दहा अक्षरीं वृत्तें - पंक्ति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
शुध्दविराट् -
( म्सौ ज्गौ शुध्दविराडिदं मतम् ) - मासीं शुध्द विराट हें जगीं
माझ्या या सखया जनाहुनी ।
देतों दृष्टि उठेल पाहुनी ॥
भ्याला अर्जुन अंग कापतें ।
पाहे शुध्द विराटरुप तें ॥३४॥
मानी जो सकला जनांस तो ।
देवाच्या स्वरुपास नासतो ॥
व्दैतातें सम सर्व मानुनी ।
झाला शुध्द विराट हा मुनी ॥३५॥
मानी जो सकला जना हरी ।
ज्ञानें संचित भाव संहरी ॥
जो स्वात्मानुभवांत राहिला ।
तेणें शुध्दविराट पाहिला ॥३६॥
मुद्रा जे समयीं जरी नसे ।
स्पर्शेना तरि भस्म मानसें ॥
मध्वाचार्यमतस्थ तो कसा ।
पाहे शुध्दविराट तोकसा ॥३७॥
==
पणव : -
(म्गौ य् गौ चेत् पणवनामकम् ): - मानांनी पणव घडे यांगीं ।
मागेना न धनयवाशा कीं ।
सेवेची हरि वरती बाकी॥
स्वेच्छेनें मिळल तसें घेतो ।
त्यातें सेवुनि पणवो देतो ॥३८॥
मोहाशा न धरि यदुश्रेष्ठा ।
चित्ती आठविच बरी निष्ठा ॥
साधूसेवनिं झिजवी देहा ।
तत्कर्ती पणवचि वाजे हा ॥३९॥
==
रुक्मवती : -
(भ्मौ सगयुक्तौ रुक्मवतीयम् ): - भामसगांनी रुक्मवती हे ॥
भूषणं माथापासुनि तीचें ।
भास्वररत्नें युक्त सतीचें ॥
हेमभ राधा स्वर्णनगांनीं ।
रुक्मवती ती गायलि गानीं ॥४०॥
भाव न माझें ज्यास तुझे हा ।
श्रीपतिपायीं अर्पितदेहा ॥
जो सम मानी तिक्तमधूतें ।
रुक्मवती कीं रिक्त वधूतें ॥४१॥
भूपति मानी ज्यास गुरुसा ।
श्रीपति रक्षी मानुनि दासा ॥
भारति वक्त्री त्या सुमतीतें ।
होइल पत्नी रुक्मवती ते ॥४२॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP