मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८९ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ८९ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६६ अध्याय ८९ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर दर्शये द्विजसूनूंस्ते मावज्ञात्मानमात्मना । ये ते नः कीर्ति विमलां स्थापयिष्यन्ति नो नराः ॥४६॥तुज मी दावीन द्विजपुत्रांतें । ज्यास्तव जाळिसी तूं आपणातें । वृथा विलिप्त आत्मघातें । न होयीं अनुचितें आचरणें ॥८४॥जरी तूं म्हणसी मी अनृती । सर्व ऐकतां सभासदपंक्ती । निखंदूनियां श्रेष्ठांप्रति । स्वकीय कीर्तीं बोलिलों ॥४८५॥बोलिल्या ऐसी न घडली क्रिया । केली प्रतिज्ञा गेली वायां । आतां मुख काय दावूं लोका ययां । या जिण्याहूनियां मृत्यु बरा ॥८६॥आणि ब्राह्मणेंसीं केला नियम । अकृत स्वाङ्गीकृत मी कर्म । निस्तरावया अनृतदोष विषम । कृष्णवर्त्मा सेवीन ॥८७॥यास्तव सदोष मिथ्याभाषक । निर्लज्जपणें मी दुर्द्दशाङ्क । जनीं न मिरवीन निष्टंक । कोऒटकळंक संस्पृष्ट ॥८८॥तरी आपणातें आपणा करून । एवं न निखंदीं व्रीडायमान । मी असतां नारायण । तुज दुर्घट कोण कर्तव्य ॥८९॥ज्या कारणे आत्मघात । करिसी ते तूं ब्राह्मणसुत । ब्राह्मणा अर्पूनि समस्त । कीर्तिमंत हो जगीं ॥४९०॥न्रनारायण उभयतां । आपण अभेदरूपें तत्वता । या निश्चयें श्रीकृष्ण पार्था । बोलिला मिथा अभेदें ॥९१॥कीं हे इतुकेही पुरुष यादव । आणि द्वारकावासी प्रजा सर्व । आमुचें अमळकीर्तीतें स्वयमेव । अचल वास्तव स्थापितील ॥९२॥म्हणतील धन्य धन्य अर्जुन । अमोघधन्वा क्षात्रनिपुण । प्रतपएं करी भूसुरत्राण । सत्यप्रतिज्ञ नियतात्मा ॥९३॥ब्रह्मादिकां जें दुर्घट । ऐसें कर्म परम अचाट । साधिलें केवळ दैवनिष्ठ । हें मिथ्या प्रकट वदतील ॥९४॥राया भरतकुळावतंसा । तव पितामहा कृष्णकुवासा । इतुकें बोलूनि अग्निप्रवेशा । करितां सहसा वर्जिलें ॥४९५॥तो वरी षड्गुणैश्वर्य संपन्न । कृतार्थ करावया स्वप्रपन्न । द्विजापत्यानयना प्रयाण । करी संपूर्ण तें ऐका ॥९६॥इति सम्भाष्य भगवानर्जुनेन सहेश्वरः । दिव्यं स्वरथमास्थाय प्रतीची दिशमाविशत् ॥४७॥दारुकां करूनियां निदेश । जो दिव्यस्यंदन स्वप्रकाश । नभौनि उतरला सायुधकोश । अकृतमानुष सयंत्रहय ॥९७॥आणविला सज्ज अति सत्वर । त्या स्वरधी पार्थासह ईश्वर । आरूढ होऊनि प्रमोदपर । पश्चिमदिशे प्रति प्रवेशला ॥९८॥कोठवरी गेला म्हणसी जरी । तरी वक्ष्यमाणश्लोकोत्तरीं । सर्व वृत्तान्त तो सविस्तरीं । सावध श्रोतीं परियेसा ॥९९॥सप्तद्वीपान्सप्तसिन्धून्सप्तसप्तगिरीनथ । लोकालोकं तथाऽतीत्य विवेश सुमहत्तमः ॥४८॥पवनजित हयचतुष्क । अंतरिक्षगामी सम्यक । तिहीं वेगवंत रथ निष्टंग । चंडमयूख ज्या असम ॥५००॥तो चालतां परमगतिमंत । ज्यामाजी सप्त सप्त पर्वत । त्या सप्तद्वीपांतें रमानाथ । आणि सप्तसिन्धूंतें लंघूनी ॥१॥गेला पार्था सह करुणाकर । लीलालाघवें अतिसत्वर । ऐसें हें निगदिलें मात्र । व्यवस्था समग्र तें ऐका ॥२॥एकएका द्वीपामाजी । सप्तसप्तपर्वतराजी । प्रतिद्वीपा परिघ सहजीं । एका एका सिन्धूचा ॥३॥ऐसिया या अनुक्रमें । तयां लंघिलें पूर्णकामें । क्षणैक न लागतां विक्रमें । सुखसंगमें पार्थाच्या ॥४॥तयानंतरें महागिरी । लोकालोक जो सर्व भूधरीं । परम उच्चतर शृंगसहस्रीं । ग्रहक्षें सारीं ज्या खालें ॥५०५॥ज्याहूनि अर्वाक् प्रकाश । तेथवरीच लोकनिर्देश । परपाठारीं तमविशेष । शून्य आकाश आलोक ॥६॥तया लोकालोकगिरीतें । अतिक्रमूनि कृष्णनाथें । पुधें सुमहत्तम तमातें । वेगें बहुतें प्रवेशला ॥७॥तत्राश्वाः शैब्यसुग्रीवमेघपुष्पबलाहकाह । तमसि भ्रष्टगतयो बभूवुर्भरतर्षभ ॥४९॥प्रावृटीं कुहूची राति । तया तमाची बहु ख्याति । त्याहूनि अनंतगुणें अति । उपमा ज्याप्रति नाडळे ॥८॥जेथ झांकोळे चंडकिरण । तेथ इतरांचा पाड कोण । तये तमीं हय संपूर्ण । जे स्यंदन प्रवाहक ॥९॥शैब्य सुग्रीव मेघपुष्ण । चपळ बलाहक अमूप । जाले गतिभ्रष्ट समपादप । न दिसे अल्प नयनांसी ॥५१०॥नेत्र जालिया केवळ अंध । पुढें जावया न कळे प्रसिद्ध । यास्तव गतिविरहित मंद । जाले स्तब्ध दिव्य हय ॥११॥भरतकुळा माजि वरिष्ट । म्हणोनि भरतर्षभ प्रकट । संबोधनें हे मुनिश्रेष्ठ । कथी सुनिष्ठविष्णुराता ॥१२॥या वरी पुढें तो भगवान । कैसें करी हो स्वगमन । तें ही परिसा सावधान । करूनि मन एकाग्र ॥१३॥तान्दृष्ट्वा भयवान्कृष्णो महायोगेश्वरेश्वरः । सहस्रादित्यसङ्काशं स्वचक्रं प्राहिणोत्पुरः ॥५०॥तयां गतिभ्रष्टां अश्वांप्रति । देखोनियां रुक्मिणीपति । ऐश्वर्यनिधि अमोघकीर्ति । ब्रह्मादि ध्याती पद ज्याचें ॥१४॥जो योगेश्वरांचा महेश्वर । ज्याई अघटितघटनापर । मायासंकल्पें ब्रह्माण्डनिकर । करूनि समग्र सांठवी ॥५१५॥तो मायानियंता यदुराय । सहस्रादित्य प्रकाशमय । स्वचक्र पुढें प्रेरिता होय । अप्रमेयमहरणा ॥१६॥ N/A References : N/A Last Updated : June 13, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP