि ज्याची जे अधिक बुद्धि असेल ते घेऊन जेणेंकडून योजिलें कार्य सिद्धिस जाय तें करावें. आपलेच युक्तीचा आग्रह करुन असलिया सेवकांच्यानें गुणदोष परिच्छिन्नवादें बोलवत नाहींत. त्यामुळे चाकरलोकांची बुद्धिविशेषता प्रत्ययास न येतां त्यांचा गुणलोप होतो, आणि कार्यहि नासतें.
N/A
References : N/A
Last Updated : February 03, 2019
TOP