अध्याय ७४ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगणेशायनमः ॥ श्रीपाण्डुरंगसहाय ।
जयजय जनका जगन्मया । जगदुत्पत्तिस्थितिलयनिलया । जगत्कल्यणकीर्तिनिचया । श्रीगुरुवर्या गोविन्दा ॥१॥
तव पदस्मृतीचा सोज्ज्वळ तरणी । प्रकट होतां हृदयगगनीं । हरिगुणपरागें मतिकमलिनी । विद्वद्भृंगा निमंत्री ॥२॥
त्रिसप्ततितमाध्याया अंतीं । ऐकोनि जरासंधशान्ति । अष्टभावांची सुखोत्पत्ति । धर्माप्रति उपलब्ध ॥३॥
तेणें ताटस्थ्य तनूच्या ठायीं । वाचेशीं मौनमुद्रा पाहीं । ते विमुक्त ये अध्यायीं । करूनि बोले युधिष्ठिर ॥४॥
तो हा चौतःसप्ततितम । अध्याय परिसा उत्तमोत्तम । ज्यामाजी राजसूयसंभ्रम । चैद्य अधम निवटेल ॥५॥
यज्ञसंकल्पार्थ मागध । भीमहस्तें पावला वध । येथ मखान्तीं द्वेष्टा चैद्य । वधील आद्य जगदात्मा ॥६॥
हें सविस्तर निरूपण । ये अध्यायीं कीजे श्रवण । वक्ता व्यासाचा नंदन । सावधान म्हणे नृपा ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : June 01, 2017
TOP