मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| महत्तत्वनिर्धारु आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - महत्तत्वनिर्धारु सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी महत्तत्वनिर्धारु Translation - भाषांतर असो ते माये ईश्वरापासून । जालें महत्तत्व उत्पन्न । तें जगाचें कारण । कार्य मूळिचें ॥४॥तें ईश्वराचें शबळत्व । मायेचें शुध्दत्व । वोतलें महत्तत्व । तीजें देह ॥५॥ईश्वरीं शबळ नाहीं । परि तेथें कार्य उठिलें जें काहीं । तें शबळचि देहीं। विचारावें ॥६॥शुध्द तें साच कारण । शबल कार्याचें लक्षण । ते माये ईश्वरापासुन । शबळ शुध्द कैसे ॥७॥तरि ईश्वरापसून शबलत्व । होय माया महत्तत्व । येर ईश्वराचे शुध्दत्व । ईश्वरीचि असे ॥८॥माया प्रत्यक्ष उठे लपे । शुध्द नव्हे येणें पडपें । मायेचें ठाईं आरोपे । शबळचि ते ॥९॥आजि वीर साकारी । प्रकृति शबळ निर्धारीं । आत्मा परमात्मा सर्वातरी । शुध्द होय ॥१०॥येथ दृष्टांतु येकु । तुज देउं परमार्थिकु । या बोलाचा विवेकु । धरुनि राहे ॥११॥जो अकुंर बिजाकारण । तैसाचि तरुसी प्रमाण । तो नाशेना ह्मणौन । शुध्द होये ॥१२॥त्या अकुरासी तरु । कार्य होय निर्धारु । कां जे मूळ डाळे विस्तारु । त्या अंकुराचा ॥१३॥परि त्या तरुसी कारण । बीज शुध्द नव्हे जाण । ते मूळीं नाशु पावोन । अंगी प्रगटे ॥१४॥अंकुर वृक्षरुपें उठे । बीज सकळ भूमीं आटे । आतां शबळ श्रुध्द कोण घटे । हे विचारावें ॥१५॥आतां असो जें महत्तत्व कवण । हे पाहिजे विचारुन । तरि जो पूर्ण अहंकारु मिपण । ते वोळखावें ॥१६॥पिंडा ब्रह्मांडा असी थूळे । जेणें हे चळति सकळें । ते महत्तत्वा वेगळें । गणू नये ॥१६॥हे सर्व ही माझें ह्मणत । मिं चोरुनि वर्त्तत ।तरि पाहा पा तें साक्षांत । कोण असे ॥१७॥हे प्रत्यक्ष आत्मगुज । उदास बोलों नये मज । याचाही मध्यखंडी तुज । निर्धारु होईल ॥१८॥बीज वृक्ष अंकुरु । माया महत्तत्व ईश्वरु । प्रकृति जीव जीवेश्वरु । याचा अनुक्रमु ऐसा ॥१९॥॥इति महत्तत्व लक्षण ॥बीजाधारें अंकुरु । तेवी मायेआधारे साकारु । वस्तुगति साचारु । अंकुरजात ॥२०॥मायेसी नाहि निर्धारु । जीवात्मा नव्हे साचारु । केवळ नांदतो ईश्वरु । तदात्मातो ॥२१॥असो आतां पुढील कथन । करुं प्रणव निरुपण । त्र्यंबकु ह्मणें तेही ज्ञान । भले असे ॥२२॥इतिश्री चिदादित्येप्रकाशे श्रीमव्दाल वबोधे ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे मायागूढे महत्तत्वनिर्धारु नामसप्तम कथन मिति ॥७॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP