मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर इति श्रीरुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां रुक्मिणीलावण्यवर्णनं नाम प्रथमप्रसंगः ॥१॥कृष्णेंसिं शरीरसंबंधु । हा बोलचि तंव असंबंद्धु । वडिलपणें घेतला छंदु । बुमिद्धंदु म्हातारा ॥७६॥कृष्णसोयरीक नये कामा । हें काय कळलें नाहीं तुम्हां । सखा मारिला अहंमामा । तो काय आम्हां धड होईल ॥७७॥एक म्हणती नंदाचा । एक म्हणती वसुदेवाचा । ठाव नाहें बापाचा । अकुळी साचा श्रीकृष्ण ॥७८॥मुळींच नाहीं जन्मपत्र । कवण जाणे कुळगोत्र । कृष्ण नव्हे जी स्वतंत्र । भक्तपरतंत्र सदाचा ॥७९॥कृष्ण कृष्णपणें बहुकाळा । गोगोरक्षक गोवळा । तो तंव माणुसपणावेगळा । नामरूप त्या नाहें ॥४८०॥कर्में पाहतां तो परद्वारीं । गोगोरसांची चोरी करी । धरितां न धरवे निर्धारीं । चोरटा हरि चित्ताचा ॥८१॥गायींपाठीं धांवतां । पळों शिकला तो तत्त्वता । काळयवनापुढें पळतां । जाला रक्षिता मुचुकुंद ॥८२॥कृष्ण वीर नव्हे गाढा । पळाला जरासंधापुढां । भेणें समुद्राचिया अगडा । माजिले दुर्गीं वसतसे ॥८३॥केशिया मारिलें तट्टु । बैल मारिला अरिष्टु । इतुकियासाठीं वीरघाटु । केंवि सुभटु म्हणावा ॥८४॥मारिलें वत्सासुर वांसरूं । बकासुर तें पांखरूं । किरडूं मारिलें अघासुरु । इतुकेन बीर केंवि होय ॥४८५॥कृष्णासि उघड नाहीं वर्तणें । सदा संसारीं लपणें । त्याचीं जाणें मी विंदानें । लपतीं स्थानें ऐक पां ॥८६॥चढे वैकुंठीचिये पहाडीं । क्षीरसागरीं देतसे बुडी । शेषाचिये फडेबुडीं । मिसें निद्रेचेनि राहे ॥८७॥विघ्ने देखोनियां थोर । होय मत्स्य कां सूकर । नातरी पाठी करूनियां निवर । रूप धरी कमठाचें ॥८८॥दैत्य देखोनियां भारी । खांबामाजि तो गुरगुरी । बळें काढिल्या बाहेरी । नर ना सिंह होऊनि ठेला ॥८९॥दैत्य देखोनियां सबळ । जाला भिकारी केवळ । बळीनें केला द्वारपाळ । गळां बाधोनि द्वारेंसीं ॥४९०॥सवेंचि खुजटपण सांडिलें । रूप आणिकचि मांडिलें । दैत्य फळकट कांडिले । मजूर जाले मायेचे ॥९१॥राखतां इंद्राची गाय । दैत्यीं मारियली माय । रडे ये माये ये माये । सांगों काय तयाचें ॥९२॥थोर मांडलें सांकडें । तैं मेळविलीं मांकडें । आतांचि पाहा पां रोकडें । गोवळांपुढें नाचतसे ॥९३॥कृष्णाची आणीक काहणी । तो स्त्री जाला पैं मोहिनी । सुरासुरांतें ठकोनी । महादेवो मोहिला ॥९४॥सेखीं जाला तो म्हाळसा । वासु केला त्या नेवासा । त्याचेनि धर्में राहो कैसा । रविचंद्रांसि लागला ॥४९५॥कृष्णासि नाहीं रूपगुण । न देखों एकदेशीं स्थान । तयाचे गांठीं कैचें धन । भाजीचें पान खातसे ॥९६॥कृष्णासि नाहीं देहाभिमान । नेणे मान कीं अपमान । त्यासि कैचें सिंहासन । वृत्तिशून्य वर्तत ॥९७॥कृष्णाचा भाव एक । नव्हे स्त्री पुरुष ना नपुंसक । पाहतां निश्चयो नव्हे एक । निष्टंक निर्धारु ॥९८॥तयासि माया दोने पाहीं । दोघी वर्तती दोहे ठायें । एक देही एक विदेही । देवकी आणि यशोदा ॥९९॥एकी स्वबोध उपजविती । दुजी वाढवी विषयप्रीति । दोघी सांडूनि तळमळिती । धर्माप्रति धांविन्नला ॥५००॥उच्छिष्टें काढी धर्माघरीं । ब्राह्मणाची भीड थोरी । लाता घाणिल्या उरावरी । तें पद मिरवी निलाजिरा ॥१॥त्या कृष्णासीं सोयरीक करणें । तेंचि आम्हां विटंबवाणें । संसारीं मुख केंवि दाखविणें । लाजिरवाणें लोकांत ॥२॥त्यासि द्यावें जी भावंड । तैंचि आमुचें काळें तोंड । या बोला म्हणाल पाखंड । ज्ञाते उदंड तुम्हांपासीं ॥३॥कृष्ण अतीत चहूं वाचां । तेथ वाग्निश्रयो घडे कैंचा । शब्दें निश्चयो नव्हे साचा । सत्य वाचा हे माझी ॥४॥बोला भाके जो सांपडे । त्यासीच वाग्निश्रयो घडे । हें तंव तेथ अवघेंचि कुडें । जाणत वेडे कां होतां ॥५०५॥कुलकर्माचा अंत । आपणासंकट सकळांचा घात । करणें आहे जीवाआंत । तरीच कृपनाथ वरावा ॥६॥जैसे निजतत्व निर्मळ । तैसा राया राहें तूं निश्चळ । कुलाभिमाने मी सबळ । देहसंबंध मी जाणें ॥७॥जन्म कर्म कुल गोत्र । उंच नीच वर्ण विचित्र । कामाचें जें कर्ममंत्र । जाणता स्वतंत्र मी एक ॥८॥शरीरसंबंधाचें कारण । घटित आहे मजअधीन । प्रकृतिपुरुषां पाणिग्रहण । माझेनि जाण होतसे ॥९॥वचन ऐका जी प्रबळ । चैद्यदेशींचा भूपाळ । महाभिमानिया शिशुपाळ । सोयिरा केवळ तो आम्हां ॥५१०॥शरेरसंबंधाचें घटित । तयासीच आहे निश्चित । तुम्ही बैसलेति पंडित । उचितानुचित विचारा ॥११॥कर्मकाण्डींचे वेदपाठक । बोलावूनि ज्योतिषी गणक । वाग्निश्चयाचें वाग्जालिक । शब्दशास्त्र सोडिलें ॥१२॥मेळ पांचां पंचकांचा । शब्दनिश्चयो तेणेंचि साचा । साभिमानें गर्जे वाचा । सोयिरा अमुचा शिशुपाळ ॥१३॥तदवेत्यासितापाम्गी वैदर्भी दुर्मना भृशम् ।विचिंत्याप्तं द्विजं कंचित्कृष्णाय प्राहिणोद् द्रुतम् ॥२६॥रुक्मिणीनें काया मनें वाचा । निश्चयो केला श्रीकृष्णाचा । बाहेरी निश्चयो शब्दींचा । शिशुपाळेंसीं रुक्मिया ॥१४॥लग्नपत्रिका पाहतां डोळां । एक नाडी शिशुपाळा । कृष्ण नेईल भीमकबाळा । त्यासि अवकळा वरील ॥५१५॥वर शिशुपाळ ऐकतां । दचकले ते राजदुहिता । जैसा सिद्धासि सिद्धिलाभ होतां । उठी अवचिता अंतराय ॥१६॥कवण उपासूं गे देवता । कवण कवण्या जाऊं तीर्था । कवण नवस नवसूं आतां । कृष्णनाथप्राप्तीसी ॥१७॥जैसा सद्बुद्धिआड काम क्रोधु । कां विनेतते आड गर्व मदु । स्वधर्माआड आलस सिद्धु । तैसा बंधु रुक्मिया ॥१८॥जैसा विवेक विरागी । विघ्नें जिणोनि जाय वेगीं । तैसा प्रयत्न कृष्णालागीं । करीन स्वाङ्गीं मी देखा ॥१९॥कृष्णप्राप्तीचा विचार । तेथें करूं नये दुजयाचा संचार । वृत्ति करावी तदाकार । धैर्यें बळें आपुलेनी ॥५२०॥हें गुज सांगों मायेपासीं । परि हें साध्य नव्हे तियेसी । रडों निघेल मोहें कैसी । मिठी लोभेंसीं घालूनि ॥२१॥माझिये आशेच्या साजणी । दीनतृष्णेच्या साजणी । मिळतील सवासना सुवासिनी । मज वेढूनि घेतील ॥२२॥तेणें होईल थोर शब्दु । ऐकेल अभिमानिया बंधु । कृष्णप्राप्तीसि अवरोधु । सबळ क्रोध उपजेल ॥२३॥ऐसें विचारूनि जाण । निज भावाचा ब्राह्मण । आप्त पाचारिला सज्ञान । अतिगहन विवेकी ॥२४॥कृष्णप्राप्तीचा सद्भावो । यालागिं नामें तो सुदेवो । कृष्णाप्रति धाडिला पहावो । निज पत्रिका देऊनी ॥५२५॥सातां श्लोकांची व्युत्पत्ति । उपचार भाव आर्ति कीर्ति । विवेकनिश्चयो निजभक्ति । कृष्णासि विनति पाठविली ॥२६॥एका जनार्दनीं मन । श्रोतीं द्यावें अवधान । प्रेमपत्रिकेचें लेखन । अनुसंधान भीमकीचें ॥२७॥इति श्रीमद्रुक्मिणीस्वयंवर एकाकार टीकायां रुक्मिणीकृत स्तुत्यात्मकनिंदावर्णनं नाम द्वितीयप्रसंगः ॥२॥आपुलिये अर्तीचें अंजन । शुद्धसत्वाचें पत्र जाण । बुद्धिबोधें केलें लेखन । वर्णाक्षरीं अक्षर ॥२८॥मनोवेगाचा पैं वारु । त्यावरी बैसविला द्विजवरु । कृष्णापासीं जी सत्वर । समूळ मूळ पाठविला ॥२९॥माझें पूर्वपूण्य द्विजवरु । कृष्णप्राप्तीसि तूं मज गुरु । म्हणोनि केला नमस्कारू । तेंवि यदुवीर आणावा ॥५३०॥द्वारकां स समभ्येत्य प्रतीहारैः प्रवेशितः । अपश्यदाद्यं पुरुषमासीनं कांचनासने ॥२७॥द्विज पावला द्वारका । वैकुंठकैलासाहूनि अधिका । जेथ निवास जगन्नायका । विश्वव्यापका श्रीकृष्णा ॥३१॥द्वारकाबाह्यप्रदेशीं । आराम रमवी जीवशिवांसी । वसंत निववी सदा सुमनेंसीं । संताप कोण्हासि असेना ॥३२॥प्रेमें विकाशलीं कमलें शुद्ध । गुंजारवती कृष्णषट्पद । ऐकोनि गंधर्व जाले स्तब्ध । सामवेद मौनावे ॥३३॥प्रबोधपारापतें घुमती । तेणें वागीश्वरी चबंके चित्तीं । विस्मित जाला बृहस्पति । आश्चर्ये मानिती सुरवर ॥३४॥डोलत द्राक्षींचे पैं घड । मुक्त परिपाकें अतिगोड । सकळ कामांचे पुरे कोड । गोडांही गोड ते गोडी ॥५३५॥कोकिला कृष्णवर्ण कूजती । शब्दीं निःशब्द मधुरवृत्ति । तेणें सनकादिक सुखावती । प्रजापति तटस्थ ॥३६॥मयूर आनंदें नाचत । अप्सरानृत्य तेणें तटस्थ । ताण्डव विसरला उमाकान्त । अति अद्भुत हरिलीला ॥३७॥शुद्ध हंस द्वारकावासे । मुक्तमोतियें चारा त्यांसी । तें देखोनि परम हंसीं । निजमानसीं लाळ घोंटिजे ॥३८॥शुक पिंगळे अनुवादत । तेणें वेदान्त दचकत । अतिगुह्याचे निजगुह्यार्थ । पक्षी बोलत द्वरकेचे ॥३९॥इतर नगरांची उभवणी । तिंखणांवरी पांचखणीं । त्याही माजि असती दुखणीं । द्वारकपाटणीं तें नाहीं ॥५४०॥द्वारका पाहतां वाडेंकोडें । विजु पिळूनि घातले सडे । मुक्तपताका चहूंकडे । मशक आरी त्यापुधें सत्यलोक ॥४१॥द्वारकेची नवलपरी । चिंतामणीची चिंताहरी । कल्पतरूची कल्पना वारी । परिसाची निवारी जडत्वकाळिमा ॥४२॥दशेचें दैन्य दवडी । अमृताची साल काढी । स्वानंदाची निज गोडी । नांदे उघडी द्वारकेमाजी ॥४३॥द्वारकेमाजी शुद्ध केणें । अक्षरांचें खरें नाणें । जैसें घेणें तैसें देणें । कोण्हाही उणें असेना ॥४४॥वैकुंठींच्या वैभवासी । कृष्णें आणिलें द्वारकेसी । देखतां ठक पडिलें द्विजासी । ते द्वारका कैसी वर्णावी ॥५४५॥द्विजासि सत्वर त्वरा मोठी । नगर न पाहेचि दिठी । भीतरीं पातला उठाउठीं । जेथ जगजेठी श्रीकृष्ण ॥४६॥म्हणोनि द्वारकावर्णन । रहावया हेंचि कारण । द्विजें देखिला श्रीकृष्ण । विस्मित मन तयाचें ॥४७॥हेमसिंहासनीं आदिमूर्ति । बैसला असे सहजस्थिति । द्विजासि देखोनि श्रीपति । भाव चित्तीं जाणीतला ॥४८॥याचिया आगमनविधि । थोर होईल कार्यसिद्धि । फावली एकान्ताची संधि । होय सुबुद्धि ब्राह्मणा ॥४९॥दृष्ट्वा ब्रह्मण्यदेवस्तमवरुह्य निजासनात् ।उपवेश्यार्हयांचक्रे यथाऽऽत्मानं दिवौकसः ॥२८॥सिंहासनाखालती उडी । घालूनि दोन्ही हात जोडी । नमन साष्टाङ्गपरवडी । पूजी आवडी द्विजातें ॥५५०॥अमर करिती कृष्णपूजा । ऐसिया वोजा पूजी द्विजा । ब्रह्मण्यदेव कृष्णराजा । ब्राह्मणपूजा तो जाणे ॥५१॥ब्राह्मणासि मंगलस्नान । देऊनि पीताम्बर चंदन सुमन । सन्निध बैसोनियां आपण । दीधलें भोजन यथारुचि ॥५२॥तं भुक्तवंतं विश्रान्तमुपगम्य सतां गतिः । पाणिनाऽभिमृशन्पादावण्यग्रस्तमपृच्छत ॥२९॥शय्या घालूनि एकान्तीं । अरळसुमनांची निगुती । हातीं धरूनियां श्रीपति । शयन करवी द्विजातें ॥५३॥कृष्ण बैसोनि शेजारीं । ब्राह्मणाचे चरण चुरी । येरें म्हणोनि नरहरि । करीं धरी कृष्णातें ॥५४॥ऐकें स्वामी देवाधिदेवा । म्यां करावी तुझी सेवा । तूं पूजितोसि भूदेवा । ब्राह्मण्यदेव म्हणोनी ॥५५५॥निजात्मभावें उचितें । हृदयीं साहिलें लतितें । तें हित नव्हेचि आमुतें । विपरीतार्थें फळलेंसे ॥५६॥तुझिया पूजा पूज्य जालों । तेणेंचि गर्वासि चढलों । कृष्णसेवेसि नाडलों । थोरावलों अभिमानें ॥५७॥तूं यज्ञपुरुष नारायण । तुज याज्ञिक नेदिती अन्न । वृथा गेलें त्यांचें हवन । कर्मठपण कर्माचें ॥५८॥सर्वभूतीं भगवद्भावो । नुपजे तंव न भेटे दवो । तैसा मी ब्राह्मण नव्हे पहावो । जाणसी भावो हृदयींचा ॥५९॥कृष्णें पुशिलें स्वागत । वृत्ति आहे कीं निश्चित । चित्तीं चिंता ज्या वर्तत । ते दुश्चित सर्वदा ॥५६०॥कच्चिद्विजवर श्रेष्ठ धर्मस्ते वृद्धसंमतः । वर्तते नातिकृच्छ्रेण संतुष्टमनसः सदा ॥३०॥कृष्ण म्हणेगा द्विजवर श्रेष्ठा । वृद्धसंमत स्वधर्मनिष्ठा । एकाग्रमनोवृत्तितुष्टा । फलदा अभीष्टा असती कीं ॥६१॥ज्याची चिंता निवर्त्तली । त्याचीच वृत्ति निश्चित जाली । त्यासींच स्वकर्में फळलीं । निजात्मफळाचेनि फळें ॥६२॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP