अध्याय ५२ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
संतुष्टो यदि वर्तेत ब्राह्मणो येनकेनचित् ।
अहीयमानः स्वाद्धर्मात्स ह्यस्याखिलकामधुक् ॥३१॥
ब्रह्मवेत्ता सुब्राह्मण । सदा संतुष्ट ज्याचें मन । दैवोपलब्धमात्रेंकरून । स्वधर्माचरण जो न टकी ॥६३॥
तो धर्मचि त्यालागून । दुभे जैसी कामधेनु । न लगे अनेक विधिविधान । फळती संपूर्ण मनोरथ ॥६४॥
ऐसा संतुष्ट स्वधर्मपर । ब्राह्मण विश्वकल्याणकर । सर्वकामें समस्त सुर । पोषक साचार कामदुधा ॥५६५॥
असंतुष्टोऽसकृल्लोकानाप्नोत्यपि सुरैश्वरः । अकिंचनोऽपि संतुष्टः शेते सर्वांगविज्वरः ॥३२॥
असोनि इंद्राची संपत्ति । तृप्ति नाहीं ज्याच्या चित्तीं । ते अतिशयें दुःखी होती । विटंबिजति संसारे ॥६६॥
असोनियां अकिंचन । ज्याचे वृत्तीसी समाधान । अजिता मातें जिंतिलें जाण । बंदिजन आम्ही त्याचे ॥६७॥
विप्रान्स्वधर्मसंतुष्टान्साधून्भूतसुहृत्तमान् ।
निरहंकारिणः शांतान्नमस्ये शिरसाऽसकृत् ॥३३॥
सर्वभूतीं भगवद्भावो । यावरी स्वधर्मनिष्ठ जो भूदेद्वो । त्यांचिया पाउलां पाउलीं पहा वो । मे सर्वाङ्ग वोडवीं ॥६८॥
ऐसिये निष्ठेचे ब्राह्मण । ते मज सदा पूज्य जाण । त्यांचे नमस्कारी चरण । वारंवार मस्तकीं ॥६९॥
कृष्णदर्शनें समाधान । ब्राह्मणासि पडिलें मौन । विसरला कार्याची आठवण । जाणोनि प्रश्न हरि करी ॥५७०॥
कच्चिद्वः कुशलं ब्रह्मन्राजतो यस्या हि प्रजाः । सुखं वसंतिविषये पाल्यमानाः स मे प्रियः ॥३४॥
कोठूनि येणें जालें स्वामी । कवण ग्राम कवण भूमि । तुमचे देशींचा देशस्वामी । प्रजा स्वधर्मीं पाळी कें ॥७१॥
यतस्त्वमागतो दुर्गं निस्तिर्येहयदिच्छया ।
सर्वं नोब्रूह्यगुह्यं चेत्किं कार्यं करवामते ॥३५॥
दुर्गम मार्ग अतिसंकटीं । क्रमूनि आलेति आमुचे भेटी । कोण इच्छा आहे पोटीं । ते गुह्य गोठी सांगावी ॥७२॥
आम्ही केवळ ब्राह्मणभक्त । आज्ञा करणें हें उचित । काय अपेक्षी तुमचें चित्त । तें मे निश्चित करीन ॥७३॥
कवण कार्याचिये विधि । तूं आलासि कृपानिधि । ते जालीच कार्यसिद्धि । जाण त्रिशुद्धि सर्वथा ॥७४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP