आज्ञापत्र - पत्र ३०

ऐतिहासिक साहित्य समजणे ही एक कठीण प्रक्रिया आहे.


राज्याचा यखतियार सरकारकुनावर द्यावा. (परंतु) त्यांणीं सांगावे तेव्हांच आपणास कळावें यैसे सर्वथा न करावे. आणखी आपले मायेचा विश्वासू मनुष्य त्यासमागमें देशांत व गडकिल्ले यांत व सेवेत ठेऊन त्यांचे हातें किंबहुना वार्तिक मुखें वरचेवरी वर्तमान मनास आणून खबरदार असावें. त्यामुळे त्यांणी केली सेवा व कार्यविशेष व देशांत जाला न्यायान्याय, आपणांस, छदम होऊं न पावतां तत्क्षणीं कळतो. तदनुरुप पारपत्य केलें जातें. अन्यायी अनायासेंच शासन पाऊन हालखुद राहतात.

N/A

References : N/A
Last Updated : February 03, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP