मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक ४१ ते ४५ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक ४१ ते ४५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४५ Translation - भाषांतर ततः पांडुसुताः क्रुद्धा मत्स्यसृंजयकैकयाः । उदायुधाः समुत्तस्थुः शिशुपालजिघांसवः ॥४१॥महाभारतीं सविस्तर । चैद्यनिन्देचा प्रकार । येथ श्रीशुक संक्षेपमात्र । वदला अवसर जाणोनी ॥९८॥सदस्यांप्रति एसिया परी । वदली चैद्याची वैखरी । त्यापरी धर्म निन्द्योत्तरीं । निर्भर्त्सिला बहुसाळ ॥९९॥धर्में क्षमा करूनि तितुके । चैद्या सान्तवितां निजमुखें । तैलें शिंपिलिया पावकें । क्षोभिजे तेंवि तो प्रज्वळिला ॥४००॥तेथ भीष्में वारिलें धर्मा । कायसें सान्त्वन पामरा अधमा । पंचत्वाची भरली सीमा । सन्निपातभ्रमास्तव बरळे ॥१॥हें ऐकोनि भीष्माप्रति । निन्दता झाला चैद्य दुर्मति । राजे क्षोभवूनि स्वपक्षपाती । दुष्ट निघातीं उठावला ॥२॥सदस्यंचें निर्भर्त्सन । श्रीकृष्णाचें निन्दाकथन । युधिष्ठिराचें प्रहेलन । भीष्मगर्हण ऐकोनी ॥३॥भीमें पडताळितां गदा । वधावया निन्दिका चैद्या । तैं त्या भीष्में वॄत्तान्त समुदा । चैद्यवधाचा प्रकटविला ॥४॥साक्षात वसुदेवाची भगिनी । दमघोषाची मुख्य राणी । प्रसवली शिशुपाळालागुनी । तैं हा दुश्चिह्नीं जन्मला ॥४०५॥चतुर्भुज ललाटेक्षण । भुङ्कें रासभस्वनें करून । सर्वीं मानूनियां दुश्चिह्न । म्हणती कल्याणकर नोहे ॥६॥याचिया त्यागाप्रति उदित । जाले असतां अकस्मात । गगनवाणी वदली तेथ । गूढ वृत्तान्त प्रकटार्थें ॥७॥त्यागूं नका या आत्मजा । हा होईल प्रतापी आजा । ज्याच्या दर्शनें भाळाक्ष भुजा । लोपती तो या मारील ॥८॥ऐसी ऐकूनि गगनवाणी । तोषले मंत्री राव राणी । भूपाळ पहावया लागूनी । येतां ओपिती सुत त्यांपें ॥९॥भूप भूतळींचे समस्त । स्पर्शिंतां नेत्र भुजा गुप्त । नव्हती त्यातें द्वारकानाथ । शिवतां लुप्त कर नयन ॥४१०॥तये काळीं याची जनने । कृष्णा प्रार्थीं करुणावचनीं । मत्पुत्राचे अपराध सोसुनी । याचे हननीं न प्रवर्तें ॥११॥ऐकोनि बोले श्रीभगवंत । कायसी अपराधाची मात । क्षमा करीन शतपर्यंत । चिन्तारहित तूं राहें ॥१२॥ऐसें ऐकूनि अच्युतवचन । तिनें मानिलें समाधान । ते मर्यादा जाली पूर्ण । पावेल हनन हरिहस्तें ॥१३॥ऐकूनि भीष्माची वैखरी । पुढती शिशुपाळ निन्दी हरी । म्हणे रुक्मिणी स्वयंवरीं । मज नेमिली तां हरिली ॥१४॥जननीजनकें बंधुवर्गीं । मातें अर्पिली जे शुभाङ्गी । मनें कवळिली तत्प्रसंगीं । मग ते वेगीं तां नेली ॥४१५॥ऐशीं शतशः निन्द्य वचनें । स्त्रीनिन्देचे न येती तुलने । निन्दा ऐकोनि पाण्डव मनें । क्षोभलेपणें उठावले ॥१६॥सभापर्वींची संक्षेपसूचना । सूचिली ते श्रोतृजना । श्रवण करितां शंका मना । माजि कोण्हा न वसावी ॥१७॥कृष्णानिन्दा ऐकूनि कानीं । पाण्डवां क्रोध न धरे मनीं । भीमार्जुन माद्रेय दोन्ही । आयुधें परजूनि उठावले ॥१८॥पाण्डवांचा क्रूरावेश । देखोनि राजयां न धरवे रोष । कृष्णपक्षीं जे नृप अशेष । खङ्ग विकोश तिहीं केले ॥१९॥मत्स्यराजे विराटप्रमुख । कैकय संतर्द्दनादिक । सृंजयादि नृप अनेक । चैद्य सन्मुख उठावले ॥४२०॥कृष्णनिन्देचिया श्रवणीं । हेंचि प्रायाश्चित्त या क्षणीं । जे निन्दकाची प्राणहानी । समरांगणीं करावी ॥२१॥म्हणोनि उठिले उदायुध । वधावया निन्दक चैद्य । तंव तो शिशुपाळ दुर्मद । झाला सनद्ध समरंगा ॥२२॥ततश्चैद्यस्त्वसंभ्रांतो जगृहे खङ्गचर्मणी । भर्त्सयन्कृष्णपक्षीयान्राज्ञः सदसि भारत ॥४२॥श्रीकृष्णाचे पक्षीय नृपति । त्यांची देखोनि आवेशवृत्ति । त्यांवरी चैद्य प्रतापमूर्ति । उठ्ला निगुती साटोपें ॥२३॥सदस्यसभेमाजि तयां । मुखें निर्भर्त्सी कृष्णपक्षीयां । खङ्गखेटक घेऊनियां । आसन मांडूनि ठाकला ॥२४॥चैद्या पाण्डवां समरांगणीं । निकरें व्हावी खणाखणी । तंव श्रीकृष्ण अंतःकरणीं । पाहे विवरूनि सर्वज्ञ ॥४२५॥जय विजय हे द्वारपाळ । मद्वरें विरोधभजनशीळ । हिरण्याक्ष हिरण्यकशिपु प्रबळ । दैत्य केवळ पूर्वभवीं ॥२६॥द्वितीयजन्मीं हे निर्घृण । राक्षस रावण कुंभकर्ण । तृतीय जन्मीं नृप होऊन । जन्मले शिशुपाळ वक्रदंत ॥२७॥मद्वरें मत्तुल्य हे मम द्वास्थ । तो हा चैद्य निजमोक्षार्थ । क्षोभें उठला येथ । मारील समस्त नृपचक्रा ॥२८॥ऐसें विवरूनि नारायण । चैद्यनृपवरां न घडे रण । तंव उठिला त्वरा करून । निवारूनियां नृपचक्रा ॥२९॥तावदुत्थाय भगवान्स्वान्निवार्य स्वयं रुषा । शिरः क्षुरांतचक्रेण जहारापततो रिपोः ॥४३॥स्वकीय वारूनि प्रतापतेजें । स्वस्थ केले स्वपक्षीय राजे । क्रोधेंकरूनि अधोक्षजें । चैद्य ओजें आमंत्रिला ॥४३०॥अरे रे चैद्या दुष्टा दुर्मती । तोंडें अचागळी बोलसी किती । मम पूजेची तुजला खंती । तरी घेईं निगुतीं अग्रपूजा ॥३१॥शिशुपाळ खङ्गखेटकधर । उठावला कृष्णा समोर । कृष्णें सुदर्शन क्षुरधार । प्रेरूनि क्षिर छेदियलें ॥३२॥रिपु पडतां आपणावरी । त्याचा मस्तक चक्रप्रहारीं । हरिता झाला श्रीमुरारी । भूतीं समग्रीं विलोकितां ॥३३॥शब्दः कोलाहलोऽप्यासीच्छीशुपाले हते महान् । तस्यानुयायिनो भूपा दुद्रुवुर्जीवितैषिणः ॥४४॥शिर उडालें गगनोदरीं । कंबंध पडलें धरणीवरी । हाहाकार ते अवसरीं । सभेमाझारी प्रवर्तला ॥३४॥महाराजा चैद्य पडतां । कोल्हाळशब्द सभेआतौता । दुष्ट नपगण झाला पळता । निजजीविता रक्षावया ॥४३५॥शिशुपाळाचे पक्षपाती । जितुके राजे खळ दुर्मती । ते पळाले पवनगती । समरक्षिती सांडूनी ॥३६॥जीवितें वांचवावयाचे चाडे । पळती खालती करूनि मुण्डें । न पाहती मागिलेकडे । मरण रोकडें चुकवावया ॥३७॥न साम्भाळिती कोणा कोण्ही । चैद्यदेह पडला धरणी । झाली नृपांची भंगाणी । यावरी करणी हे ऐका ॥३८॥चैद्यदेहोत्थितं ज्योतिर्वासुदेवमुपाविशत् । पश्यतां सर्वभूतानामुक्लेव भुवि खाच्च्युता ॥४५॥चैद्यदेहींचें चैतन्यतेज । ज्योतिर्मय जें तेजःपुंज । गगनीं संचरूनियां सहज । अधोक्षजीं तें प्रवर्तलें ॥३९॥सर्व भूतें पाहत असतां । उल्कापात होय अवचिता । तैसें प्रवेशलें अच्युता । माजि तरुता तत्तेज ॥४४०॥गगनींहूनि तुटे तारा । त्या तेजातें प्राशी धरा । चैद्यज्योति तेंवि श्रीधरा - । माजि कुरुवरा प्रवेशली ॥४१॥अंतीं मति तैसीच गति । धन्य म्हणती विरोधभक्ती । सभ्य स्वमुखें प्रशंसिती । तें तूं कुरुपति अवधारीं ॥४२॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP