मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर कुत्र यासि स्वसारं मे मुषित्वा ध्वांक्षवद्धविः ।हरिष्येऽद्य मदं मन्द मायिनः कूटयोधिनः ॥२६॥जगामाजि तूं चोर होसी । चोरी करूनि दिसों नेदिसी । आजि मी फावलों लागासी । केउता जासी निज चोरा ॥११॥इंद्रादि देवांचे उद्देशीं । होम कीजे अग्निमुखीं । तें अवघेचि तूं खासी सेखीं । अग्निमुखीं कांहीं नुरे ॥१२॥देव म्हणती आम्हांसि पावलें । त्यांसिही ठकूनि हवि तुवां नेलें । तें काउळेमत येथ न चले । सांडी वहिलें भीमकीसी ॥१३॥जन्मोनियां यादववंशीं । कुळगोत्रनाश करिसी । बुडविलें रे नामरूपासी । जाति तुजपासीं तंव नाहीं ॥१४॥भोग अवघेचि भोगिसी । आणि तूं योगिया म्हणविसी । मूळ माया ते तुजपासीं । वेष धरिसी कपटाचा ॥४१५॥तुझिया कपटाची झाडणी । करावया आलों मी गुणी । झाडणी करीन रणाङणीं । झणीं पळोनि जासील ॥१६॥सांडीं सांडीं माझी बहिणी । नाहीं तरी खोचीन तिखटबाणीं । तीन बाण लावूनि गुणीं । चक्रपाणि विंधिला ॥१७॥यावन्न मे हतो बाणैः शयीथा मुंच दारिकाम् ।स्मयन्कृष्णो धनुश्र्छित्वा षड्भिर्विव्याध रुक्मिणम् ॥२७॥जंववरी माझे तिखट बाण । कडतरोनि न घेती प्राण । तंववरी सोडूनि कन्यारत्न । जाय पळोनि जीव रक्षीं ॥१८॥ऐकोनि हांसिन्नला श्रीपति । कार्मुक सज्ज केलें निगुती । श्र्मश्रु स्पर्शोनि दक्षिणहस्तीं । पुढें दुर्मति लक्षिला ॥१९॥शार्ङ्ग टणत्कारूनि हरि । सा बाण घेतले करीं । तीन तोडूनि माझारीं । धनुष्य करीं छेदिलें ॥४२०॥अष्टभिश्चतुरो वाहान्द्वाभ्यां सूतं ध्वजं त्रिभिः ।स चान्यद्धनुरादाय कृष्णं विव्याध पंचभिः ॥२८॥सवेंचि सोडिलें आठ बाणांसी । चार्हीं चहूं वारुवांसीं । सारथि पाडूनि धरणीसी । ध्वजस्तंभ छेदिला ॥२१॥रुक्मिया कोपा चढला भारी । पांच बाण घेऊनि करीं । रागें सोडिले कृष्णावरी । शरें निर्धारीं विंधित ॥२२॥तैस्ताडितः शरौघैस्तु चिच्छेद धनुरच्युतः ।पुनरन्यदुपादत्त तदप्यच्छिनदव्ययः ॥२९॥कृष्ण धनुर्वाडा निज गडी । अचुक संधानपरवडी । पांचही बाण बाणें तोडी । धनुष्य पाडी छेदूनी ॥२३॥आणिक धनुष्य घेतलें वेगें । सम्मुख विंधों आला रागें । तेंही तोडिलें श्रीरंगें । आणीक आंगें घेतलें ॥२४॥बाण लावोनियां वोढी । तेही कृष्ण सवेंचि तोडी । जें जें धनुष्य रुक्मिया काढी । तें तें तोडी श्रीकृष्ण ॥४२५॥धनुष्य घेतलें घाव टाळूनी । अग्निअस्त्र लाविलें गुणीं । धूम्र कोंदला दिशा व्यापूनी । ज्वाला गगनीं न समाती ॥२६॥पर्जन्यास्त्र सोडी हरि । मेघ वर्षती मुसळधारीं । अग्नि शांत क्षणामाझारी । वेगें श्रीहरि पैं केला ॥२७॥येरें वायव्यास्त्र लाविलें गुणीं । झंझामारुत सुटला रणीं । वार्यानें जावों पाहे अवनी । टाळी कानीं बैसली ॥२८॥पर्वतास्त्र सोडी कृष्ण । वारा सांडिला बुजोन । येरें वज्रास्त्र सोडून । गिरि तोडोनि सांडिले ॥२९॥रुक्मिया कोपा चढला थोर । कृष्णासि म्हणे स्थिर स्थिर । गुणीं लाविलें रौद्रास्त्र । महारुद्र प्रकटला ॥४३०॥दाढा विकराळ तिखटा । माथा मोकळिया जटा । काळिमा चालिलीसे कंठा । मिशा पिंगटा आरक्त ॥३१॥कृष्ण अस्त्रविद्यें चतुर । शस्त्रीं योजिला भस्मासुर । बाण देखोनि पळें रुद्र । धाकें थोर कांपत ॥३२॥रुक्मिया आणिक शस्त्र विचारी । तंव कृष्णें छेदिलें धनुष्य करीं । सरली कोदंडसामग्री । रथावरी कांहीं नाहीं ॥३३॥परिघं पट्टिशं शूलं चर्मासी शक्तितोमरौ ।यद्यदायुधमादत्त तत्सर्वं सोऽच्छिनद्धरिः ॥३०॥सरली धनुष्याची प्रौढी । परिघ घेवोनि घातली उडी । कृष्ण विंधोनि परिघ तोडी । अपरवडी घायाची ॥३४॥परिघ तुटलिया पाठीं । रागें पट्टिश घेवोनि उठी । नधरत पातला उठाउठीं । कृष्ण दृष्टी सूदला ॥४३५॥कृष्णें विंधिलें कठिण बाणा । तेणें पट्टिश उडविला गगना । सवेंचि शूळ घेवोनि जाणा । म्हणो कृष्णा पैं आला ॥३६॥दांत खातसे करकरा । शूळ भवंडित गरगरा । साहें म्हणे शार्ङ्गधरा । घायें पुरा करीन ॥३७॥कृष्णें बाण सोडिला पाहीं । शूळ तोडिला ती ठायीं । सवेंचि पाडियेला भुयीं । ती ठायीं त्रिखंडें ॥३८॥शूळ वायां गेला थोर । रुक्मिया चुरी दोन्ही कर । सवेंचि घेवोनि तोमर । कृष्णासमोर धाविन्नला ॥३९॥राहें साहें म्हणे कृष्णनाथा । तोमर हाणों आला माथा । माझारी विंधिला येतयेतां । घायें मागुता सारिला ॥४४०॥बाण आदळला थोर । छेदूनि पाडिला तोमर । रुक्मिया म्हणे मर मर । शक्ति सत्वर काढिली ॥४१॥शक्ति घेवोनियां हातीं । म्हणे कृष्णा तुझा पाड किती । रणीं लावीन रे ख्याति । भद्रजाति लोटला ॥४२॥कृष्ण जे जे बाण सोडी । शक्तिहस्तें रुक्मिया तोडी । रथ धरिला मकरतोंडी । शक्ति भवंडी हाणावया ॥४३॥कृष्णें बाण सोडिला तिधरा । रुक्मियासि लागला पिसारा । मागें सारिला औटबारा । शक्ति अंबरा उडविली ॥४४॥रुक्मियाची क्षीण झाली शक्ति । साह्य आले दक्षिणाधिपति । तिहीं हांकिली श्रीपति । सैन्यसंपत्ति अनिवार ॥४४५॥कृष्ण नेटका जुंझार । बाणीं त्रासिले महावीर । आठ बाणें खोचिली धूर । हाहाकार ऊठिला ॥४६॥बाण सोडिले निर्व्यंग । घायीं निवटिलें चतुरंग । त्याच्या सैन्या झाला भंग । रणीं श्रीरंग खवळला ॥४७॥बाणीं वर्षे शार्ङ्गधर । सैन्यासि झाला थोर मार । कोपें खवळला रुक्मिया वीर । साटोप दुर्धर मांडिला ॥४८॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP