बावीस अक्षरी वृत्ते - आकृति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
भद्रक : -
( भ्रौ नरनारनावथ गुरुर्दिगकविरमं हि भद्रकमिति ।
भद्रक होइल चरणिं येति भरनरानरानग जरी ।
भारतिं रोग हा न दुसरा म्हणेन नृहरी तुला न भजतो ।
पायिं तुझे मनास बसवी तरी भव महासुखेंच तरतो ।
साधुसमान सार्थ घरही नको म्हणतसे वनांत बसतो ।
सावध होऊनि भद्रक मंद्र गायन करी मरीचि दिसतो ॥१४९॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP