आदिखंड - पंचप्रकारें नि:कर्म
सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला
या ज्ञानाचें पावन । होय जयापासून । तो प्रेत्न भलतेन । चुकोनये ॥९२॥
या प्रेत्ना नाहि मान । न लगे यज्ञ तप ध्यान दान । येथ येकले चि मन । माग लावावें ॥९३॥
या मनाचे धालेपणें । इंद्रियां होय माजने । तो हि कर्माचे भूषणें । गौरवु पावे ॥९४॥
जे ज्ञानें कर्मं आचरे । ते चि नि:कर्म निर्धारें । पाहतां या पुढारें । चांग नाहीं ॥९५॥
असताहि ब्रह्मज्ञान । कर्म करी जाणून । तो ही कर्मे कर्म उलंघुन । ब्रह्मी बैसें ॥९६॥
कां ब्रह्मीं बैसला नरु । घे कर्माचा डगरु । तो ही भला चातुर । ब्रह्मनिष्ठु ॥९७॥
कां ईश्वरार्पणहेतु । कर्म करी तो ही धीमंतु । कां करी फलाशा रहितु । तो हि भला ॥९८॥
कां आनें प्रवर्त्तविला करी । कर्माचि हेतु न धरी । जाण या पांचांप्रकारीं । मुक्तप्राणी ॥९९॥
॥इति पंचप्रकारें नि:कर्म ॥
N/A
References : N/A
Last Updated : March 07, 2018
TOP