आठ अक्षरी वृत्तें - अनुष्टुप्

कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.


समानि : -
( जौं समानिका गलौच ) : -  राजगीं समानिका लिं ।
पंढरीस जावयास ।
ते स्थलीं रहावयास ॥
चाल होय दु:खहानि ।
सांगतो तयास मानि ॥२१॥
राधिकौज पाहुनीच ।
आचरीत कर्म नीच ॥
ज्यास भीति बापमाय ।
सांगणेस मानि काय ॥२२॥
==
प्रमाणिका -
( प्रमाणिका जरौलगौ ): जरी लगीं प्रमाणिका ।
घरांत सासु येकली ।
तिशीं करुन ये कली ॥
हरी तुलाच राधिका ।
बरी दिसे प्रमाणिका ॥२३॥
उरी सुवर्णकुंभे ते ।
सुबक्र भाळ शोभतें ॥
हरीस वश्य नाणिका ।
हि राधिका प्रमाणिका ॥२४॥
जनांत राहती पती ।
अधोगती अटोपती ।
घरांत साचतो रुका ।
असीच वाकू प्रमाणिका ॥२५॥
==
वितान - नाराचिका तरौ लगौ
( वितानमाभ्यामन्यत्‍ ) : समानिका
प्रमाणिका । विभिन्नजें वितान तें ।
जो जातिचा भलाच तो ।
या ब्राह्मणा न जाचतो ॥
ऐकोनि नाणि मानसा ।
तें झाकितो वितानसा ॥२६॥
मंचावरी सुशेज ती ।
सूरत्नदीपै राजती ॥
आणीक योग्य साधलें ।
शोभे वितान बांधिलें ॥२७॥
तो काय राजमंदिरीं ।
जाणून वोळखी धरी ॥
दु: साध्य बुध्दिबाध्यही ।
तो सेविता न साध्यही ॥२८॥
==
वक्त्र : -
केव्हां शोभा कधीं नाही ।
तिची तो सर्वदा पाही ॥
चंद्रा तोषें तुझ्याहोनी ।
तिच्या वक्त्रास पाहुनी ॥२९॥
जेणें विधूस जिंकिलें ।
रत्नापरीस चांगले ॥
पाहावयास वाटतें ।
माझ्या मनास वक्त्र तें ॥३०॥
माझी दारा जरी होसी
मान्या होशील सर्वासी ॥
जारत्वाचा न भी पापा ।
दावी वक्त्रा हरी तापा ॥३१॥

N/A

References : N/A
Last Updated : March 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP