मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|मराठी व्याकरण|छंदोमंजरी|समवृत्तें| त्रिष्टुप् समवृत्तें उक्ता अत्युक्ता मध्या प्रतिष्ठा सुप्रतिष्ठा गायत्री उष्णिक् अनुष्टुप् अनुष्टुप् बृहती पंक्ति पंक्ति त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् त्रिष्टुप् जगती जगती जगती शक्वरी प्रतिष्ठा अष्टि अत्यष्टि धृति अतिधृति कृति प्रकृति आकृति विकृति संस्कृति अतिकृति उत्कृति अकरा अक्षरी वृत्तें - त्रिष्टुप् कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय. Tags : grammermarathiमराठीवृत्तव्याकरण त्रिष्टुप् Translation - भाषांतर उपजाति: - आनन्तरोदीरितलक्ष्मभाजौ ।पादौ यदीयवुपजातयस्ता: ॥“ ती इंद्रवज्रा जरी हो कवींनी ।उपेंद्रवज्रागतपाद यांनीं ॥केली विमिश्रा उपजाति तीला ।म्हणा तसें अन्यहि मिश्रणाला ॥राधाधरक्रान्तिमुखासमान ।व्हावा सुधानागविधूस मान ॥घडॆल वाटे परि युक्ति घे ही ।पुन्हा समुद्रीं उपजा तिघेही ॥५४॥ते पाहती बाहुज चाप भारी ।जनांस तें राम जयीं उभारी ॥न राहती पाहति जाति कांही ।ग्रामस्थ जाती उपजाति कांहीं ॥५५॥श्वफल् कंपुत्रे अणिला तयासी ।कंसाचिया जो न धरी भयासी ।तो पाहती हो नरबायकांही ।विप्रादिजाती उपजाति कांहीं ॥५६॥==दोधक : - ( दोधकवृत्तमिदम् भभभाद्रौ ) : - दोधकवृत्तभभाभगगांनी ।भाविक भक्तसभेप्रति येतो ।धर्म वदे हित ऐकुनि घेतो ॥कांहिं मिषें हरितो जनवित्ता ।दोधक तो नृप गोड न चिता ॥५७॥भूपतिभूहर भीषण लोका ।द्रव्य हरी बहु दाखवि शोका ॥साधुजना बहु लाविती धाका ।यापरिचा नर दोधक टाका ॥५८॥==शालिनी : - ( शालिन्युक्ता म्तौ तगौ गोऽ ब्धिलोकै: ) -मातातागागांनिं ती शालिनी हो ।माझ्या चित्ता वाटतें नित्य जावें ।साधूपाशीं वैष्णवातें भजावें ॥राहावेंही सर्वदा साधुगांवी ।श्रीकृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥५९॥मारी दैत्यां तारितो भक्त लोकां ।द्रव्यें देतो वारितो सर्व शोकां ॥रक्षी आम्हां काननीं आणि गांवी ।त्या कृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥६०॥माते देतो मान्यता सर्व लोकीं ।दीनां भक्तां जो दयेनें विलोकी ।युक्तीनें जो दुष्टलोकां दगावी ।त्या कृष्णाची शालिनी कीर्ति गावी ॥६१॥मानें होतो तोषतो भामिनीतें ।संगाकृत्या प्रद्रवें कामिनी तें ॥सैन्याधिक्यें शोभती फार राजे ।तैसी क्षेत्री शालि नीरे विराजे ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : March 02, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP