मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड|
ब्रह्मांडप्रळये

आदिखंड - ब्रह्मांडप्रळये

सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला


असा ते रक्षा परमाणुकारे । सर्व पोकळीमध्यें भरे । कांहीं राखोंडी उरे । मही तत्व ॥७३॥
दाहीकांचें दहन करुन । हुतु होय लीन । परी धूम्रु दाटे दारुण । सर्व पोकळी ॥७४॥
मेघ प्रगटति तेथुनी । ते गर्जति दीर्घध्वनि । सव्य अपसव्य सांडोनि । वर्षती जळ ॥७५॥
तंव शिष्यु बोलिला कांहीं । जळालि पंचकेंसी मही । तेथ सव्यापसव्य कां नाहीं । सांगा जी मज ॥७६॥
पाठीं गुरु बोलिले असें । तुवां पुसीलें आईक तैसें । परी यासी प्रमाण असे । सिध्दांती येक ॥७७॥
हे भूमि कंदुकाकार । निर्धारें मानि तुं उत्तर । इचां संगीं चराचर ।वस्ति असे ॥७८॥
तुं विकल्पु धरीसी मानसी । जे तळींचि थारली कैसी । तरी जेव्हडें आहे भूमीसी । त्यासी खालुती भूमी चि ॥७९॥
कां जें भूमिचि आवरनशक्ति । ते वोढोनि करी आपाइती । जैसी चुंबकाचि जाती । आकर्षी लोहें ॥८०॥
ह्मणौनि जीव शैल तरु जळ । हे भूमीं आकर्षी सकळ । तें नाशलेयां भूतळ । पाठीं सव्यापसव्य कैचें ॥८१॥
ते दीर्घ मुशलवृष्टि । रक्षावी नुरे सृष्टी । हे हरमुखीची गोष्टी । शास्त्रीं हीं आहे ॥८२॥
मही आवरण जळ । ते ही आंकोचे सकळ । एवं तेवं भूतळ । नाशु पावे ॥८३॥
मेघगर्भिच्या दामिनी । धांवती शोखावया पाणी । कीं ते मेघ चि धूम्र होउनि । प्रसवले अग्रि ॥८४॥
आपा आवरण हुताशु । तो हि आकोंचे सांडोनि पैसु । करी जळाचा नाशु । जळ पंच केसीं ॥८५॥
जैसे मागील सप्तहुतु । तैसें पुल्लिंग अद्भुत । ते अनिवार संख्यात । उठति तेथें ॥८६॥
पाठीं त्या पावकाचे ज्वाळें । प्रगट होवावें मळया निळें । यासी हि आगळे । प्रमाण असे ॥८७॥
महत्तेजा दशगुण । महव्दायुचें आवरण । तो हि शोखोनि प्राशन । तेजाचें करी ॥८८॥
या वायोचा वळसा । नाशु होय हुताशा पाठिं उरे जैसा तैसा । वावधाणु ॥८९॥
मग राहे वायुचे चळन । उरे एकविध गगन । जे वायोसी आवरण । बोलिलें पूर्वि ॥९०॥
जें सर्वाचें भांडार । पूर्णात्पूर्ण निरंतर । ज्यासी ह्मणती ज्ञातार । अवि नाश ब्रह्म ॥९१॥
खं ब्रह्म येणें मतें । अर्ध्द संपले सहितें । तेवि चि पूर्णपणें यातें । वेदु ही बोले ॥९२॥
इत्यादि बहुताचें वचन । अविनाश मानिती गगन । परी या आकाशा ही आन । समर्थ आहे ॥९३॥
या नभा आवरण साचारु । तो अहंकारु नभापारु । या तमाला ही आधारु । महत्तत्व असे ॥९४॥
यास्तव नभाचा नाशु । तुज दाखवुं उदसु । नभातें आच्छादी तामसु । अहंकारु तो गा ॥९५॥
आटे महद्रुतेसी प्रपंचु । तैं नभा कैसा नव्हे वेचु । यास्तव परमात्मा साचु । श्रृति असे ॥९६॥
सदाशीवाचे वचन । समर्थ नव्हे गगन । याचे व्यापक लक्षण । व्याप्य होऊं नेणें ॥९७॥
हें अवकाशें संचरें । अन्यथा आहे अपूरें । घनामध्यें निर्धारें । निघो नेणें ॥९८॥
तेथ अहंकाराचें संचरण । यास्तव व्योम न्यून । याचे पोकळ लक्षण । परी भरलें भरणी हें नसे ॥९९॥
भूतें बीजें प्रमाणें । दाटती भरलेंनि तमोगुणें । तेथ सच्छिद्रता लक्षणें । कोण मानी ॥१००॥
नभा पर पूर्ण श्यामु । तो हा अहंकारु चि परम । तैं लोपोनि व्योम ।स्वयें उरे ॥१०१॥
या अहंकारा ग्रासीत । तें महत्तत्व विख्यात । जें शुध्दसत्वात्मक उदित । निर्मळ तेज ॥१०२॥
जैं ईश्वरु अहंता सांडी । तैं महतत्व कोण मांडी । ब्रह्मविदांचें तोंडी ।हें चि असे ॥१०३॥
॥ इति ब्रह्मांडप्रळये ॥

N/A

References : N/A
Last Updated : March 07, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP