मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| माया गूढ विचारणा आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - माया गूढ विचारणा सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी माया गूढ विचारणा Translation - भाषांतर आतां आइक तो ईश्वरु । जो जाला साकारु । उठला अहंकारु । रचनेस्तव ॥६३॥तेथ मींपण चि स्फुरे । उठलें दुसरें । तें रुप साकारें । ते आदिमाया ॥६४॥तो पुरुष तें सुंदरी । माहामाया ईश्वरी । जयेची उभारी । हे भूतग्राम ॥६५॥नमन ते चंडिके । त्या व्यापिलें सकळैकें । तिचें रुप कौतुकें । सांगों आतां ॥६६॥ते अहंकाराची खोळ । महादेवी शबळ । आधिष्ठोनि सकळ । त्या रुप केलें ॥६७॥जैसा बिजा पासूनु । तरु दीसे गहनु । तेवि ब्रह्मी होनु । ते माया देवी ॥६८॥ते पतिसंभोगेंविण । प्रसवली गहन । ते आतां सांगैन । मी रुप तीचें ॥६९॥ते व्याली एकतानुले । ते चौपरी विभंडिलें । बारा भाग केले ।ते येक येकाचें ॥७०॥तेथूनि हे चराचर । केलें त्या गोचर । आणि चोज थोर । त्या मांडियेलें ॥७१॥ते विणरितु रजस्वला । व्याली चोविसां बाळा । त्यांतु सां ढीशाळा । रुप केलें ॥७२॥चौघांचे पडीभरें । चौदा लाविलीं व्यापारे । व्याली ते न पुरे । खाति असे ॥७३॥अष्टादशे खाये । खादली तेचि विये । सां उजु ते पाहे । पैं कृपा दृष्टी ॥७४॥तेही खाउलागे । स्वयं सेजे निगे । आपुलीचि अंगे । खाति असे ॥७५॥बहुतांचि चाड धरी । मागुतें वमन करी । ते माया ईश्वरी । आदिशक्ती ॥७६॥आणिकां तिंचि माता । ते जाली पुत्रवंता । येकु वडील असतां । व्याली पांच ॥७७॥येक येक कापिले । पांचां पांचाठाईं केलें । तैसेचि मेळविलें । ते पंचभागीं ॥७८॥निष्ठुर थोर माउली । ते उभयांचि चिरली । विभागुनि केली । पंनास खांडे ॥७९॥ते दोनि गोळे केले । दृष्टि रांघियलें । हें रुप दाविलें । त्या लोकत्रयीं ॥८०॥एक व्यापारीं ठेविला । येरुं जगीं वांटिला । हा पवाडा केला । त्या जगन्माता ॥८१॥परस्परें वाटिला । तो महा स्थूळ जाला । त्रैलोक्या एतुला । पुरोनिं उरे ॥८२॥तेंचि तें प्रत्याकारें । फोडोनि विस्तारें । चहुं भागांतरे । वाटियली ॥८३॥नाना याति योनि खांडें । असंख्ये उदंडें । ते भिन्नें भिन्नें कोडें । विस्तारिलीं ॥८४॥एवं नामें रुपें नाना । त्या नाहीं गणना । ते गीळी उगळी मना । पासूनियां ॥८५॥ते उगळितां ये तोंडी । किं योनी मागें सांडी । जाणें भोगेविण गोडी । ते पुरुषाची ॥८६॥असें ही असुनि वरी । त्या दाविली उभारी । बाळें खेळवी यापरी । पंचविसें ॥८७॥पांच गर्भ उदरी । ते पडाताति बाहिरी । उदरा कोण्हेपरी । सांडिती नां ॥८८॥आनें पांच सारें । तें पोटींची निर्धारें । त्याचे व्यापार बाहिरे । असंख्यात ॥८९॥ते येक रुपें च्यारी । तर्ही पांचची निर्धारी । सुख दु:ख व्यापारी । त्यासी भोगु ॥९०॥तें आणिक पांच पाहे । पोटिं ना बाहिर पोटिं आहे । पोटांतुळ गुह्यें । दाविताती ॥९१॥ते पोटिचे बाह्ये नेति । बाहिचें पोटिं देति । पोटा बाहिर खेळविती । कळा त्यांची ॥९२॥आणिक दाहा बाहिरें । तें लाविलें व्यापारे । त्या कदा भीतरें । एउं नेदीं ॥९३॥ये दाहा बाहिची । ते दाहा पोटींची । पांच कळा याची । खेळवाया ॥९४॥भरण पोषणादिक । नाहि करितां आराणूक । ऐसें केलें कौतुक । लोकत्रयीं ॥९५॥जेवि येते व्दिभाग । षड्भाविक चांग । नारि नरु अंग । दावितसे ॥९६॥घरांतु घरकुळे । खेळनें मंडिलें । हें आंगीं त्या दाविलें । आपुलेंचि ॥९७॥त्यामाजी आपण । खेळतसे संपन्न । ऐसी सलक्षण । ते आदिमाय ॥९८॥दोनि दाउं गेलि । ते असी फुटली । आपणचि जाली । खंडभागा ॥९९॥तिची हेचि थोरी । पति सांठविला उदरी । आपण त्या भीतरीं । रिंगतीसे ॥१००॥रुप नाही भर्तारा । ते चालवी घरचारा । ह्मणौनि हे कुमारा । कल्पादि होनि ॥१॥ते योनि विण व्याली । गर्भेविण छाया आलि । सहज ते वांझोली । तर्हीं जगन्माता ॥२॥हे गूढ नव्हे पाहे । वेदीं शास्त्रीं आहे । सिध्देशाचे सोये । सांपडैल ॥३॥॥ इति माया गूढ विचारणा ॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP