मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७४ वा| श्लोक ३१ ते ३५ अध्याय ७४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते ९ श्लोक १० ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५४ अध्याय ७४ वा - श्लोक ३१ ते ३५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३१ ते ३५ Translation - भाषांतर ईशो दुरत्ययः काल इति सत्यवती श्रुतिः । वृद्धानामपि यद्बुद्धिर्बालवाक्यैर्विभिद्यते ॥३१॥रसरसूनि आपुले ठायीं । विस्मय करूनि बोले कांहीं । समर्थ काळशक्ति कवणांही । उल्लंघिली नवजाय ॥९३॥दुःखें नातिक्रमवे काळ । समर्थ ईश्वर हा केवळ । ऐसा श्रुतीचा चावळ । असत्य विफळ न म्हणावा ॥९४॥काल दुरत्यय ऐसी श्रुती । कालसामर्थ्यें सत्यवती । प्रत्यक्ष प्रत्यय हा बाणला चित्तीं । जे भ्रंशली मती वृद्धांची ॥२९५॥बाळवाक्यांतें ऐकून । वृद्धही झाले बुद्धिहीन । बाळवचना अनुसरून । बुद्धिभेद त्यां जाला ॥९६॥ऐकूनि बाळांचा अनुवाद । वृद्धां झाला बुद्धिभेद । ऐसी काळशक्ति अगाध । कोण कोविद लंघील ॥९७॥ऐसा श्रीकृष्णपूजनें । शिशुपाळ रसरसित दुखवलेपणें । यावरी सदस्यांकारणें । बोले वचनें तें ऐका ॥९८॥यूयं पात्रविदां श्रेष्ठां मा मन्ध्वं बालभाषितम् । सदसस्पतयः सर्वे कृष्णो यत्संमतोऽर्हणे ॥३२॥सदसस्पति हो तुम्ही सुज्ञ । पात्र जाणत्यांमाजि मान्य । मान्य करणें बाळवचन । तुम्हांलागून अयुक्त तें ॥९९॥धर्माहूनि सहदेव बाळ । अज्ञान अल्पमति केवळ । तद्वाक्य मानितां सदस्य सकळ । अन्यायशीळ होत्साते ॥३००॥तरी मान्य न कीजे बाळभाषण । कीं तें केवळ अप्रमाण । बाळवाक्या वरूनि कृष्ण । अग्र्यार्हणीं योग्य म्हणां ॥१॥बाळभाषणा मानूनि तुम्हीं । अग्र्यार्हण अर्पिलें अधर्मीं । कृष्ण केवळ गोरक्षनामी । केंवि सत्तमीं संमत हा ॥२॥सदस्यीं पहावें न्यूनपूर्ण । अध्वर सदस्य प्रेक्षकगण । तेथ न वदतां भीड धरून । लागे दूषण सदस्यां ॥३॥पूज्य मानूनि अपूज्य पंक्ती । अपूज्य तेथें पूजिजती । मरण दुर्भिक्ष महाभीती । प्राप्त होती ते ठायीं ॥४॥कृष्णाहूनि पूज्य कोण । ऐसा प्रजल्पे यजमान । तरी यदर्थीं ऐका वचन । सभ्यां दूषण तें कथितों ॥२०५॥तपोविद्याव्रतधरान्विज्ञानध्वस्तकल्मषान् । परमर्षीन्ब्रह्मनिष्ठांल्लोकपालैश्च पूजितान् ॥३३॥सदसस्पतीनतिक्रम्य गोपालः कुलपांसनः । यथा काकः पुरोडाशं सपर्यां कथमर्हति ॥३४॥तपस्वियांमाजी जे श्रेष्ठ । अथवा उपासक वरिष्ठ । महाव्रतधारी जे ज्येष्ठ । सभ्य यथेष्ट तुम्ही असतां ॥६॥विद्याविनयसंपन्न थोर । कायवाड्मानसजित व्रतधर । कीं ज्ञानविज्ञानभास्कर । सारासारप्रकाशक ॥७॥अविद्यात्मकभ्रममलध्वस्त । विगतकल्मष जे भास्वत । व्रतस्थ निर्जितजिह्वोपस्थ । जे कां प्रशस्त सद्बोधें ॥८॥साङ्गोपाङ्गव्रताचरणीं । मानसमळाची केली धुणी । जे कां नितान्तनिर्मळपणीं । अपरतरणिसम तपती ॥९॥ज्याचे वाचेसी अनृतदोष । काळत्रयीं न करी स्पर्श । महासतीतें जारपुरुष । जेंवि अभिलाष करूं न शके ॥३१०॥ऐसे परमर्षिवरिष्ठ । आत्मवेत्ते ब्रह्मनिष्ठ । त्यांतें लंघूनि वृथापुष्ट । केंवि हा श्रेष्ट पूज्यत्वीं ॥११॥ब्रह्मनिष्ठ तपोधन । विद्याविनयतासंपूर्ण । ध्वस्तकल्मषविवस्वान । ज्ञानविज्ञानपारग जे ॥१२॥पुरंदरप्रमुखलोकपाळीं । जे पूजिले सुरमंडळीं । ऐसियांतें त्यागूनि सकळीं । केंवि हा गौळी योग्य केला ॥१३॥ऐसियां श्रेष्ठां सदस्यातें । अतिक्रमूनियां हा गोरक्ष येथें । योग्य होय अग्रपूजेतें । कोण्या मतें मज सांगा ॥१४॥अंत्येष्टीच्या दशाहदिवशीं । प्रेतपिण्डार्हता वायसासी । त्यासी योग्यता पुरोडाशीं । घडे कैसी विचारा ॥३१५॥जो कां केवळ कुळदूषण । त्या बोलिजे कुलपांसन । प्रत्यक्ष केलें मातुलहनन । कें हें श्रवण तुम्हां नसे ॥१६॥गोपाल कुलपांसन यथा काक । पुरोडाशासि अनर्ह देख । अग्रपूजेसी यदुनायक । अयोग्य सम्यक जाणा हो ॥१७॥ऐसि शिशुपाळाची वाणी । निन्दा करितां सभास्थानीं । वाग्देवता सत्य म्हणोनी । वास्तवबोधें प्रतिपादी ॥१८॥स्वर्ग श्रुति आणि भूमी । वाखाणिती गो या नामीं । पाळक म्हणिजे यांचा स्वामी । हॄषीकेश हा गोपाळ ॥१९॥कुत्सितार्थाचें लापन । करिती तयां कुलपाभिधान । ऐसे कुलप म्हणाल कोण । वेदबाह्यजन पाखंडी ॥३२०॥तया वेदबाह्यांचें हनन । करित्यां बोलिजे कुलपांसन । तो हा यथार्थ श्रीभगवान । मुख्य व्याख्यान वास्तव हें ॥२१॥यथापदीं दीर्घता वसे । अकारलोप झाला असे । व्याकरणसूत्रें पदनिर्देशें । अकाक ऐसा प्रतिपाद्य ॥२२॥अकाक ऐसीं अक्षरें तीन । यांचा समास कीजे श्रवण । क म्हणिजे सुख संपूर्ण । असुखाभिधान अक ऐसें ॥२३॥उभय मिळोनि म्हणिजे काक । नशिबे काक ज्यातें तो अकाक । एवं सुखदुःखातीत सम्यक । सर्वात्मक श्रीकृष्ण ॥२४॥अकाक पुरोडाशा योग्य नव्हे । कीं तो आप्तकाम स्वभावें । पुरोडाश हविती देवतानामें । कृष्ण ते अवघे एकात्मा ॥३२५॥अग्नि देवता मंत्र हवी । इत्यादि यज्ञक्रिया आघवी । कृष्ण साकल्यें आहेच पूर्वीं । पुरोडाश केंवि तदर्ह ॥२६॥देवतापरिच्छिन्न स्वर्गस्थ । पुरोडाश विध्युक्त द्रव्य शस्त । देवतार्ह तो विधिप्रणीत । केंवि अनंत त्या योग्य ॥२७॥अखिलात्मकत्वें संचला । पुरोडाश मात्र कें योग्य त्याला । अकाका योग्य नव्हे हें वदला । अर्थ सरळ वास्तव हा ॥२८॥अकाका योग्य पुरोडाश । तद्वत अग्रपूजा कृष्णास । सर्वस्व अर्पणें योग्य ज्यास । सपर्यामात्र अनर्ह त्या ॥२९॥मुख्य ब्रह्मर्षि सदस्यगणीं । त्यांसि योग्यता अग्र्यार्हणीं । अखिलात्मकत्व वर्ते कृष्णीं । आत्मार्पण त्या अर्ह ॥३३०॥आणिक निंदेचीं उत्तरें । चैद्य बोले तें ऐका श्रोत्रें । परीक्षितीतें व्यासकुमरें । कथिलीं तैशीं निरोपितों ॥३१॥वर्णाश्रमकुलापेतः सर्वधर्मबहिष्कृतः । स्वैरवर्ती गुणैर्हीनः सपर्यां कथमर्हति ॥३५॥चैद्य सदस्यां विपश्चितां । म्हणे या वर्णाश्रमकुळादिरहिता । सर्वधर्मबहिष्कृता । पूजार्हता केंवि घडे ॥३२॥स्वैरवृत्ति गुणविहीन । यासि अनर्ह अग्र्यार्हण । तथापि पूजिलें हें दूषण । सभ्यां आंगीं संक्रमलें ॥३३॥इत्यादि निन्देचीं जीं वचनें । वाग्देवता वास्तववयुनें । वाखाणी तें ऐका श्रवणें । सावधमनें क्षण एक ॥३४॥वर्ण म्हणिजे ब्राह्मणादिक । आश्रम ब्रह्मचर्यादि चौक । कुळ म्हणिजे मूळपुरुष । गोत्रप्रवर्तक जो ज्यातें ॥३३५॥यांपासूनि वेगळा कृष्ण । बृहत्त्वें ब्रह्म जो परिपूर्ण । अरूप अगोत्र अनभिधान । करिती व्याख्यान श्रुति ऐसे ॥३६॥वर्णाश्रमकुळादि सकळ । हें देहासि लागलें केवळ । देहातीत आत्मा अमळ । न शिवती मळ त्याप्रति हे ॥३७॥कृष्ण अयोनिसंभव मुळीं । तो लावावा कवणे कुळीं । वर्णाश्रमातीत वनमाळी । हे वाचाळी उपनिषदीं ॥३८॥ज्यासि नाहीं वर्ण गोत्र । सर्व धर्मीं त्या अनधिकार । सर्वधर्माचें अभ्यंतरे । वसवूनि श्रीशर बहिष्कृत ॥३९॥नेत्रा आड आलिया अभ्र । म्हणती आच्छादिला भास्कर । तेंवि सर्व धर्म ज्या बाहीर । करिती बहिष्कार कर्मठ त्या ॥३४०॥सर्व धर्मांचा अनधिकारी । तो परमेश्वर स्वैराचारी । अतएव निर्गुण निर्विकारी । नोहे विकारी त्रिगुणात्मा ॥४१॥एवं परमेश्वर श्रीहरी । नोहे जीववत् कर्माधिकारी । जीवायोग्य सपर्या खरी । नोहे निर्धारीं हरियोग्य ॥४२॥पुढती निन्दोक्ति वदे चैद्य । त्या वाखाणी भारती विशद । क्षण एक बैसोनियां सावध । विद्वद्वृंद तें ऐका ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : June 01, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP