मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर श्रुत्वा द्विजेरितं राजा ज्ञात्वा हार्दं सभासदाम् । समर्हयद्धृषीकेशं प्रीतः प्रनयविह्वलः ॥२६॥तेथ राजा युधिष्ठिर । ऐकूनि विप्रवाणीचा गजर । जाणोनि सदस्यांचें अंतर । जाला निर्भर स्वानंदें ॥२७॥सर्व भूतळींचे भूपती । भीष्मप्रमुख जे महारथी । त्यांचें हृद्गत जाणोनि प्रीती । अग्रीं श्रीपति अर्चितसे ॥२८॥रुग्णा प्रियतम पथ्य कथिलें । कीं तृषिता अमृत प्राप्त झालें । कीं जात्यंधासि नेत्र आले । तेंवि मानिलें सुख धर्में ॥२९॥कृष्ण प्राणाचा प्रियतम । कृष्ण त्रिजगाचा हृदयंगम । कृष्ण केवळ पुरुषोत्तम । हें जाने धर्म हृत्कमळीं ॥२३०॥कृष्णें रक्षिलें जोहरीं । कृष्णें पांचाळी नोवरी । योजिली पाण्डवां स्वयंवरीं । कृष्ण कैवारी सर्वस्वीं ॥३१॥कृष्णें पाठीची सुभद्रा बहिणी । अर्जुन प्रवर्तला तिचे हरणीं । तैं बोधूनि यादवश्रेणी । पाणिग्रहणीं समर्पिली ॥३२॥जरासंधा समरांगणीं । भूतळीं जिंकूं न शके कोण्ही । कृष्ण घेऊनि द्विज अवगणीं । अघटित करणी करूनियां ॥३३॥निर्दळिलें बार्हद्रथा । मुक्त केल्या नृपांच्या चळथा । येरव्हीं मागध जित असतां । केंवि हा होतां राजसूय ॥३४॥कृष्ण आमुचा प्रिय प्राण । कृष्ण आमुचें ध्येय ध्यान । कृष्णवेगळा त्रिजगीं आन । श्रेष्ठ नाहीं हें मी जाणें ॥२३५॥परंतु आपुले मखप्रसंगीं । आज्ञा न देतां सदस्यवर्गीं । अर्पितां अग्र्यार्हण श्रीरंगीं । लागे आंगीं मूर्खत्व ॥३६॥म्हणोनि प्रार्थिले सदसस्पति । तेथ सहदेव बाळमति । बोलिला तें सर्वांप्रति । मान्य झालें मम भाग्यें ॥३७॥महर्षि ब्रह्मर्षि देवर्षी । भूभुजवरिष्ठजे राजर्षी । सर्वां मान्य हृषीकेशी । अग्रपूजेतें पूज्यतम ॥३८॥ऐसी आज्ञा सदस्यगणीं । दिधली ते म्यां धरिली मूर्ध्नीं । परमानंदें चक्रपाणी । अग्रपूजनीं बैसविला ॥३९॥ऐकूनि सभ्यांचें अनुमत । धर्मराजाही सप्रेमभरित । भावी लक्षून अभीष्ट कृत्य । पूजा भगवंत मान्य करी ॥२४०॥रत्नपीठीं सदस्याग्रणीं । प्रतिष्ठूनि चक्रपाणी । द्विजगणांच्या मंत्रपठनीं । धर्म पूजनीं प्रवर्तला ॥४१॥विधिप्रबोधी धौम्यवचनें । धर्म तैसेंचि तनुवाड्मनें । आचरे जेंवि सूत्रचळनें । करी नर्तन सायखडें ॥४२॥कनकपात्र मांडूनि तळीं । धर्म हरिचरणा प्रक्षाळी । कनककलशीं गंगाजळीं । धारा ओती सहदेव ॥४३॥हृदयीं नयनीं निढळीं मौळीं । पाद स्पर्शोनि पुशिले चैलीं । पीठीं प्रतिष्ठूनि ते काळीं । साङ्ग आदरली सपर्या ॥४४॥चंद्रकान्ताच्या चौरंगीं । मृदुल चित्रासन झगमगी । हंसतूळिका तदुपयोगी । क्षीरोदचौघडि त्याउपरी ॥२४५॥गमे क्षीराब्धि तिये काळीं । आपणा सांडूनि कां वनमाळी । आला म्हणोनि आसनातळीं । वसनसंभ्रमें विराजला ॥४६॥करूनि पादप्रक्षालन । आसनीं उपविष्ट श्रीभगवान । उभयभगीं भीमर्जून । उपचारदानें ओळंगती ॥४७॥व्यजनचामरें घेऊनि चौघे । द्रौपदीतनय उभयभागें । छत्र धरूनि तिष्ठे मागें । प्रतिविंध्यनामा तें काळी ॥४८॥रत्नजडित श्रीपादुका । धरूनि अभिमन्यु ठाकला निका । निर्जर निरखोनियां कौतुका । मानिसी हरिखा हऋतकमळीं ॥४९॥मंगळवाद्यें वाजती मदुरें । सात्वक कीर्तनें करिती गजरें । सुरवर गर्जती जयजयकारें । सुमनासारें वर्षती ॥२५०॥नारदसनकाद्क वैखानस । पूर्णानंदें पावले तोष । धर्में पूजितां हृषीकेश । त्रिजगीं उल्हास उथळला ॥५१॥पादावनेजन पात्रीं धरिलें । म्हणाल काय केलें । न्यसपुत्रें निरोधिलें । तेंही कथिले जातसे ॥५२॥तत्पादावनेजनाआपा शिरसा लोकपावनीः । समर्थ सान्ज्यमयः सुकुटुंबोऽबहन्मुदा ॥२७॥कृष्ण पादावज्नेजनआष । निरसिती ब्रह्माण्डगर्भींच्या तापा । तीथें पक्षाळिनी निजतापा । जनसंकल्पस्तववजनिता ॥५३॥लोकपावनी मंदाकिनी । दुसरेन जन्मली श्रीकष्णचरणीं । परमादनंदें वाहिली मूर्ध्नीं । शंभुसमान युधिष्ठिरें ॥५४॥भार्या बंधु अमात्य मंत्री । कुटुम्बेंसहित सह परिवारीं । धर्मराजें सर्वगात्रीं । आणि पवित्रीं स्वीकेली ॥२५५॥पादावजेजन वंदिले ऐसें । त्यावरीं अर्जुन जालें कैसें । कुरुवर्या तें सावध परिसें । म्हणे संतोषें शुकवक्ता ॥५६॥वासोभिः पीतकौशेयैर्भ्षणश्च महाधनैः । अर्हयित्वाश्रुपूर्णाक्षो नाशकत्समविक्षितुम् ॥२८॥परिधानप्रावरणादि उपचारें । अर्पिलीं बहुविध पीताम्बरें । रत्नखचित भूषणें रुचिरें । परमभाम्बरें लेवविलीं ॥५७॥मुकुट कुंडलें कंठाभरणें । केयूराङ्गदें करकंकणें । मुद्रिकांवरी जडिलीं रत्नें । भास्करकिरणें लाजविती ॥५८॥आपाद वैजयंतीमाळा । कौस्तुभ श्रीवत्साङ्काजवळा । माणिक मुक्तफळांच्या किळा । तेजागळिया देदीप्य ॥५९॥जडित मेखळा कटितटीं । सुरत्नजडिता क्षुद्रघटी । तोडरीं दितिजांचीं मुखवटी । वांकी नूपुरें रुणझुणती ॥२६०॥ऐसीं अर्पूनि वस्त्राभरणें । ब्रह्मसूत्र पृथगाचमनें । त्यावरी दिव्य विलेपनें । मलयजचंदनें कस्तूरिका ॥६१॥केशरतिळक रेखिला पिंवळा । कुङ्कुमाक्षता माणिक्यकिळा । आंगीं चंदन चर्चिला धवळा । मंदारमाळा समर्पिल्या ॥६२॥मुकुटीं तुरंबिले अवतंस । निर्विकल्प कल्पतरूचे घोष । सुगंधशलाका आग्नेयांश । योजूनि धरिती द्विभागीं ॥६३॥कनकपात्रीं एकारती । फळपुष्पान्नें रत्नज्योती । कुरवंडूनि विसर्जिती । श्रीकृष्णमूर्तीवरूनियां ॥६४॥दिव्योपहार नैवेद्य सुरस । अमृतोपम फळविशेष । ताम्बूलद्रव्यें त्रयोदश । अर्पिलीं जाजीफळप्रमुखें ॥२६५॥कायावाचामनधनेंसीं । साङ्गोपाङ्ग दक्षिणेशीं । धर्म अर्पीं बंधुवर्गेंसी । अनन्यप्रेमें हरिचरणीं ॥६६॥बहळ उधळूनि परिमळरोळा । श्रवणीं पौष्पज मधु चर्चिला । दिव्य पोतास उजळिला । कनकपर्यळीं नीरांजनें ॥६७॥बहुविध आरतिया गायनें । द्विजवर करिती सूक्तपठनें । चहूं वेदींचीं भिन्नभिन्नें । शाखापरत्वें बहुशाखीं ॥६८॥अनेक वाद्यांचिया ध्वनी । गंधर्व गाती तानमानीं । सात्वत नाचती कीर्तनीं । नामस्मरणीं सर्व सभा ॥६९॥पुष्पाञ्जळी समर्पून । सबंधुधर्में साष्टाङ्गनमन । करूनि सप्रेमें प्रदक्षिण । स्तवनीं मौन विसर्जिलें ॥२७०॥ॐनमोजी श्रीजनार्दना । त्रिजगज्जनका जयवर्धना । जगत्पति जलजेक्षणा । जन्ममरणा जहि अजिता ॥७१॥करुणासिन्धु कलुषान्तका । कपटकटाहविपाटका । कलिमलकरटिकुम्भभंजका । कंठीरवा कंसारे ॥७२॥मंगलायतना मंगलनामा । मंगलजनका मंगलधामा । मंगलपूर्णा पूर्णकामा । पुरुषोत्तमा पुरातना ॥७३॥ऐसी अनेकपरी स्तुति । करूनि पुढती केली प्रणति । सप्रेम लक्षूनि श्रीकृष्णमूर्ति । प्रेमाश्रुपातीं भू भिजवी ॥७४॥चरणापासूनि मुकुटवरी । स्वर्चित पाहों न शके हरी । दृष्टिदोषाचिये परिहारीं । करी कुरवंडी भेदाची ॥२७५॥ परमानंदीं निमग्न वृत्ति । फावली चिन्मात्रैकविश्रान्ति । ऐसिये दशेच्या सज्जनपंक्ति । प्रत्यय भोगिती तो तेव्हां ॥७६॥इत्थं सभाजितं वीक्ष्य सर्वे प्रांजलयो जनाः । नमो जयेति नेमुस्तं निपेतुः पुष्पवृष्टयः ॥२९॥ऐसा धर्में अग्रपूजनीं । सप्रेम पूजिला चक्रपाणी । त्यातें सदस्यीं देखोनी । हृदयभुवनीं संतुष्ट ॥७७॥बद्धाञ्जलि समस्त जन । उभे ठाकलै निरभिमान । करिती जयशब्दें गर्जन । नमोनमस्ते म्हणोनियां ॥७८॥पुष्पाञ्जलि कृष्णावरी । सर्व टाकिती जयजयगजरीं । मंत्रपुष्पें ऋषीश्वरें । स्वस्ति म्हणोनी टाकिलीं ॥७९॥विमानीं दाटल्या सुरवरथाटी । तिहीं केलिया पुष्पवृष्टी । परमानंदें ब्रह्माण्डमठीं । तिये घटिकेचा न समाये ॥२८०॥कृष्णपूजनें लोकत्रय । ऐसें जालें आनंदमय । विरोधी भक्तांचा समुदाय । निसर्गभजनीं प्रवर्तला ॥८१॥जयामाजी जितुकी शक्ति । तदनुसार ते करिती भक्ति । जिह्वा रसस्वादाची भोक्ती । रुचि औपस्थीं ते नेणे ॥८२॥रसना करितां षड्रसपान । तेणें क्षोभे जेंवि अपान । सुरभिगंधा शंसी घ्राण । त्याचें भंजन करी स्वयें ॥८३॥एकचि देहीं विरोध करणा । तैसाचि सज्जना दुर्जना । परस्परें विरोध भजना । दृष्ट सज्जना न साहती ॥८४॥यावरी तेंचि निरूपण । ऐका होऊनि सावधान । धर्में करितां हरिपूजन । क्षोभें दुर्जन उठावला ॥२८५॥इत्थं निशम्य दमघोषसुतः स्वपीठादुत्थाय कृष्णगुणवर्णनजातमन्युः ।उत्क्षिप्य बाहुमिदमाह सदस्यमर्षी संश्रायवन्भगवते परुषाण्यभीतः ॥३०॥एका जळें मोगरे जाती । दिव्य सौरभ्यें मघमघिती । पुंगळवेली पाल्हालती । तयाचि जलें दुर्गंधा ॥८६॥नातरी माधुर्यें गोस्तनी । तैक्त्यें प्रसवे इंद्रवारुणी । आसुरीदैवीसंपत्ति गुणीं । तेंवि हे दोन्ही दुष्टेष्ट ॥८७॥अग्रपूजनीं पूजितां हरि । साधु गर्जती हरियशोगजरीं । दमघोषतनय तें ऐकूनि श्रोत्रीं । क्षोभें अंतरीं प्रज्वळला ॥८८॥इत्थं म्हणिजे पूर्वोक्तरीती । कृष्णयशाच्या ऐकूनि उक्ति । अत्यंत क्रोध उपजला चित्तीं । जो प्राणान्तीं अनावर ॥८९॥सवेग तेणें क्रोधेंकरून । उठिला निजासनापासून । दक्षिण बाहु उभारून । सदस्यांलागून निखंदी ॥२९०॥बोले सदस्यांकारणें । कृष्णातें करी ऐकवणें । मर्मस्पर्शें कठोर वचनें । निर्भयपणें मुमुर्षु ॥९१॥श्रवणाप्रति लागती कटु । जियें ऐकतां उपजे विटु । ऐसीं वचनें घडघडाटु । बोले पापिष्ठ तें ऐका ॥९२॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP