मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर देह आद्यंतवानेष द्रव्यप्राणगुणात्मकः । आत्मन्यविद्यया क्लृप्तः संसारयति देहिनम् ॥४६॥येथ देहासीच जन्मनाश । आत्मा तो नित्य अविनाश । घटभंगें घटाकाश । सहजस्थिति जेंवि उरे ॥३३॥देहाचें जें जन्ममरण । महाभूतें गुणप्रमाण । अविद्येनें केलें जाण । जन्ममरण यालागीं ॥३४॥अविद्येनें नवल केलें । मिथ्या देह सत्यत्वें दाविलें । तेंचि अभिमानें घेतलें । प्रेमें बाधलें देहबुद्धि ॥५३५॥ज्यासि देहीं स्वाभिमान थोर । त्यासि कल्पना अनिवार । तेणेंचि दुःखमूळ संसार । वेरझार न खुंटे ॥३६॥नात्मनोऽन्येन संयोगो वियोगाश्चासतः सति । तद्भेतुत्वात्तत्प्रसिद्धेर्दृग्रूपाभ्यां यथा रवेः ॥४७॥आतां ऐक हो सुंदरी । परमात्मा अलिप्त चराचरीं । संयोगवियोगाचे परी । न धरीं संसारीं सर्वथा ॥३७॥आत्मसंयोगेंविण सहसा । स्वयें संसार चाले कैसा । विकल्प न धरीं हो ऐसा । तेहि दशा सांगेन ॥३८॥जैसा अलिप्त रवि आकाशीं । दृष्टि रूपातें प्रकाशी । तैसा परमात्मा हृषीकेशी । संसारासी द्योतक ॥३९॥नातरी जैसा खांबसूत्रीं । अचेतन पुतळ्या नाचवी यंत्रीं । एका जैत एका हारी । दोहीं परी अलिप्त ॥५४०॥पुतळ्यांचेनि झालेपणें । नाहें सूत्रधारिया जन्मणें । तयाचेनि निमालेपणें । नाहें मरण सर्वथा ॥४१॥ऐसा अलिप्त कृष्ण प्रसिद्धु । तयासि दंडमुंडनापराधु । लावितेसि तूं नववधू । नव्हे शुद्ध भाव तुझा ॥४२॥कृष्ण चाळक वेगळेपणीं । तरी व्यापकत्वा आली हानि । ऐसें न मनावें हो रुक्मिणी । तीही कहाणी ऐकें पां ॥४३॥जैसें गगन आपणावरी । शीतोष्णपर्जन्यधारी । परी अलिप्त तिहीं विकारीं । तैसा श्रीहरि कर्मासी ॥४४॥गगन सर्वत्र तत्त्वता । त्यासि चिखल लावों जातां । चिखलें न माखे जी लावितां । गगन सर्वथा अलिप्त ॥५४५॥तैसेंचि जाण कृष्णनाथा । भोग भोगूनि अभोक्ता । कर्में करूनि अकर्ता । अलिप्तता निजबोधें ॥४६॥कृष्णाआंगीं लाविती कर्म । तोचि त्यांसि होय अधर्म । हेंचि कोण्हा न कळे वर्म । कृष्ण निष्कर्म सर्वदा ॥४७॥यालागीं तूं वो ऐसें जाण । देहासीच जन्ममरण । आत्मा अविनाश परिपूर्ण । जीवीं हे खूण राखावी ॥४८॥जन्मादयस्तु देहस्य विक्रिया नाऽत्मनः क्कचित् ।कलानामिव नैर्वेदोर्मृतिर्ह्यस्य कुहूरिव ॥४८॥लोकप्रवाद बरळा । नाश मानिती केवळा । चंद्रीं तुटलिया कळा । म्हणती नाशला अवंसेसीं ॥४९॥चंद्रीं चंद्र यथास्थिति । कळाच तुटती वाढती । तैसा आत्मा सहजस्थिति । नाश उत्पत्ति देहासी ॥५५०॥यथा शयान आत्मानं विषयान्फलमेव च ।अनुभुंक्तेऽप्यसत्यर्थे तथाऽऽप्नोत्यबुधो भवम् ॥४९॥जैसी वांझेची संतति । तैसी संसारउत्पत्ती । भ्रांत सत्यत्वें मानिती । मिथ्याप्रतीति प्रबुद्धा ॥५१॥स्वप्नीं देखे आत्ममरण । चितेसि घालूनि देहदहन । जाग्रत्युदयीं मिथ्या स्वप्न । जन्ममरण तेंवि नाहीं ॥५२॥तस्मादज्ञानजं शोकमात्मशोषविमोहनम् ।तत्वज्ञान निर्हृत्य स्वस्था भव शुचिस्मिते ॥५०॥ऐसाचि जाण संसारक्रम । यालागीं भीमकिये सांडीं भ्रम । कृष्ण पावलीस पुरुषोत्तम । मिथ्याभ्रम धरूं नको ॥५३॥स्व्पनीं सोयरिया झालें दुःख । सत्य मानिती ते तव मूर्ख । बंधुवैरूप्याचें असुख । सांडीं निःशेष वेह्लाळे ॥५४॥कृष्ण न पवतांचि आधीं । शोक मोह जीवासि बाधी । कृष्णा पावलिया आधि व्याधि । जाती त्रिशुद्धि सर्वथा ॥५५५॥कृष्ण पावलियापाठीं । मोह ममता तुझ्या पोटीं । कृष्ण नोळखिसी गोरटी । आत्मदृष्टि तुज नाहीं ॥५६॥तये आत्मदृष्टीचें लक्षण । दृश्य द्रष्टा आणि दर्शन । तेंही होऊनि अकारण । परिपूर्ण श्रीकृष्ण ॥५७॥तेथें कैंचें धरिसी ध्यान । ध्याता ध्येय झाले शून्य । तुटला बोल खुंटलें मन । चैतन्यघन श्रीकृष्ण ॥५८॥उरलें चिन्मात्रस्फुरण । तेंही मायिक तूं जाण । हेतुमातु नाहीं लक्षण । ऐसा श्रीकृष्ण जाणावा ॥५९॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP