मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८६ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ८६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ८६ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर भगवांस्तदभिप्रेत्य द्वयोः प्रियचिकीर्षया । उभयोराविशद्गेहमुभाभ्यां तदलक्षितः ॥२६॥तंव तो षड्गुणैश्वर्यवंत । मायालाघवी श्रीभगवंत । जाणोनि दोघांचें हृद्गत । नटला त्वरित द्वयरूपें ॥१७५॥अंतरंगीं स्वभक्तांची । प्रार्थना अंगीकारूनि साची । जाणोनि तयांच्या हृदयींची । प्रेमोत्कंठा सर्वज्ञें ॥७६॥तयांचें प्रिय तें करावयाचे । इच्छेकरूनि द्वयरूपाचें । नाट्य नटला हें मायेचें । लाघव कोण्हा न लक्षतां ॥७७॥उभयतांचे हृदयींचा भाव । जे आमुचे घरा देवाधिदेव । आधीं पातला हा उत्सव । गगनीं स्वयमेव न सांठवे ॥७८॥मी ब्राह्मण अकिंचन । मजवरी तुष्टोनि जनार्दन । आधीं ठाकिलें माझें सदन । म्हणोनि प्रसन्न हृत्कमळीं ॥७९॥माझिया गृहाहूनि अन्यत्र । नाहींच गेला कमळाप्रिय । यास्तव भगवत्कृपेचें पात्र । जालों स्वतंत्र मी एक ॥१८०॥तैसाचि मानी मिथिलेश्वर । प्रेमळ तपस्वी ब्राह्मण थोर । त्याहूनि आधीं मम मंदिर । कृपेनें श्रीधर प्रवेशला ॥८१॥अन्यत्र माझिया सदनाहून । नाहींच गेला जनार्दन । ऐसिया भावें नृपाचें मन । सुखसंपन्न सप्रेमें ॥८२॥पूर्वींच उभयतां ही अधिकारी । साधनचतुष्टयसंपत्ति पुरी । सप्रेमभक्ति अव्यभिचारी । प्रत्ययकारी ज्या आंगीं ॥८३॥यास्तव त्यांतें भगवन्महिमा । निश्चयें आला वयुनावगमा । तदुत्साहें मानिती गरिमा । जैं पातला स्वधामा श्रीकान्त ॥८४॥येर्हवीं जात्यंधाच्या घरीं । प्रकट प्रकटलिया तमारी । प्रकाशप्रतीति तयाच्या नेत्रीं । कीं अंतरीं प्रकटेना ॥१८५॥ज्यातें कळला स्पर्शमहिमा । तो आयसीं प्रकटी हेमा । पाषाणप्रतीति दुर्भगा अधमा । त्या तत्प्रेमा अनोळख ॥८६॥तेंवि बहुलाश्व आणि श्रुतदेव । भगवत्प्रेमगौरव । म्हणोनि स्वधामा गगनोत्सव । मानिती अपूर्व सुखलाभ ॥८७॥दुर्ल्लभ लाभ मानिती पोटीं । तेंचि प्रकटी शुक वाक्पुटीं । परीक्षितीच्या श्रवणपुटीं । श्रोतीं ते गोष्ठी परिसावी ॥८८॥श्रोतुमप्यसतां दूराञ्जनकः स्वगृहागतान् । आनीतेष्वासनाग्र्येषु सुखासीनान्महामनाः ॥२७॥असज्जनांसी महिमा ज्याचा । श्रवणाकारणें दूरतर साचा । मग कोठूनि स्पर्शेल वाचा । अधिकार कैंचा दर्शनीं त्यां ॥८९॥ऐसे दुर्ल्लभतर ईश्वर । स्वगृहा आले हरिमुनिवर । त्यांतें जनक मिथिळेश्वर । जाला सादर अभिगमनें ॥१९०॥दंडवत प्रणाम करूनि भावें । सप्रेम आलिंगूनि आघवे । सभास्थानीं आणूनि बरवे । दिव्यासनीं बैसतील ॥९१॥स्वसुखें उपविष्ट आसनीं । ऐसियांतें देखूनि नयनीं । आनंदला जनक मनीं । महामानव यास्तव तो ॥९२॥प्रवॄद्धभक्त्या उद्धर्षहृदयास्राविलेक्षणः । नत्वा तदङ्घ्रीन्प्रक्ष्याल्य तदपो लोकपावनीः ॥२८॥अनेकजन्मांचे शेवटीं । दुर्ल्लभ लाभ मानूनि पोटीं । प्रेमोत्कर्ष ब्रह्माण्डघटीं । न सांठवत उचंबळला ॥९३॥तया हर्षोत्कर्षें करून । मानस जालें प्रत्यक्प्रवण । साविकाष्टकें हरिलें स्मरण । प्रवृत्तिभान पारुषलें ॥९४॥आनंदाश्रु लोचनीं स्रवती । उभारल्या रोमाञ्चपंक्ती । स्फुंदन कांपवी गात्रांप्रती । पुलकस्वेद स्वरभंगें ॥१९५॥ऐसे सात्विकाष्टकाचें भरतें । आंगीं जिरवूनियां मागुतें । उदया येतां प्रवृत्तीतें । भगवंतातें विलोकिलें ॥९६॥माथा ठेवूनि सर्वां चरणीं । प्रवर्तला पादार्चनीं । मग तें हरिपादप्रक्षाळवणी । धरिलें मूर्ध्नीं सकुटुंबें ॥९७॥लोकत्रयासि पावनकर । हरिपदप्रक्षालनोद्भव नीर । मौळीं वाहे श्रीशंकर । दुर्ल्लभतर तें मानी ॥९८॥ऐसें पदजल वंदूनि माथां । जाहला मुनींसह हरि अर्चिता । तें तूं परिसें कौरवनाथा । सप्रेम कथा भक्तांच्या ॥९९॥सकुटुम्बो वहन्मूर्ध्ना पूजयाञ्चक्र ईश्वरान् गन्धमाल्याम्बराकल्पधूपदीपार्घगोवृषैः ॥२९॥केवळ ईश्वर ते मुनिवर । तयांसहित कमलावर । पूजिता जाहला मिथिलेश्वर । दिव्योपचार अर्पूनियां ॥२००॥करवी दिव्याम्बरें परिधान । दिव्यगंधविलेपन । दिव्यसुमन समर्पून । धूप दीप उजळियेले ॥१॥अर्घपाद्यपूर्वक ऐसी । सपर्या धेनुवृषार्पनेंसीं । नैवैद्य समर्पूनि षड्रसीं । त्रयोदशगुणीं ताम्बूल ॥२॥सफलदक्षिणा नीराजनें । मुकुटीं वाहूनि दिव्य सुमनें । प्रदक्षिणा अभिवंदनें । नमनें स्तवनें स्तुतिपाठ ॥३॥वाचा मधुरया प्रीणन्निदमाहान्नतर्पितान् । पादावङ्कगतौ विष्णोः स्म्स्पृशञ्शनकैर्मुदा ॥३०॥ऐसी सपर्या करूनि नृपति । अमृतप्राय अन्नें तृप्ति । पावविलें तयांप्रति । आसनीं निगुती बैसवूनी ॥४॥अमृतातें ही परतें सर । म्हणे ऐसी वाचा मधुर । तियेंकरूनि वाक्यें रुचिर । मिथिलेश्वर स्वयें वदे ॥२०५॥ सप्रेमप्रीति उपजे पोटीं । ऐसिया सुरसा मधुर गोष्टी । प्रियकर रुचिरा वदोनि वोठीं । बोले वाक्पुटीं हें वचन ॥६॥श्रीविष्णु जो रुक्मिणीकान्त । त्याचे चरण अंकीं धृत । हळु हळु संवाहन करित । आनंदभरित होत्साता ॥७॥काय वचन बोलिला कैसें । तें ही कुरुवर्या परियेसें । भगवंताचीं ऐकतां यशें । पातक न वसे मग निकटीं ॥८॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP