तेवीस अक्षरी वृत्तें - विकृति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
अश्वललितम् -
( यदिह नजौ भजौ भ्जभलगास्तदश्वलतितम् हरार्कयतिमत् )
नजभजभाजभालगिं घडे अश्वललित तें वृत्त जगतिं इ।
निखिल जनांत भामिनि जिचे प्रभेसि भजती स्वभाव सरली ।
अवयवही बरेच दिसती गुणें करुनिया सतीहि विरली ।
करकमला मणी चरणिं वाजती हळुच नूपुरें वसुमती ।
अशि वधु टाकि दासि अवलोकि अश्वललितें करीच कुमती ॥१५०॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP