मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर नीयमाने धने गोभिर्नृभिश्चाच्युतनोदितैः ।आजगाम जरासंधस्त्रयोविंशत्यनीकपः ॥६॥शकटशाकटीवृषभभार । चकारें रथाश्वोष्ट्रकुंजर । भरूनि वेसर खेचर खर । बळिष्ठ नर बहु जाती ॥७०॥कृष्णप्रेरणेवरूनि ऐसीं । रत्नें भूषणें द्रव्यराशि । देशोदेशींच्या विविधा दासीं । वोझीं शिरसीं वाहिजती ॥७१॥शस्त्रें वस्त्रें शिबिरें नाना । अस्त्रें यंत्रें साम्राज्यचिना । अनेक वाय्दें ध्वजनिशाणा । आतपत्राणासह शिबिका ॥७२॥अमूल्य गजरथतुरंगरत्नें । सुबद्ध जडिताचीं पल्याणें । पाठितपक्षीपंजर श्वानें । परमजवीनें मृगयार्थ ॥७३॥युद्धकौतुकीं मत्त अविक । शकुंतहंते श्येन अनेक । महिष कुरंग व्याघ्र जंबुक । वानरप्रमुख मृगशाळा ॥७४॥परिमळद्रव्यें नृपोपभोग्यें । धातुपात्रें विचित्ररंगें । परपण्यस्थ वार्धुपवर्गें । पदार्थ अवघे समवेत ॥७५॥अभेद्य कवचें अभेद्य टोप । अभेद्य गजाश्व सन्नाहकल्प । वेश्या नर्तकी मद्यें अमूप । म्लेच्छयूथपवराङ्गना ॥७६॥विविध कुशला दासदासी । गायक नर्तन गुणैकराशि । भिषक् सभेषज गणक जोसी । सेना राक्षसी लुंठन जें ॥७७॥ऐसें द्वारके लुंठन नेतां । तंव येरीकडे वर्तली कथा । मागधा वार्तिकीं कथिली वार्ता । जे यादवघाता म्लेच्छ आले ॥७८॥गर्गक्षोभें वरदकुमर । कालाग्निरुद्राचा अवतार । कालयवन महाक्रूर । म्लेच्छभार त्रिकोटि ॥७९॥बळें भंगूनि मथुरापुर । जीत धरावे कृष्णहलधर । करावया यदुकुळसंहार । हा मुख्यमंत्र यवनांचा ॥८०॥यवन अजिंक रुद्रवरद । ऐकोनि हरिखेला मागध । औषधेंवीण हरला गद । तोचि प्रसिद्ध हा योग ॥८१॥ऐसें मानूनि उत्साहभरें । वार्तिकां देऊनि हेमाम्बरें । पुढती चार प्रेरूनि मथुरे । प्रहरें प्रहरें वृत्त आणी ॥८२॥तेवीस अक्षोहिणी दळ । मेळवूनियां मगधपाळ । धांवणी करूनियां तत्काळ । आला यदुकुळनिर्दळणा ॥८३॥कालयवनेंसीं करावें सख्य । यद्युकुळ मारावें निःशेख । ऐसा पोटीं धरूनि तंवक । जातां वार्तिक भेटले ॥८४॥तिहीं कथिलें यवनमरण । म्लेच्छसैन्याचें मर्दन । मागधभयें रामकृष्ण । जीव घेऊन पळताती ॥८५॥ ऐकोनि प्रळयपवनगति । धांवणी करूनि मागधपति । द्वारके नेतां म्लेच्छसंपत्ति । रामयदुपति मेळविले ॥८६॥अरे कृष्ण कितवपति । आमा अधमा वीरवृत्ति । सांवरोनियां समरक्षिती । सज होऊनि फिरा रे ॥८७॥सतरा वेळा फावली फटी । ते विसरावी आजि गोठी । मागधरूपें कृतान्त कंठीं । पडला हठी महापाश ॥८८॥आयुष्याची पुरली घडी । म्हणूनि वरपडलां काळधाडी । येथूनि तुम्हां अक्षत काढी । ऐसी प्रौढी कवणातें ॥८९॥नोकूनि ऐसी अचागळी । मागध बोले तिये वेळीं । महावीरांची आरोळी । ब्रह्मगोळीं भयजनक ॥९०॥हें देखोनि रामवीर । मागधमर्दनीं आविष्कार । धरितां संकेतें श्रीधर । वारी सत्वर तयासी ॥९१॥येकट घेणें नेतां पंथीं । म्हणती पडिलों मागधाहातीं । धरिली जैसी मनुजाकृति । यालागिं भीति मनुजत्वें ॥९२॥विलोक्य वेगरभसं रिपुसैन्यस्य माधवौ ।मनुष्यचेष्टामापन्नौ राजन्दुद्रुवतुर्द्रुतम् ॥७॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । तथापि मनुष्यनाट्यानुकरण । मागधभयें पलायन । त्वरें करून आदरिलें ॥९३॥राया कुरुकुलमंडनतिलका । शत्रुसैन्याचा प्रबळ आवांका । रामकृष्णीं देखोनि लोका । भयाची शंका दाखविली ॥९४॥मधुवंशींचे माधव दोन्ही । शत्रुप्रतापचंपकघाणी । न साहोनि पलायनीं । त्वरें करूनि प्रवर्तलें ॥९५॥सतरा वेळा वीरश्रिया त्यजिला । अकीर्तिदुर्दशेनें जो वरिला । तो मागधपल्लव डावलिला । समरमाधवीं बलकृष्णीं ॥९६॥अकीर्तिरजःस्वलासंस्पृष्ट । मागध देखोनि विवेकभ्रष्ट । म्लेच्छलुंठनधन यथेष्ट । रामवैकुंठ उपेक्षिती ॥९७॥रजःस्पृष्टाची पडेल छाया । म्हणोनि त्यजिली धनयशमाया । पळते जाले तें कुरुराया । परिसावया दृढ होईं ॥९८॥विहाय वित्तं प्रचुरमभीतौ भीरुभीतवत् । पद्भ्यां पद्मपलाशाभ्यां चेलतुर्बहुयोजनम् ॥८॥म्लेच्छसेनालुंठनवित्त । रत्नवसनें वस्तुजात । हयगजयानें असंख्यात । त्यागूनि त्वरित पळाले ॥९९॥ज्याच्या संकल्पमात्रें करून । ब्रह्माण्डाचें स्थितिलयसृजन । ऐसे निर्भय जे रामकृष्ण । पळती भिवोन भीतवत् ॥१००॥जैसीं लेंकुरें नेणतीं । किंवा वनिता भयाची मूर्ति । त्यांहूनि सहस्रधा सभय चित्तीं । होऊनि पळती भीतवत् ॥१॥कोमळ कमळगर्भीचीं दळें । त्यांहूनि सुकुमार चरणतळें । सभय चपळ पळतिये वेळे । न सांभाळे पथापथ ॥२॥गळोनि पडिलीं पादत्राणें । न संवरती आंगवणें । कंटक कंकर तुडविती चरणें । तद्वेदने न स्मरती ॥३॥व्याघ्र सिंहादि श्वापदश्रेणी । रामकृष्णांच्या पलायनीं । बुजालीं उठती खडखडोनी । चकित होऊनि पाहती ॥४॥काटे वोरबडती आंगा । गुल्मलंघनें जानुजंघा । आरोहावरोह भूधरभागा । श्वास लगबाअ उसंतिती ॥१०५॥न पाहती फिरोनि मागें । वनोपवनें लंघिती वेगें । गिरिकंदरें दुर्गममार्गें । गहनें दांगें अतिक्रमिती ॥६॥ऐसे अनेक ओजनें दुरी । विविध देश लंघिती त्वरीं । मागधभयें राममुरारि । पलायनकारी तुज कथिले ॥७॥पलायमानौ तौ दृष्ट्वा मागधः प्रहसन्बली । अन्वधावद्रथानीकैरीशयोरप्रमाणवित् ॥९॥रामकृष्ण पलायनपर । देखोनि मागध महावीर । हास्य करूनियां रहंवर । प्रेरी सत्वर त्यांमागें ॥८॥मागध प्रेरितां करसंकेतीं । तत्पक्षींचे प्रबळ नृपति । यानें लोटूनि मारुतगती । धरा म्हणती गोरक्षां ॥९॥अश्वसादी राउत राणे । उच्चैःश्रव्याचे आंगवणे । मनोजवीनें अश्वरत्नें । साट देऊनि लोटिती ॥११०॥कुंजरयानीं एक नृपति । एक स्यंदनें मनोरथगति । जवीन क्रमेलकांची पंक्ति । जवें प्रेरिती हरिमागें ॥११॥अनवाहणी पादचारी । कोठें पळती गिरिकंदरीं । धरा मारा भेदा शरीं । तिखटा शस्त्रीं विदारा ॥१२॥ऐशा वल्गना करिती वीर । सिंहनाद भयंकर । रणवाद्यांचे महागजर । चंड भडिमार यंत्रांचे ॥१३॥ऐसा बिभीषाजनक ध्वनि । गाजत मागधाच्या सैन्यीं । विजयवार्ताप्रख्यापनीं । वार्तिक धांवडी स्वपुरातें ॥१४॥नागाधीश संकर्षण । त्रिजगदधीश रमारमण । अतर्क्यमहिम्न हें नेणोन । कृतपलायन रिपु मानी ॥११५॥चरणस्पर्शें तृणादि जीव । उद्धरावे हा मुख्य भाव । भेणें पळती हें लाघव । दाविती माव मनुजवत् ॥१६॥तंव एक म्हणती भरूनि हांवा । पाठिलागें घेतां धांवा । अगाध न कळती कृष्णमावा । काय केव्हां करी करवी ॥१७॥पुढें पळोनि जाती वेगें । किंवा घाला घालिती मागें । न कळे म्हणोनि वाहिनी आंगें । यथाविभागें संरक्षा ॥१८॥एक म्हणती यवनापरी । वोढूनि नेतसे गिरिकंदरीं । सेनेसहित सगरासरी । करवी बोहरी तपस्तेजें ॥१९॥एक म्हणती आलीं मरणें । तंव एक बोलती नवे तरणे । मागधमृगपतीच्या भेणें । यादवें हरणें पळताती ॥१२०॥ईश्वरावतार रामकृष्ण । नेणोनि ऐश्वर्य त्यांचें गहन । मागधसहित यूथपगण । वल्गना करून धांवती ॥२१॥सेनामुखीं दूर ना निकटीं । मागधासम्मुख दिसती दृष्टी । गमती पळतां जाले कष्टी । पळती संकटीं जीवभयें ॥२२॥पळतां टणकलीं बापुडीं । वळती पायांच्या वेंगडी । म्हणोनि विंधिती कानाडी । वोढूनि प्रौढी महारथी ॥२३॥एवं हांवें चढवूनि सकळ । दुरी नेला मागधपाळ । प्रवर्षणनामा उच्च अचळ । वेंघले हरिबळ तें ऐका ॥२४॥प्रद्रुत्य दूर संश्रांतौ तुंगमारुहतां गिरिम् ।प्रवर्षणाख्यं भगवान्नित्यदा यत्र वर्षति ॥१०॥पळतां न पळवे संकटीं । श्रमित पाउलें टाकिती कष्टीं । मागध पाहत असतां दृष्टी । दाटोदाटीं गिरि चढले ॥१२५॥प्रकर्षें पलायन करून । केलें स्वराष्ट्रसंरक्षण । भाविभूपां युक्तिशंसन । म्लेच्छदमनीं याम्येयां ॥२६॥पर्वताश्रयें पादचारी । सबळशत्रु आणिजे हारी । ऐसें सुचवूनि राममुरारि । प्रवर्षणगिरि वळघले ॥२७॥ऐसा मागध नेला दुरी । द्वारके घेणें नेलें कुकुरीं । या विंदानें दोहीं परी । सबळ वैरी आकळिजे ॥२८॥ऐसा गिरीचें महिमान । त्रैलोक्यरक्षक रामकृष्ण । ते रक्षावया आपुले प्राण । जाले शरण ज्या अचळा ॥२९॥किंवा गिरीची तपश्चर्या । सफळ जाणोनि वृष्णिधुर्या । कृपा द्रवतां तत्तोषकार्या । कुरुनरवर्या नग चढले ॥१३०॥मंदर धरिला पृष्ठीवरी । कीं गोवर्धन धरिला करीं । तिसरा प्रवर्षणाख्य गिरि । करी श्रीहरि पदपूत ॥३१॥गृहस्थ वदान्य श्रीसमर्थ । याचक आश्रयी आर्तभूत । तेंवि तो पर्वत समृद्धिमंत । हरिबळ श्रान्त आश्रयिती ॥३२॥समृद्धिमंत कैसा गिरि । अकरा योजनें गगनोदरीं । मेघमंडळ ज्याचे शिरीं । मुकुटाकारीं भासतसे ॥३३॥द्वादश योजनें घनमंडळ । अकरा योजनें अचळमौळ । यालागिं नग तो सर्व्स सजळ । नित्य आखंडळ प्रवर्षे ॥३४॥जळप्रसंगें समृद्धि । सफळ सुरसा दिव्यौषधि । प्राणिमात्रां आधि व्याधि । कदा न बाधी अमरवत् ॥१३५॥आपण पर्वतीं होतां गुप्त । शत्रु जाळील तो पर्वत । ऐसा जाणोनि भविष्यार्थ । आला अनंत प्रवर्षणा ॥३६॥प्रवर्षणाख्य सजळ गिरि । क्षोभोनि जाळील मागध जरी । तथापि तृणवृक्षादि जंतुमात्रीं । पावक न करी पद्रव ॥३७॥ऐसें विवरूनियां मनीं । रामकृष्ण बंधु दोनी । ससैन्य मागध पाहतां नयनीं । गेले चढोनि गिरिशिरसीं ॥३८॥देखत देखत वळघले गिरि । सैन्यें वेष्टिला तो चौफेरी । अपार सैनिक चढले वरी । शिखरीं शिखरीं हुडकिती ॥३९॥जाळी वल्लरी द्रुमकोटरें । दर्या दरकुटें विवरें कुहरें । गुल्मलतापिहित दरे । दांगें प्रचुरें शोधिती ॥१४०॥हातधरणी नरांच्या हारी । सावध करिती परस्परीं । सहस्रधा देऊनि फेरी । दिशा चारी गिरि पाहती ॥४१॥अश्वकुंजररथादि यानें । गिरितळवटीं टाकूनि सैन्यें । गिरि शोधिती सावधपणें । ठेवूनि रक्षणें गिरिभवंतीं ॥४२॥यत्नें शोधितां नानाविधि । रामकृष्णाची न लभे शुद्धि । क्षोभे मागध महाक्रोधी । करी दुर्बुद्धि तें ऐका ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP