आज्ञापत्र - पत्र २५

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


आज्ञापत्र - पत्र २५
राज्यामध्यें हुजरात, गड-किल्ले, लस्कर -  हशम यांचा नियम करणें, प्रजा संरक्षणें, धर्माधर्म विचारुन पाहणें, यथाकालीं दान देणें, सेवकलोकांची केलीं वेतनें पाववणें, समयाचे समयीं प्रजेपासून करभार घेणें, संपादिले पदार्थाचा संग्रह करणें, नित्यानित्य राज्याचा आय-व्यय पाहणें, स्थूळ, सूक्ष्म, अतीत, अनागत कार्य सुचोन त्या त्या कार्यानुरुप अगोधर त्याचा विचार योजणें, न्याय अन्याय पाहून यथाशास्त्र शासनाचा निश्चय करुन शासन करणे,परचक्रादि अरिष्टांचा परिहार योजणें, देशोदेशी वार्तिक प्रेरून वर्तमान आणवणें, समयविशेष शत्रूस संधि-विग्रह-उपेक्षा न करितां यथोचित्त विवेक करुन तदनुरुप प्रवर्त करणें, आहे राज्य त्याचें संरक्षण करुन नूतन संपादणें, अंत:पुरादि नाजुक नियम ते यक्षोचेत रक्षणें, संभावितांचे मान वाढवून क्षुद्रांस नियमांवरी ठेवणें, दैवते व दैवतनिष्ठ सुब्राम्हण यांचे प्रसाद संपादणें, अधर्मप्रवृत्ति मोडून धर्माभिवृद्धि करुन शाश्वत लोकाश्रयित होणें इत्यादि ही नृप कार्येच आहेत.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2019-02-03T18:41:12.8970000