मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५४ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५४ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६१ श्लोक ६२ ते ६३ अध्याय ५४ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर स्यंदने गरुण्डकेतुमंडने कुंडिनेशतनयाधिरोपिता ।केनचिन्नवतमालकोमलश्यामलेन पुरुषेण नीयते ॥१॥गरुडध्वज झळके ज्यासी । तोडर गर्जे चरणेंसीं । वीज बांधिले मेखळेसी । तैसा कांसेसि पीताम्बर ॥३॥तिलक रेखिला पीवळा । मुकुट कुंडलें वनमाळा । डोळस सुंदर सांवळा । भीमकबाळा तेणें नेली ॥४॥मागध म्हणती गेली वाटीवं । धैर्य गाम्भीर्य वैभव । यशकेर्तीची राणीव । नेले सर्व यादवीं ॥५॥धिग्धिग् जालेपण जिवाचें । येथूनि परतणें तंव कैचें । गोवळीं यश नेलें आमुचें । म्हणोनि कवचें बाणलीं ॥६॥पाठीची हिरोनि नेली भाज । त्याहूनि कवण थोर लाज । कवणें निर्वाणीचें झुंज । म्हणोनि पैज घेतली ॥७॥इति सर्वे सुसंरब्धा वाहानारुह्य दंशिताः । स्वैः स्वैर्बलैः परिक्रांता अन्वीयुर्धृतकार्मुकाः ॥२॥वीर वळघले असिवारीं । नाचती तीं पायांवरी । हो हो मामाजीजीकारीं । यावा स्वारीं दाविला ॥८॥पुढें पायांचे मोगर । अढाउ चालती गंभीर । सेली सावली कोतेकार । धनुर्धर पायांचे ॥९॥रथ जोडियेले एकवाट । वरी चढिले वीर उद्भट । घडघडिले चक्रवाट । रजें अंबुद कोंदलें ॥१०॥घोडिया बाणाली मोहाळी । कंगाल टोप राघावळी । पाखरा झळकती तेजाळी । आरिसे तळीं लाविले ॥११॥दोही बाहीं कुंजरथाट । मद गाळीती गजघंट । दांतीं लोहबंद तिखट । वारिया वाट वळघले ॥१२॥एक चढले उंटावरी । एक चढले अश्वावरी । एक चढले महाखरीं । वीरभारीं गर्जती ॥१३॥आम्ही प्रचंड धनुर्वाडे । रणकर्कश रणरगडे । नोवरी घेऊनि आम्हांपुढें । कोणीकडे पळतील ॥१४॥निशाणें त्रहाटिलया भेरी । खाकाइलया रणमोहरी । सिंहनाद केला वीरीं । उपराउपरीं धाविन्नले ॥१५॥शस्त्रास्त्रीं सन्नद्ध दळ । मीनले महावीर सकळ । धाविन्नले उताविळ । यादवदळ ठाकिलें ॥१६॥अवघीं मिळोनि दिधली हाक । कृष्णा दाखवीं पां रे मुख । भीमकी फावली हें सुख । झणी देख मानिसी ॥१७॥सांडीं सांडीं भीमकीचा संग । अबद्ध बांधिजसी निलाग । आला कोपिष्ठाचा लाग । पडेल पांग दुजयाचा ॥१८॥एकला एकट होतासि । तैं तूं कोण्हा नाटोपसी । आतां स्त्रीलोभें अडकलासी । केउता जासी निजचोरा ॥१९॥तूं हृदयशून्य अविवेकी । दुजियासि न मनिसी सेखीं । तुज जे मिनले विवेकी । ते तुवां वृत्तिशून्य केला ॥२०॥अविचारितां एकाएकीं । चोरिली परात्परभीमकी । ते तव न जिरे इहलोकीं । वीरीं कार्मुकीं राखिली ॥२१॥अविद्या चोरिली चंद्रावळि । विद्या पेंधी ते गोवळी । तैसीच नेऊं पाहसी भीमकबाळी । परी आस्री फळी मांडियेली ॥२२॥न करितां रे उवेढा । केंवि जाऊं पाहसी पुढां । पळों नको परत भेडा । होईं गाढा वीरवृत्ति ॥२३॥गोगोरसा मथन करितां । चोरिसी सारांश नवनीता । तैसीच नेऊं पाहसी राजदुहिता । बहुतां झुंजतां तें नये ॥२४॥यावरी तूं गोवळा जाण । आतां करीं शहाणपण । भीमकी सांडूनि वांचवी प्राण । जीवदान तुज दिधलें ॥२५॥जैसें अहंकाराचें दुर्ग । तैसें आलें चतुरंग । भीतरी वीर जी अनेग । कामक्रोधादि खवळले ॥२६॥तानापतत आलोक्य यादवानीकयूथपाः ।तस्थुस्तत्संमुखा राजन्विस्फूर्ज्य स्वधनूंषि ते ॥३॥महामोहाचें मेहुडें । तैसें सैन्य आलें पुढें । कृष्णबोधाचे निजगडे । यादव गाढे परतले ॥२७॥भीमकी ऐशा नेणों किती । कृष्ण वरील अनंतशक्ति । तुम्हां मशकांचा पाड किती । वेगें दळपति परतले ॥२८॥पळतां जन्म गेले तुमचे । बोल बोलतां नाकें उंचें । आतांचि जाणवेल साचें । बहु बोलाचें फळ काय ॥२९॥सतरा वेळां पळालेती । निलज्ज मागुते आलेती । रणीं तुम्हां लावूं न ख्याति । धनुष्यें हातीं वाइलीं ॥३०॥अश्वपृष्ठे गजस्कंधे रथोपस्थे च कोविदाः ।मुमुचुः शरवर्षाणि मेघा अद्रिष्वपो यथा ॥४॥दोहीं सैन्यां झाली भेटी । वोढिल्या धनुष्यांचिया मुष्टि । होतसे बाणांची पैं वृष्टि । कूर्मपृष्ठी कांपत ॥३१॥तडक फुटले एकसरें । भिंडिपालाचे पांगोरे । वीर गर्जती हुंकारे । रणतुरें लागलीं ॥३२॥पायींचे लोटले पाइकांवरी । असिवार असिवारीं । वीर पडखळिले वीरीं । परस्परीं हाणिती ॥३३॥गज आदळती गजासीं । महावत महावतासीं । शस्त्रें वोडविती शस्त्रांसीं । घाय घायासी निवारण ॥३४॥वोडणें आदळती वोडणां । खर्ग वाजती खणखणा । बाण वाजती सणसणा । कालकलना मांडिली ॥३५॥धीर वीर राहे साहे । मागें न ठेविती पाये । माथा वाजती घाये । रुधिर वाहे भडभडां ॥३६॥शस्त्रें तूटती हातींचीं । कटारें काढिती माजांची । उदरें फोडूनि गजांची । वीर पायांचे चौकटती ॥३७॥वोडणें उचलूनियां ठायीं । वारू तोडियले पायीं । वीर पाडूनियां भोंयी । आढाउ पायां भीडती ॥३८॥भातडीचे सरले शर । धनुष्यदंडां महावीर । झोडूनि पाडिति अपार । घोरांदर मांडिलें ॥३९॥लाता हाणोनि गजांतें । उपडोनी घेती गजदंतांतें । धांवोनि हाणिती रथांतें । एकेचि घातें शतचूर्ण ॥४०॥घायें पाडिती गजांतें । झोंटी धरूनि महावतातें । तळीं आणूनियां त्यातें । घायीं आंतें काढिती ॥४१॥घायीं मातले महावीर । वोढिती अंत्रमाळांचे भार । तर्ही धांवती समोर । थोर थोर पाडिले ॥४२॥कृष्णबळें यादव गाढे । रणीं लोटलिया पुढें । देखोनि मागध धनुर्वाडे । कोपें वेगाढे ऊठिले ॥४३॥हाक दिधली महावीरीं । बाण सुटले एकसरीं । यादवसैन्याचा महागिरि । शरधारीं झांकिला ॥४४॥आमुच्या बाणांचें लाघव । आजि पावले रे यादव । धांवा पावा चाला सर्व । आलें गौरव आम्हांसी ॥४५॥देखोनि वैरियांचा वरवाळा । कांपिन्नली भीमकबाळा । नाश होईल दोन्ही कुळां । बोल कपाळा लागेल ॥४६॥पत्युर्बलं शरासारैश्छन्नं वीक्ष्य सुमध्यमा । सव्रीडमैक्षत्तद्वक्त्रं भयविह्वललोचना ॥५॥वीर वर्षती तीक्ष्ण शरां । जैशा गिरिवरीं पर्जन्यधारा । आच्छादिलें यादवभारा । लोटधुळोरा उधळत ॥४७॥देर भावे पडती रणीं । सासुरा होईल ठेहणी । कैंची आणिलीसी वैरिणी । धड कोण्ही न बोलती ॥४८॥सखे बंधु पडती रणीं । दुःखें फुटेल जननी । माहेर सुटेल येथूनी । मुख कैसेंनि दाखवावें ॥४९॥कृष्ण पावलिया पुढें । कैसें मांडिलें सांकडें । कठिण वोढवलें दोहींकडे । कपाळ कुढें माझेंचि ॥५०॥थोर वोढवलें दुस्तर । तुटलें सासूर माहेर । कृष्णावेगळी न दिसे थार । पाहिलें वक्त्र हरीचें ॥५१॥तंव हासिन्नला वनमाळी । भिऊं नको वो वेल्हाळी । यादव उठावले महाबळी । रणखंदोळी करितील ॥५२॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP