मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|बालबोध|आदिखंड| ब्रह्मप्रतिपादक आदिखंड मंगळाचरण आद्यखंडानुक्रमणी मध्यखंडानुक्रमणि उत्तरखंडानुक्रमणी शिष्यप्रश्ननुक्रमणी बाललक्षण बाळबोधलक्षण ब्रह्मप्रतिपादक रुद्रदृष्टांत अव्दैतनिरुपण ब्रह्म निरुपण ब्रह्मीष्ट लक्षण माया गूढ विचारणा महत्तत्वनिर्धारु मातृका विवरु ऊँकार विवरण तामसोत्पन्न सात्विकोत्पन्न रजोत्पन्न तत्वें उत्पन्न आवरण भाव कर्म धर्म गुण पंच देवता उत्पन्ननाम हिरण्यगर्भ परस्परानुप्रवेशु सूत्र न्याय प्राण व्यापार वाचा व्यापारु विराट देह पुराष्टक हिरण्यगर्भविराटतनुउत्पन्न खेचर उत्पन्न पंचविध प्रकारें कर्मलक्षण पंचप्रकारें नि:कर्म कर्मबंध कर्मयोगो नाम नरदेह इतिचत्वारो खानि शरीरनिर्धार निर्धारलक्षण दृष्टांत सप्त दृष्टांतनिर्धार निर्धारयोग सप्तवश्वनर उत्पन्न ब्रह्मांडप्रळये देवत्रय प्रलय शिष्योपदेशार्थ सुदेशीशास्त्र आदिखंड - ब्रह्मप्रतिपादक सत्कार्योत्तेजक सभा धुळें, महाराष्ट्रधर्मग्रन्थमाला Tags : balbodhamarathiबालबोधमराठी ब्रह्मप्रतिपादक Translation - भाषांतर श्रीगुरुवेनम:॥वीतरागाय दांताया गुरुभक्तिरताय च ॥॥आत्मलाभात्परो लाभो नास्तीति मुनयो विदु: ॥१॥आतां ब्रह्मनिरुपण । मांडलें चौथें कथन । हें शुध्दअंत:करण । करुनि आईक ॥१॥शुध्द सत्वात्मक मन करी । सांगैन तें दृढ धरी । रे हा आत्माचि सर्व साकारी । पुरोनि उरला ।२॥हा सत्वपूर्ण पुराणु । नसे अधीक ना न्यून । परि कैसा भूलला जनु । नेदेखे यासि ॥३॥प्रकाशलेया हि दिवाकरा । एकें निघती आंधारा । अबुधा जनां नरा । तैसें जालें ॥४॥हे शाश्वत संचलें । पूर्णपूर्णेसी दाटलें । यवढी वस्तु चुकलें । मोघ प्राणी ॥५॥भूमि चुकिजे थापा । हे साच जालें बापा । सिध्दया आत्मस्वरुपा । चूकि पडली ॥६॥भ्रमिक चुके उत्तर । किं पिशाच चुके शरीर । तेवि भ्रांत अबुध नर । चुकिले वस्तु ॥७॥या हि विशेषु आनु । उदका चूके मीनु । पक्षु चूके गगन । तैसें जालें ॥८॥अंतर्बाह्य चक्षु घ्राणीं । सर्वत्रश्रवणीं वदनीं । रोमरोमातें भरुनि । दाटली वस्तु ॥९॥या ब्रह्मांडा बाहीर संचली । ब्रह्मांडी उचंबळत दाटली । चहुं भूतग्रामा पुरली । येवढी वस्तु ॥१०॥प्रमाण तृणादिक बहुवस । कोठें हीं नसे उव्दस ।गुह्य ह्मणों तरि सर्वस । प्रकाशें ॥११॥ऐसें पूर्णात्पूर्ण । येथ न घलिती लोचन । बलात्कारें हें जन । अंध होतसे ॥१२॥यास्तब भगावद्रीते । निर्धारु केला अनंतें । जें येथ निद्रिस्तें भूतें । मानूनि रात्रि हे ॥१३॥प्रपंचिकां संसारीं वासु । एवं त्यासी तो चि दीवसु । कां जें परब्रह्मी प्रकाशु । त्यां स्वप्रीं हि नाहिं ॥१४॥ज्ञाते नेदखति संसारा । यास्तव ते निशा त्यां नरां ।ब्रह्मप्रकाशु हा पुरा । दिवसु त्याचा ॥१५॥येथें बुध्दि बैसले नर । ते तें चि हें साचार । हे वस्तु भ्रमले गवार । ते चि अंध ॥१६॥या संसारतरुचा फांटा । जन झोबें चहुं वाटा । दर्शनें चढली पुटां । उपाधिबळें ॥१७॥महदादि पासुनि संचला । हा येथवरी सव्यास्व्यें दाटला । यास्तव अश्वत्थ बोलिला । वेदीं शास्त्रीं ॥१८॥ते वस्तुचें सेवटील येक । ते हे झाड किमात्मक । येवढी मूळभूमिका लोक । नेदखती कैसे ॥१९॥सर्वा हि हा चि ठावो । परि ज्याचा जैसा भावो । त्यासि तैसा आत्मदेवो । साचु होय ॥२०॥चंद्रु विश्वा प्रगटला । चकोरी ढेकरु दिधला । प्रेमें पाझरु फुटला । चंद्रकाता ॥२१॥कुमुदें पेलिती दोदें । तरुणी नाचती आनंदें । काउळीं होतिं अंधे । चंद्रविषई ॥२२॥वियोगी दहति तेणें । तस्करां रिपु चांदिणें । उदधी दाटलेपणें । वोसडो पाहे ॥२३॥एवं हा एक चि चंद्र सुधा । कैसा आला गुणभेदा । तेवि हें ब्रह्म बहुधा । भावनें होय ॥२४॥जेहीं जेणें भावें भाविलें । त्या हें तैसें चि फळद जालें । जैसें कां जळें निवडलें । पाद्त्रविशेष ॥२५॥स्फटिक जेथ वसावें । तें चि रुप धरावें । तेवि ईश्वरी होआवें । जगद्रूप ॥२६॥ऐसें ब्रह्म शाश्वत । बहुधा भेदें भाविजत । परि तें सर्वेसी सदंत । निवडे कैसे ॥२७॥पाहातां पावकाचे मुसें । काय भांगारा भेदु असे । अथवा महार्णवीं जैसें । सरिता लोट ॥२८॥तरंगु न संडी उदका । कां शीतलता मयंका । तथा चि दीपु पावका । वेगळा नव्हे ॥२९॥प्रभा न संडी भास्करा । नादु न संडी अक्षरां । किं परिमळु कापुरा । सांडो नेणें ॥३०॥कणिका न संडिती घृता । तेवि आत्मा सर्वभूता । हा कोणा हि विमुखता । होऊं नेणें ॥३१॥जग आपुलिया बुध्दि । जर्हि सांडि आत्मसिध्दि । तर्हीं हिं आत्मसंबंधी । गुंतलें चि असे ॥।३२॥तुं भाविसी भावें असे । जें विश्व ब्रह्म होय कैसें । प्रत्यक्ष भेदु दिसे । हे कां जालें ॥३३॥तरि ब्रह्म तें शुध्द निर्मळ । जेथ अहंता किडाळ । तेथ मी इतुकें हेंचि समळ । दिसों पाहे ॥३४॥हा निर्मळा मळ नसे । पण भेदास्तव बोलिजे असे । अहेतु हेतु जरा दिसे । न धरितां धीर ॥३५॥हा स्वभावगुण जाणावा । येथ बोध नसे देवा । शुध्द मायेचा ठाव । असे ह्मणोनि ॥३६॥जेवि निर्मळा भास्करा । निर्मळ प्रभेचर उभारा । तेवी ते देवी ईश्वरा । आंगी असे ॥३७॥ईश्वरी प्रगटे होय आन् । ते माया सर्वसंपूर्ण । माया महब्रह्म सगुण । शबळ होय ॥३८॥माया स्वआश्रो अव्यामोहिनी । देव न भुले तयेचेनि । ते माया ही स्वस्थानीं । आपण भुले ॥३९॥अविनाश देवाचि खाणि । ते माया ही महद्योनि । अविद्या भूतजननी । सामान्य ते गा ॥४०॥जे ब्रह्मीं विद्यमान । ते माया विद्या पुराणे । ब्रह्मीं अविद्ये तें लक्षण । अविद्येचें ॥४१॥जो प्रपंच उभारा । तो माया शाश्वत शिष्यवरा । जो जो आकारु भांगारा । तें भांगार सत्य ॥४२॥शुध्द निर्मळ गगन । अभ्र वेष्टि तो कारण । तेवि जंवरी ब्रह्म सगुण । तंवरि नित्य माये ॥४३॥व्यामोहिनी अविद्या असें । वेदांतगर्भ बोलणें असे । माया ते स्वरुपी वसे । अव्यामोहिनी ॥४४॥या परमेश्वरी प्रकृति दोनि । मध्यखंडी नवम कथनीं । तेथ सांगों निवडोनि । प्राजळ वचनें ॥४५॥असो हे प्रपंचप्रवृत्ति । आठ प्रकृति बोलिजती । त्याची स्थिति निगुती । सांगो आतां ॥४६॥ईश्वरीं अहंता स्फुरण । स्वरुपाचें अनुसंधान । तो अहंकारु प्रकृतिकारण । मुख्य सर्वां ॥४७॥पुढां महत्तत्व गिवसी । जे सर्व गुणाची राशी । जे ये निर्धारासी । ते बुध्दि जाणावी ॥४८॥पाठिं गुणात्मक आन । महाभूतासी कारण । ऐसें जें विस्तारलें मन । तें हे प्रकृति बोलिजे ॥४९॥याचि जे पूर्णता अवकाश धर्म सछिद्रता । तें नभ हा बहुतां । नेमला ॥५०॥आकाश आत्मयापासुनु । जगप्रवृत्ति होय प्राणु । तो जाणीजे पवनु । प्रपंचप्रकृति ॥५१॥यापासुन हुताशु । रुप लक्षणें साभासु । स्वयं ज्योति प्रकाशु । जाणिजेतो ॥५२॥याउपरी जीवन । जेणें सर्वाचें पोषण । तें जळ प्रमाण स्थिति होय ॥५३॥थूळ मही प्रबुध्दा । देहभूमी एवंविधा । या प्रकृति अष्टधा । आदि होनि ॥५४॥मही जळ तेज समिरु । नभ मन बुध्दि अहंकारु । या प्रकृति हा निर्धारु । बहुतां मुखे ॥५५॥या प्रकृति मुख्य सकळां । आत्मा यांचा जिव्हाळा । ते केधवां ही यां कोण्हा वेगळां । होउ नेणें ॥५६॥आत्मा वेगळां होय ऐसा । तै प्रकृति कोण दशा । ह्मणोनि तो अभेदु सर्वसा । वेगळा नव्हे ॥५७॥आत्मा सर्वा समान । यास्तव भेदु अंप्रमाण । तवं शिष्यु निवांत ठेला वचन । आइकुं ना ऐसें ॥५८॥मग श्रीगुरु बोलिला । तुज भेदु निक्षेपला । कां जे हुंकार राहिला । तुझे मुखीचा ॥५९॥असें बोले दातारुं । तवं येरे केला नमस्कारु । जी माझे जीविचा उद्रारु । कळला तुज ॥६०॥तुं सर्वज्ञ रावो । जाणितला माझा भावो । सिंधु घे थिलराचा थावो । नवल काई ॥६१॥घटादिकांचे प्रमाण । कैसें चुकैल गगन । तरि जि हेंचि निरुपण । कीजे मज ॥६२॥प्रकृतिपुरुषें नित्यवतें । यें दोन्ही साचें गमतें । येर त्रिगुणात्मकें भूतें । भेदें दीसती ॥६३॥जीव ब्रह्म प्रपंच परमेश्वरु । माया अविद्या हा षडिधप्रकारु । ये नित्यें हा विचारु । बहुतिं केला ॥६४॥असा शिष्यसृष्टिउद्देशु । कराव्या संदेहतमाचा ग्राशु । जालां गुरुभानुप्रकाशु । शब्दकिणीं ॥६५॥तो ह्मणें रे निर्धारें जाण । भेदु सर्व अप्रमाण । याचें हि निरुपण । करुं तुज ॥६६॥पुरुषापासुनि प्रकृति जाली । ते भेदें नाहिं निवडली । वेद वेदांत बोलि । सिध्दांतु असा ॥६७॥नटु येकु चि हा निर्धारु । तो चि जाला नारी नरु । तैसा तो नाटेश्वरु । अर्ध्दनारी ॥६८॥नां तरि गंगेचे बोध । देवढे दिसति मार्ग । कां येकें देठी येक लग । फळ जैसें ॥६९॥येका पटा दोनि रंग । येका देहा दोनि भाग । तेवि एकचि अंग । प्रकृतिपुरुषें ॥७०॥या उभयां नाहिं भेदु । तैसा चि प्रपंच अभेदु । कां जे विस्तारला आनंदु । एक चि हा ॥७१॥अळंकार म्हणतां भेदें । भूषणें दिसती बहुविधें । तेवि हे ब्रह्म चि सुधें । नामें रुपें ॥७२॥नानां जैसा कां सिंधु । तो पूर्ण शुध्दबुध्द । भरिते आलिं तरि भेदु । कोण जाला ॥७३॥जैसी सागचराची ऊर्मी । तैसी माया परब्रह्मीं । एणें वर्मे सुवेमीं । वर्मति तें ॥७४॥तो पूर्णपणें जाकळला उमीं नित्यें वोसंडला । येकपणें चि दाटला । सांटे कैसा ॥७५॥तो भरितेन हेलावत । आवर्त्त वळसे उठत । लहरीया येति गर्जत । धुमाळ शब्दे ॥७६॥तो ठाईंचि उपाटे । फेने बुध्दुदें विकारे उठे । यांतु सांग नेटेंबोटें । वेगलें तें काय ॥७७॥सागरीं उर्मि नसती । तरी यें सकळें कां उठती । तेवि ब्रह्मीं अहंवृत्ति । विकार उठले ॥७८॥यास्तव बुधजन । भेदु नये प्रमाण । याचा निर्धार तेषणा । पुढां असे ॥७९॥जें परम ज्ञान निवृत्ति । तेचि स्वरुपानंदप्राप्ति । ब्रह्मविब्रह्मैव भवति । हें प्रमाणश्रृति असे ॥८०॥यास्तव ब्रह्मज्ञान । जलियां हें चि प्रमाण । येरवीं जननें मरणें हे जन । तप्त असे ॥८१॥जे गुरुवचनें संतुष्ट । ते चि प्राणी परनिष्ठ । तर्ही आचरती सुष्ट । शुभें कर्में ॥८२॥होतें तद्रूप तैसें । आणि वेदांत गर्भ मानसें । परम विवर्त्तुचि दिसे । तेयाचे दृष्टी ॥८३॥असर्पभूतरजौ सर्पारोप । हे अज्ञानबुध्दीचे संकल्प । कां जे त्रिगुणादि ज्ञानस्वरुप । असतां परोक्ष जाले ॥८४॥यास्तव विवर्तु परिणामु । हा ज्ञानविषईं नेमु । या हीं प्रकारीं उत्तमु । आत्मा दिसे ॥८५॥अतात्विक अन्यथाभावी । तो चि विवर्त्ताची उपावो । जैसा सर्पु दीसे वावो । दोरांचा ठाईं ॥८६॥तात्विक अन्यथाभावो असा । परिणाम ही जाणिजे तैसा । दुग्ध चि दधि हा भर्वसा । मानेजोतो ॥८७॥आणिक वेदांगगर्भ गोष्टि । बोले समष्टि आणि वेष्टि । यांचा निवाडा गोष्टी । वावरें असी ॥८८॥समस्तां वृक्षांसहित वन ज। असें जें समूहवचन । ते समष्टि कारण शुध्द प्राप्ति ॥८९॥अज्ञान भेदाचि संपत्ति । ते व्यष्टि लागे हातीं । तो संसारचक्रवर्ति । नव्हे कैसा ॥९०॥व्यष्टिकाभावें अन्योन्य । देखिजे पृथक् चैतन्य । ते चि पूर्ण चैतन्य । भावने भेदु ॥९१॥यास्तव समष्टि अखिल कारण । हें चि याचें उदाहरण । कार्य पदार्थी आन । दिसे तें नसे ॥९२॥जागनां अंति सुषुप्ति स्थूळा सूक्ष्मा अचेत प्राप्ति । पुनरपि होय जागृति । ज्ञानाज्ञानें तेवि ॥९३॥जे निष्कृष्टोपाधि । असी जे मलिन मंद बुध्दि । ते कैवल्य समाधि । सांडणे करि ॥९४॥ते अज्ञान बुध्दि नाशे । कैवल्य आत्मा प्रकाशे । ते अन्यशास्त्र नसे । वेदांताविण ॥९५॥दिपकांळिका नाना मतें । डंबे नक्षत्रें उन्नतें । संशयतमगभीं शोभते । सर्व शास्त्रें ॥९६॥तेथ वेदांत पूर्ण गभस्ति । उदो करी ज्ञान जगतीं । तै त्या सर्वाच्या हारपति । वाजटा प्रभा ॥९७॥अवछिन्न भिन्न अभिन्न भावि । जेहीं हा निर्धारु मानिला जीविं । तेहीं परमज्ञानदिवि । देखिली नाहीं ॥९८॥चिदादित्य ज्ञानमूर्ति । यासि उपाधिघन आछादिती । परि तो नित्य ये आरुती । नाना मतें ॥९९॥यास्तव निश्चयात्मक बुध्दि । ते चि ईश्वरज्ञानाचि सिध्दिं । पाठिं इंद्रियें याचि मधि । पोहना निगती ॥१००॥असें तें आत्मरुप केवळ । शिष्या कळावें प्रांजळ । तर्हिं निरसूं भेदाचें किडाळ । पुढिलां कथनीं ॥१॥जे त्रयंबकाचेंनि दातारें । प्रत्यक्ष दाखविलें श्रीसिध्देश्वरें । तेथेंचि सगर्भे उत्तरें । आरंभिजे कथा ॥२॥इति श्रीचिदादित्यप्रकाशे श्रीमव्दाळाबबोधे । ब्रह्मसिध्देशोपदेशे पूर्णानंदे आदिखंडे ब्रह्मप्रतिपादकनाम चतुर्थकथनमिति ॥४॥ N/A References : N/A Last Updated : March 07, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP