मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर जन्मत्रयानुगुणितवैरसंरब्धया धिया । ध्यायंस्तन्मयतां यातो भावो हि भयकारणम् ॥४६॥म्हणाल निन्दकाची चैतन्यज्योति । कैसी प्रवेशली भगवंतीं । तरी जन्मत्रयाची विरोधभक्ती । कारण तद्गतीतें जाणा ॥४३॥जन्मत्रयीं वैरानुबंध । तेणें ध्याननिष्ठा साधली शुद्ध । चरमदेहीं गमला चैद्य । ध्यानें स्वरूप लाधला ॥४४॥वैरें ध्याननिष्ठा चित्ता । अवस्थात्रयीं विसर न पडतां । दृढ बाणली तन्मयता । तेणें स्वरूपता पावला ॥४४५॥स्वरूपता मुक्ति पावला विशद । यथापूर्व जाला पार्षद । तस्मात भावना जन्मप्रद । निगमानुवाद हा सत्य ॥४६॥करणद्वारा विषयाध्यास । संस्कारजनितकर्महव्यास । सत्य मानूनि विश्वाभास । कलेवरास जैं टाकी ॥४७॥तैं संकल्पान्तःपाती । कर्मसंस्कारबीजें होती । तदनुसार परिणमे वृत्ती । जन्म पावती तद्रूपें ॥४८॥वैरानुबंधें तदाकार । अवस्थात्रयीं निरंतर । ध्यानें वृत्ति झाली स्थिर । पडतां शरीर तद्योगें ॥४९॥वैरें भगवन्मूर्तिध्यान । वस्तुसामर्थ्यें अघभंजन । नितान्त निर्मळ शुद्ध चैतन्य । गेलें मिळोन भगवंतीं ॥४५०॥करणद्वारा विषयाभिलाषें । ध्यानसंकल्प दृश्याभासें । देह पडतां भवभ्रमपिसें । जन्मे आपैसें न फिटतां ॥५१॥तैसें नोहे भगवद्ध्यान । ध्यानें नितान्त निर्मळ मन । विशुद्ध होय संकल्पशून्य । समरसोन हरि होय ॥५२॥यया नाम वैधदीक्षा । वेधें साधिती लयलक्षा । आत्माकार होतां दक्षा । पावणें मोक्षा या योगें ॥५३॥कीटकी केवळ अज्ञान जड । भयें भृंगीचें ध्यान दृढ । लागतां तद्रूप होय उघड । वेधें अवघड घडे ऐसें ॥५४॥तस्मात भावच कारण भवा । हा गुह्यार्थ साहकां सर्वां । दृढनिश्चयें असो ठावा । दयार्णवा कळवळा हा ॥४५५॥विषयीं मानसा न कीजे वेध । गुरुमुखें आपुला करूनि शोध । पूर्णत्वाचा अपरोक्षबोध । प्रत्यगात्मत्वा वेधावें ॥५६॥असो साधका शिकवण । करावया माझा अधिकार कोण । जरी मी पायींची वहाण । म्हणा लोचना सुखदायी ॥५७॥असो शिशुपाळाची कथा । त्यावरी युधिष्ठिरें तत्त्वता । पूजिलें ऋत्विजां समस्तां । तें कुरुनाथा अवधारीं ॥५८॥ऋत्विग्भ्यः ससदस्येभ्यो दक्षिणां विपुलामदात् । सर्वान्संपूज्य विधिवच्चक्रेऽवभृथमेकराट् ॥४७॥विपुळ दक्षिणा ऋत्विजांप्रती । धर्में पूजूनि अर्पिली निगुती । सदस्य पूजिले येथोचितीं । कुळशीळादि लक्षूनी ॥५९॥याचक इच्छारहित केले । ज्येष्ठ श्रेष्ठ सम्मानिले । सम्रट्पदीं अभिषेकिले । तिहीं समस्तीं धर्मातें ॥४६०॥धर्मराजाचे आज्ञेवरून । चैद्या उत्तरक्रियाचरण । तत्पुत्रातें भद्रासन । सर्वभूभुजीं दीधलें ॥६१॥राजसूय साङ्ग जाहला । अवभृथस्नानोत्सव संपला । सिंहावलोकनें पुन्हा कथिला । जाईल पुढिले अध्यायीं ॥६२॥यज्ञ संपूर्ण झालियावरी । इंद्रप्रस्थीं राहिला हरी । कित्येक मास सप्रेमभरीं । सुहृदादरीं तें ऐका ॥६३॥साधयित्वा ऋतुं राज्ञः कृष्णो योगेश्वरेश्वरः । उवास कतिचिन्मासान्सुहृद्भिरभियाचितः ॥४८॥योगेश्वरांचा ईश्वर । कृष्ण केवळ परमेश्वर । तेणें रायाचा ऋतुवर । संपादूनियां निर्विघ्न ॥६४॥परिवासेंसीं द्वारके जाया । उदित आज्ञा मागावया । सुहृद्वर्गीं प्रार्थूनियां । कित्येक मास राहविला ॥४६५॥समस्त पाण्डवांचिये भक्ती । सुभद्राद्रौपदीपृथेचे प्रीती । सभार्य ससैन्य श्रीपती । इंद्रप्रस्थीं स्थिरावला ॥६६॥तेथ क्रिमिले कित्येक मास । पुढती जावया द्वारकेस । धर्मा प्रार्थी हृषीकेश । तें नृपास शुक सांगे ॥६७॥ततोऽनुज्ञाप्य राजानमनिच्छंतमपीश्वरः । ययौ सभार्यः सामात्यः स्वपुरं देवकीसुतः ॥४९॥कित्तेक मास क्रमिल्यावरी । धर्मरायातें प्रार्थी हरी । आज्ञा द्यावया निजान्तरीं । धर्म नादरी प्रार्थना ॥६८॥श्रीकृष्णासी आज्ञा देणें । सर्वदा धर्म हें नेच्छी मनें । तथापि बहुधा प्रार्थूनि कृष्णें । आज्ञा घेऊनिं निघाला ॥६९॥सवें सर्वही अंतःपुर । मंत्री सचिव सेनाधर । तिहीं सहित देवकीकुमर । पावला स्वपुर स्वानंदें ॥४७०॥वर्णितं तदुपाख्यानं मया ते बहुविस्तरम् । वैकुंठवासिनोर्जन्म विप्रशापात्पुनःपुनः ॥५०॥वैकुंठवासी हरिपार्षद । विप्रशापास्तव ते विशद । दैत्य जाले महादुर्मद । प्रथमजन्मीं हरिद्वेष्टे ॥७१॥नामें हरिण्याक्ष हरिण्यकशिपु । ज्यांचा लोकत्रयीं प्रतापदर्पु । भगवद्द्वेष्टे क्रूर अमूप । अहंताजल्पें प्रजल्पती ॥७२॥ न घेती महाविष्णूचें नाम । इतरां मुखें ऐकतां अधम । स्मरतियां दाविती कृतान्तधाम । हा दृढ नेम जयांचा ॥७३॥वराहनृसिंहवेषें हरी । तया दैत्यांतें संहारी । द्वेषें दृढतर त्यां अंतरीं । ध्यान निर्धारीं ठ्सावलें ॥७४॥ध्यानयोगें तमोपशमन । पुढें तमाक्त रजोगुण । उरला यास्तव पावले जनन । राक्षसयोनी माझारी ॥४७५॥रावण कुंभकर्ण ते दोघे । शरीरें केवळ प्रळयमेघ । प्रतापें जिंकोनियां त्रिजग । लंकादुर्ग आश्रयिलें ॥७६॥रमाभिलाप रमारमण । शत्रु मानूनि करितां ध्यान । जालें रजतमा क्षालन । विरोधभजनसंस्कारें ॥७७॥पुढें रजतमाक्त सत्त्व मात्र । उरला यास्तव मनुष्यगात्र । जाले प्रतापी भूवर । पूर्वसंस्कारें हरिद्वेष्टे ॥७८॥ते हे शिशुपाळ वक्रदंत । हनना अवतरला कृष्णनाथ । पूर्वसंस्कारें विरोधयुक्त । सुहृद प्राप्त असतांही ॥७९॥विरोधभजनीं तृतीयभवीं । शिशुपाळ समरसला केशवीं । ध्यानयोगाची हे पदवी । तुज म्यां आघवी निरोपिले ॥४८०॥ध्यानें जळाले त्रिगुणमळ । जाहला नितान्त निर्मळ । निंदामिसे स्तवनरोळ । करितां केवळ हरि झाला ॥८१॥विप्रशापीं पुनःपुनः । वैकुण्ठवासीं पावले जनना । सविस्तर म्यां तदाख्याना । केलें कथना कुरुवर्या ॥८२॥प्रसंगें वक्रदंताचीही कथा । कथिजेल तें असो आतां । प्रस्तुत ऐकें कौरवनाथा । यज्ञसाङ्गता धर्माची ॥८३॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP