एकवीस अक्षरी वृत्तें - प्रकृति
कांही नियमित अक्षरांत लघु-गुरूंच्या विशिष्ट क्रमाने रचना करून दाखविणे हेंच तें होय.
स्रग्धरा:
( म्रौ भ्नौ यानां त्रयेण त्रिमुनियतियुता स्रग्धरा कीर्तियेयम् ) : -
माराभानायकरात्रितयिं घडतसें स्रग्धरानाम वृत्त ।
मांडोनी रासशोभा रमुनि अभय दे काय तो बायकांला ।
येथें आला म्हणूनि न विदित तुमच्या हें असो नायकांला ॥
ज्याचे कीर्तीस मातां दुरित हरुनिया होतसे कामपूर्वी ।
राहे चित्ती सदा ते नवतुलसिद्लस्रग्धरा कृष्णमूर्ती ॥१४५॥
माजेना राय लोभें करुनि जनिं यशें जी यदू - नायकाचीं ।
ती ऐके ब्राह्मणासि नमुनि रिपुस दे भीति जो सायकांची ।
दीनांतें रक्षि दाता भगिनि परवधू वासन अहे मनाची ॥
त्याच्या कंठांत घाली गरुडपति अधीं स्रग्धरापलनाची ॥१४६॥
मोठया वीरास तें भीषण नरनयनां होय भी काय कांपे ।
जें घेवोनि नृपातें रणिं वधि वदतो भूपती राम कोपें ॥
त्या या चापास सज्जी अवनिप वर तो नेच्छिजे आणि कांही ।
त्याला घालील सीता स्वकरिं धरुनिया स्रग् धराकन्यका ही ॥१४७॥
माराया राक्षसां भास्कर नमुनि यशस्वी यमी ध्येय राम ।
ज्याच्या बाणें करुनि समरिं घडतसे कोणपाला विराम ॥
ऐशातें पाहुनी निजरगण वदतो बैसुनीया विमानीं ।
सीता दे रावणारेऽत्रिमुनि याति म्हणे स्रग्धरा गोष्ट मानी ॥१४८॥
N/A
References : N/A
Last Updated : March 02, 2018
TOP