मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक ५१ ते ५४ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५१ ते ५४ Translation - भाषांतर राजसूयावभृथेय स्नातो राजा युधिष्ठिरः । ब्रह्मश्रत्रसभामध्ये शुशुभे सुरराडिव ॥५१॥राजसूयमख संपूर्ण । धर्में करूनि अवभृथस्थान । सभास्थानीं देदीप्यमान । इंद्रसमान विराजला ॥८४॥दीक्षिता ब्राह्मणांमाजि श्रेष्ठ । प्रतापें क्षत्रियांमाजि वरिष्ठ । भद्रपीठासनीं उपविष्ट । शोभे त्रिविटपपति जैसा ॥४८५॥राज्ञा सभाजिताः सर्वे सुरमानवखेचराः । कृष्णं ऋतुं च शंसंतः स्वधामानि ययुर्मुदा ॥५२॥अवभृथानंतर सभास्थानीं । कुळशिळशौर्यगुणी । राजे पूजिले बहुसम्मानीं । वस्त्राभरणीं यथोचित ॥८६॥यज्ञा पातले अमरवर । धर्में अर्चिले ते समग्र । सर्ववर्णात्मक मानव अपर । यथोपचारें गौरविले ॥८७॥सुर भूसर खेचर नृपती । अपर मानव समस्त याती । धर्में पूजिले संतुष्टमनी । स्वधामा जाती पुसोनियां ॥८८॥स्वधामा जातां पृथगाकर । म्हणती धन्य युधिष्ठिर । धन्य राजसूय अध्वर । धन्य श्रीधर अभिगोप्ता ॥८९॥निर्विघ्न राजसूय संपला । ऐसा नाहींच कैं ऐकिला । अथवा भावी आणिकांला । न वचे केला भूचक्रीं ॥४९०॥धर्मयज्ञाची साङ्गता । स्वमुखें वर्णूं न शके धाता । जेथ उच्छिष्टें रमाभर्ता । काधी तत्त्वता स्वानंदें ॥९१॥एक म्हणती सर्वकृत्य । कृष्णें साधिलें अतंद्रित । पाण्डवस्नेहें सप्रेमभरित । करी नृत्य तत्सदनीं ॥९२॥एरवीं एथ महाघोर । विघ्नें उदेलीं होतीं थोर । रक्षिता सधर कमलावर । म्हणोन अध्वरवर झाला ॥९३॥विप्रवेशें अतिथिवेळे । मागध छळिला याञ्चाछळें । भीमहस्तें तो घननीळें । द्वंद्वयुद्धीं निर्दळिला ॥९४॥मागधबंदीचे सुटले नृपति । अनुकूळ झाले धर्माप्रति । भूमंडळींच्या सर्व संपत्ति । आणिल्या श्रीपतीप्रतापें ॥४९५॥अग्रपूजेचिया काळीं । निन्दिला शिशुपाळें वनमाळी । कृष्णें त्याचा छेदिला मौळी । दुष्ट हृत्कमळीं भंगले ॥९६॥ऐसीं विघ्नें भंगिलीं कृष्णें । मखेन्द्र सिद्धी गेला तेणें । एक म्हणती पूर्वपुण्यें । धर्माचिया हें घडलें ॥९७॥धर्म भक्तिप्रेमाथिला । म्हणोनि कृष्ण सेवक झाला । राजसूय सिद्धी नेला । आनंद केला त्रिजगातें ॥९८॥धर्माचिया यज्ञेंकरून । लोकत्रयीं कृतकल्याण । एका दुर्योधनावांचून । आब्रह्मभुवन संतुष्ट ॥९९॥दुर्योधनमृते पापं कलिं कुरुकुलामयम् । यो न सेहे श्रियं स्फीतां दृष्ट्वा पांडुसुतस्य ताम् ॥५३॥पापराशि दुर्योधन । जो कलीचा अवतार पूर्ण । कुरुकुळासी क्षयकारण । रोग निर्वाण केवळ जो ॥५००॥रोगें क्षीण होय शरीर । तेंवि कुरुकुळा जो क्षयकर । तया दुर्योधनाविण इतर । त्रिजग समग्र संतुष्ट ॥१॥युधिष्ठिर जो पाण्डुसुत । झाला साम्राज्यपट्टाभिषिक्त । त्याची लक्ष्मी परमोर्जित । जळे पाहून जो पोटीं ॥२॥तो एक दुर्योधन वेगळा । करूनि उत्साह त्रिजगीं सफळां । धर्माध्वरें कौरवकुळा । वरिती झाली यशोलक्ष्मी ॥३॥यावरी म्हणे शुक सर्वज्ञ । हा इतिहास जे करिती श्रवण । ऐका तयांचें महिमान । निश्चळ मन करूनियां ॥४॥य इदं कीर्तयेद्विष्णोः कर्म चैद्यवधादिकम् । राज्ञां मोक्षं वितानं च सर्वपापैः प्रमुच्यते ॥५४॥जो हें विष्णूचें कर्म विशद । जैसा केला चैद्यवध । आदिशब्दें खळ मागध । वधिला द्वंद्वसमरंगीं ॥५०५॥आणि नृपांचें विमोक्षण । राजसूयमखसाधन । भावें करील संकीर्तन । पापापासून तो सुटला ॥६॥अनंतमहापापांच्या राशी । भस्म होती या इतिहासीं । कीर्तन करितां सद्भावेंशीं । पावे मुक्तीशीं चैद्यवत ॥७॥विशेष आराधनप्रेमें । युधिष्ठिरासम मेघश्यामें । महासंकटें पूर्णकामें । स्नेहसंभ्रमें रक्षिजे ॥८॥आराधक तो युधिष्ठिर । विभोक्तभक्त चैद्येश्वर । द्विविध भजनें परमेश्वर । भजतां मोक्षद तें कथिलें ॥९॥ऐसें श्रीकृष्णचरित्र । पथन करील ज्याचें वक्त्र । अथवा ऐकती ज्यांचें श्रोत्र । कैवल्यपात्र ते होती ॥५१०॥तें हें श्रीमद्भागवत । अठरा सहस्र श्रुतिनिर्मथित । श्रोता परीक्षिति नृपनाथ । वक्ता समर्थ शुक योगी ॥११॥तयामाजी दशमस्कंधीं । धर्माध्वरीं नृपसंसदीं । मागध चैद्य वधिले दंदी । कथा सुमंदी ते कथिली ॥१२॥इचिया श्रवणीं पठनीं मननीं । कैवल्य पाविजे श्रोतृजनीं । फलादेश हा बादरायणि । नृपालागुनी प्रशंसी ॥१३॥ब्रह्मनिष्ठां अग्रगणी । तो श्रीएकनाथ प्रतिष्ठानीं । चिदानंदें स्वानंदभुवनीं । भद्रासनीं विराजला ॥१४॥स्वानंदकृपासंभव चांग । गोविन्दपादप्रभवगाङ्ग । दयार्णवीं तें भरलें साङ्ग । कृपापांगें प्रभूचिया ॥५१५॥तें हें कथामृत जे घेती । विष्णुभुवनीं ते विराजती । यालागीं अत्यादरें तें श्रोतीं । सेवूनि श्रीपति वश कीजे ॥१६॥पुढले अध्यायीं इतिहास । सिंहावलोकनें गतकथेस । प्रश्न करितां कुरुनृपास । शुक अशेष निरोपील ॥१७॥तें आख्यान वक्ष्यमाण । पंचसप्ततितमीं जाण । श्रोतीं सावध कीजे श्रवण । भवभंजन करावया ॥५१८॥इति श्रीमद्भागवते महापुराणे अष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संदितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां चैद्यवधादिराजसूयकथनं नाम चतुःसप्ततितमोऽध्यायः ॥७४॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥५६॥ ओवी संख्या ॥५७४॥ एवं संख्या ॥५७४॥ ( चौर्याहत्तरावा अध्याय मिळून ओवी संख्या ३४२०५ ) कालयुक्ताब्दिके कृष्णें माधवे द्वादशी दिने । पिपीलिकायां संख्यातं राजसूयमखादिकम् ॥१॥चौर्याहत्तरावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP