मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ८६ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ८६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ५८ अध्याय ८६ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर राजोवाच - ब्रह्मन्वेदितुमिच्छामः स्वसारं रामकृष्णयोः । यथोपयेमे विजयो या ममास्सीप्तितामही ॥१॥कुरुनृप म्हणे ब्रह्मनिष्ठा । वासिष्ठाग्रणी परम श्रेष्ठा । मम मानसीं जे उत्कंठा । ते वरिला पुरवावी ॥७॥उत्कंठेचा करितों प्रश्न । तो निरूपीं विस्तारून । विशेष करितां हरिगुणश्रवण । न पवे मम मन तृप्तीतें ॥८॥तरी ऐकें गा योगिराया । सुभद्रानामें वसुदेवतनया । प्राप्त जाली धनंजया । कोण्या उपायें तें सांग ॥९॥जे कां रामकृष्णांची बहिणी । रामेम सुयोधना लाहूनी । देऊं इच्छिली तीतें हरूनी । करी निज गृहिणी कौन्तेय ॥१०॥आणि माझी ते पितामही । दुष्प्राप्य असतां द्वारकानिलयीं । विजयें कैसी वरिली पाहीं । भवायी मज सांगें ॥११॥श्रीशुक उवाच - अर्जुनस्तीर्थयात्रायां पर्यटन्नवनीं प्रभुः । गतः प्रभासमशृणोन्मातुलेयीं स आत्मनः ॥२॥शुक म्हणे कौरवपाळा । तीर्थयात्रार्थ फिरतां इळा । अर्जुन प्रभासक्षेत्रा आला । तेथ ऐकिला वृत्तान्त ॥१२॥तो वृत्तान्त कैसा म्हणसी । मातुळकन्या लावण्यराशी । राम देऊं इच्छी तयेसी । दुर्योधनासी स्नेहभरें ॥१३॥प्रभुत्वें जो निजांगवणें । एकला त्रिजगा समरीं जिणे । गुह्य वृत्तान्त आपुल्या श्रवणें । ऐकिला तेणें तो ऐका ॥१४॥दुर्योधनाय रामस्तां दास्यतीति न चापरे । तल्लिप्सुः स यतिर्भूत्वा त्रिदण्डी द्वारकांमगात् ॥३॥मातुळतनया संकर्षणें । द्यावी दुर्योधनाकारणें । ऐसें इच्छिलें निजमनें । हें अपरें कोणें न इच्छिलें ॥१५॥कृष्ण देवकी वसुदेव । आणि समस्तही यादव । ते ही बळरामाचा भाव । ऐकोनि सर्व नादरिती ॥१६॥अर्जुनें ऐसी ऐकोनि गोष्टी । सुभद्राहरणलिप्सा पोटीं । धरूनि त्रिदंडियतिवरनटीं । नटला कपटी कापट्यें ॥१७॥काषाय कमंडलु त्रिदंड । प्रानवजाप्ये बुटबुटी तोंड । बहिर्वासार्थ वसनखंड । कशिपु कौपीन भस्मलेप ॥१८॥मातुळकन्येचा लिप्साळु । त्रिदंडिवेषें वंचिजे बळु । यतिवेष पूज्यतम केवळु । दावूनि समळ कामेच्छु ॥१९॥ऐसा अर्जुन प्रबासक्षेत्रीं । सुभद्रावृत्तान्त ऐकूनि श्रोत्रीं । यतिवरवेषें द्वारकापुरीं । रिघतां नेत्रीं जन पाहती ॥२०॥देखूनि त्रिदंडियतिवरवेष । नमिती नागरजन अशेष । म्हणती वार्षिक चार्ही मास । कीजे निवास येथ स्वामी ॥२१॥तत्र वै वार्षिकान्मासान्न्यवात्सीत्स्वार्थसाधकः । पौरैः सबाजितोऽभीक्ष्णं रामेणाजानता च सः ॥४॥ऐकूनि जनांची प्रार्थना । मानस तत्पर सुभद्राहरणा । स्वकार्यसाधक यतिवरराणा । राहिला जाणा स्वस्थमनें ॥२२॥काया निश्चळ स्वस्थासनीं । दृढतर मौनें वाङ्नियमनीं । ध्यानस्थ मानस सुभद्राहरणीं । दंभाचरणी तपोधन ॥२३॥त्यातें भाविक द्वारकावासी । नेऊनि पूजिती स्वसदनासी । म्हणती स्वामी चरणस्पर्शीं । पावन कीजे निलयातें ॥२४॥द्वारकापुरीं लोक बहळ । प्रार्थना करिती सर्वकाळ । त्यांमाजी ज्याचें भाग्य सफळ । तो ने केवळ निजसदना ॥२५॥ऐसा द्वारकापुरपाटनीं । बहुसाळ भजकांची दाटणी । न येची कोणाचे वाटणीं । नित्य निमंत्रणीं निमंत्रितां ॥२६॥रामे नेणोनि कपटवेश । जाणोनि त्रिदंडी तापस । नेला स्वसदनीं भिक्षेस । प्रार्थना विशेष करूनिया ॥२७॥एकदा गृहमानीय आतिथ्येन निमन्त्र्य तम् । श्रद्धयोपाहृतं भैक्ष्यं बलेन बुभुजे किल ॥५॥करूनि सद्भावें अर्चन । पात्रीं वोगरिलें दिव्यान्न । प्रणवोदकें तें प्रोक्षून । केलें भोजन यतीश्वरें ॥२८॥ऐसाचि पंचसप्तवार । रामें पूजिला यतीश्वर । श्रद्धापूर्वक सोपस्कर । कपटाचार नेणोनी ॥२९॥अपूर्व कोणे एके दिवसीं । रामें निमंत्रित संन्यासी । नेऊनियां स्वसदनासी । सप्रेमेंसीं पूजियला ॥३०॥रामें सप्रेमें अर्पिलें भैक्ष्य । अर्जुनें भक्षिलें तें निःशेष । तंव देखिलें सुभद्रेस । वेधलें मानस तें ऐका ॥३१॥ N/A References : N/A Last Updated : June 12, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP