मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक १६ ते २० अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक १६ ते २० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १६ ते २० Translation - भाषांतर भगवानपि गोविंद उपयेमे कुरूद्वह ।वैदर्भीं भीष्मकसुतां श्चियो मात्रां स्वयंवरे ॥१६॥शुक म्हणे गा कुरुकुलप्रभवा । कुरुधुरंदर शुभगौरवा । भगवद्विवाह ऐकें बरवा । श्रवणसुदैवा परीक्षिति ॥६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । जो गोविंद श्रीभगवान । तोही भीमकीपाणिग्रहण । करी आपण कैवाडें ॥७॥म्हणल भीमकी ते कवण । कैसें केलें पाणिग्रहण । येथ कैवाड कैसें कोण । संक्षेपकथन तें ऐका ॥८॥विदर्भदेशींचा भीष्मक नृपति । भीमकी त्याची तनया सती । श्रीविद्या जी चित्कालशक्ति । वरी श्रीपति तें ऐका ॥९॥प्रमथ्य तरसा राज्ञः शाल्वादींश्चैद्यपक्षगान् । पश्यतां सर्वलोकानां तार्क्ष्यपुत्रः सुधामिव ॥१७॥शाल्वपौण्ड्रक जरासंध । प्रतापी योद्धे वीर प्रसिद्ध । यांच्या पक्षपातें चैद्य । करी संबंध विदर्भेंसीं ॥३१०॥विदर्भकन्येचें स्वयंवर । सन्नद्ध इत्यादि भंवते भार । त्यांमाजि करूनि बलात्कार । हरी यदुवीर वैदर्भी ॥११॥जैसा खगेंद्र तार्क्ष्यपुत्र । पाहत असतां लोक समग्र । सर्पापासूनि सुधापात्र । हरी श्रीधर तेंवि वधू ॥१२॥बळिष्ठाचे बसवूनि दांत । मथूनि सचैद्य पक्षपात । वैदर्भी जिंकूनि जगन्नाथ । जाला गृहस्थ कुरुवर्या ॥१३॥ऐसी ऐकोनि मुनीची वाणी । अतितर आस्था नृपाचे मनीं । सादर बैसवोनियां श्रवणीं । करी विनवणी ते ऐका ॥१४॥दशमस्कंध वाखाणितां । प्रसंगें रुक्मिणीस्वयंवरकथा । उपायिली ते वर्णूं जातां । धिंवसा चित्ता नुंपलभे ॥३१५॥म्हणाल येथ कोण विचारु । तरी श्रीएकनाथपरमेष्ठिगुरु । भानुकुळीं अपारभास्करु । अज्ञानतिमिरपरिहर्ता ॥१६॥सकाळसद्गुणीं परिपूर्ण । प्रतिष्ठानीं अवतरून । कलिमलमग्ना ब्रह्मज्ञान । प्रबोधून उद्धर्ता ॥१७॥आंगीं वैराग्य धडधडीत । अवलंबूनि भक्तिपंथ । जनार्दनस्वामी सद्गुरुनाथ । सेवूनि परमार्थ साधिला ॥१८॥अभेदगुर्भजनाची मागी । प्रकट आचरोनि दाविली जगीं । गुरुदास्याच्या ऐश्वर्ययोगीं । समता आंगीं शोभविली ॥१९॥अद्वैतबोधें एकात्मता । पूर्णपणें बाणली असतां । ते पहावया हरिहरधाता । अवधूतवेषें पातले ॥३२०॥गूढलिंगी गूढवर्ण । अनाश्रमी उत्पथाचरण । म्लेच्छवाणी प्रभाषण । मानिती जन भय ज्यांचें ॥२१॥ऐसिया वेषें श्राद्धदिवसीं । ब्राह्मणापूर्वीं छळावयासी । येऊनि याचिती अन्नासी । समता कैसी पहावया ॥२२॥एकनाथीं अभंग समता । बाणली पूर्ण एकात्मता । हरिहरब्रह्मादिकीं छळितां । विकल्प चित्ता स्पर्शेना ॥२३॥पात्रें मांडूनि सावकाश । सिद्धान्न अर्पण केलें त्यांस । प्राकृतदृष्टी श्राद्धघ्नदोष । लक्षूनि मानस न झळंबे ॥२४॥सर्वोपचारीं तोषविले । अनन्यभावें प्रसन्न केले । ऐसिये समयीं ब्राह्मण आले । सुस्नात होऊनि सदनासी ॥३२५॥तिहीं प्रसंग तो देखिला । म्हणती परमान्याय केला । पितृयज्ञ वृथा गेला । यजमान जाला श्राद्धघ्न ॥२६॥याचिया आचरणें करून । भ्रष्ट होती कलिकालीन । पुरे यांचें अध्यात्मज्ञान । विष्णु स्मरोन चला वेगीं ॥२७॥ऐकोनि ब्राह्मणांची वाणी । प्रार्थना करूनि लागला चरणीं । क्षणैक स्वस्थानीं बैसोनी । विनीत विनवणी परिसावी ॥२८॥प्रमादें घडलें जें अनुचित । त्यासि अनुताप प्रायश्चित्त । अतिथिपूजनप्रकरणीं शक्त । जाणोनि अवधूत तोषविले ॥२९॥ऐसे यजमान ब्राह्मण । करिती उभयतां भाषण । तव दिव्यरूपें तिघे जण । प्रकट होऊन बैसले ॥३३०॥ब्रह्मा बहृच ऋगध्ययनीं । विष्णु बृहत्सामगायनीं । अयातयाम यजुषें पठनीं । रुद्राभिमानी प्रवर्तला ॥३१॥देखोनि ब्राह्मणां पडिलें ठक । म्हणती अद्भुत हें कौतुक । एकनिष्ठा परम मूर्ख । प्राकृत लोक न मनिती ॥३२॥ब्राह्मणीं नमिले ते अवधूत । तत्काळ जाले तिरोहित । वरदवचनीं एकनाथ । गौरवूनि कृपेनें ॥३३॥मग सोडोनि ब्रह्मार्पण । संपादिला श्राद्धयज्ञ । करूनि ब्राह्मणसंतर्पण । अनुद्विग्न हृत्कमळीं ॥३४॥देवत्रयीं कृपावंत । होऊनि शोधिलें ज्याचें वृत्त । पूर्णब्रह्म जें श्रीकृष्णनाथ । सप्रेमभरीं ज्या सेवी ॥३३५॥यशोदानंदात्मज आवडी । धर्मालयीं उच्छीष्टें काढी । अर्जुनाची धुतलीं घोडीं । येथ कावडी जळ वाहे ॥३६॥अत्रगंधादि धूपदीप । अर्पणीं सादर नित्य समीप । यावेगळे क्लेश अमूप । करितां अल्प श्रम न मनी ॥३७॥ऐसा महिमा अगाध ज्याचा । तिहीं रुक्मिणीस्वयंवर वाचा । वाखाणिलें त्या ग्रंथाचा । विचित्र महिमा जग जाणे ॥३८॥ज्या ग्रंथाचें निरूपणीं । श्रोता वक्ता चक्रपाणि । निमित्तमात्र महाराष्ट्रवाणी । जे अभीष्टदानीं कल्पलता ॥३९॥भाविक साबडे सामान्य जन । नेणती निगमागमविधान । तिहीं भावें करितां पठन । होती पूर्णमनोरथ ॥३४०॥पुत्रार्थियां होती पुत्र । लाहती दारार्थी कलत्र । शत्रुभयार्थ पठतां मित्र । शत्रुत्वत्यागें ते होती ॥४१॥धनार्थियां धनसंप्राप्ति - । कारण उद्योग संपादती । रुग्णीं पढता रोगोपशांति । भयनिवृत्ति भयभीतां ॥४२॥परमार्थबुद्धि निष्काम पठन । करितां लाहती अपरोक्षज्ञान । अमोघसिद्धीचें आयतन । त्यावरी व्याख्यान केंवि कीजे ॥४३॥म्हणती व्यासोक्त प्रमाण । तरी येथ अभिमानी श्रीकृष्ण । इत्यादि सामर्थ्य प्रकटूनि पूर्ण । प्रत्यक्षप्रमाण रूढ करी ॥४४॥श्रीमद्भागवत अठरासहस्र । त्यामाजि दशमस्कंध सार । त्यांतहि रुक्मिणीस्वयंवर । जेथ श्रीधर संनिहित ॥३४५॥तया प्रभूनें एकनाथा । वदनीं प्रकटूनि वदविली कथा । यावरी श्रोकार्थ वाखाणितां । होय तो वृथा वाग्जल्प ॥४६॥इत्यादिविचारें करून । रुक्मिणीहरणपाणिग्रहण । पुढती करावया व्याख्यान । मनाचें वदन मौनावे ॥४७॥हें जाणोनि सर्वज्ञ संत । म्हणती कळला तुझा हेत । यावरी आमुचें अभिप्रेत । तो वृत्तान्त अवधारीं ॥४८॥श्रीएकनाथान्वयरूपी । आणि सज्जनीं सत्स्वरूपीं । सर्वात्मकत्वें विश्वव्यापी । तव वाग्जल्पीं तो वदवी ॥४९॥ग्रंथव्याख्यान खंडित नोहे । मर्यादेचा तंतु राहे । ऐसा एक विचार आहे । तो तूं पाहें विवरूनी ॥३५०॥एकनाथकृत व्याख्यान । मूळश्लोकीं संयोजून । पाठान्तरें असंलग्न। तें तां संलग्न करावें ॥५१॥ऐसी श्रीप्रभूची आज्ञा । मान्य सज्जनां श्रेष्ठा प्राज्ञा । सहसा न करूं अवज्ञा । पुढें वाग्यज्ञा चालविजे ॥५२॥ऐसें अज्ञापिलें संतीं । मग ध्याना आणूनि प्रभूचि मूर्ति । प्रार्थनापूर्वक करितां विनति । कृपेनें संवित्ति प्रकाशिली ॥५३॥मग उघडूनियां नयन । जनीं लक्षूनि जनार्दन । एकात्मता सर्व सज्जन । नमिले पूर्ण सद्भावें ॥५४॥मूळकथेच्या निरूपणीं । रुक्मिणीहरण बादरायणि । वदला संक्षेपें करूनी । विस्तारप्रश्नीं नृप उदित ॥३५५॥राजोवाच - भगवान्भीशःमकसुतां रुक्मिणीं रुचिराननाम् ।राक्षसेन विधानेन उपमेय इति श्रुतम् ॥१८॥राजा म्हणे गा शुक्राचार्या । षड्गुणसंपना वृष्णिधुर्या । कोण भूपति नेदी तनया । अविहितचर्या कां घडली ॥५६॥षड्गुणैश्वर्यसंपन्न । केवळ भगवान तो श्रीकृष्ण । भीमकनृपाचें कन्यारत्न । लावण्यभुवन भीमकी ॥५७॥अनंतकोटिकंदर्पकळा । पूर्णचंद्रीं जालिया गोळा । रुक्मिणीच्या वदनकमळा । तुकितां कांटाळा गौण गमे ॥५८॥ऐसिये रुचिराननेप्रति । राक्षसविधानें श्रीपति । वरिता जाला हे तवोक्ति । ऐकोनि चित्तीं स्मय गमला ॥५९॥राक्षसविधान म्हणसी कवण । युद्धीं बळिष्ठ नृप जिंकून । हठात्कारें कन्याहरण । करूनि लग्न जें कीजे ॥३६०॥चैद्यपक्षग शाल्वादिक । समरीं मथूनि यदुनायक । रुक्मिणी हरिली ऐसा श्लोक । ऐकोनि साशंक मन जालें ॥६१॥पूर्वीं ऐसेंचि विश्वतोमुखीं । पुराणवार्ता श्रुत लौकिकीं । विशेषतर वदनें या श्लोकीं । प्रश्नाभिलाखी मति जाली ॥६२॥तरी हे कथा सविस्तर । सांगा होऊनि कृपापर । तुमच्या वदनचंद्रीं चकोर । ममान्तर सुधाश्रवणीं ॥६३॥ऐसा नृपाचा प्रथम प्रश्न । येऊन प्रभूचें व्याख्यान । तेथें केलें मंगलाचरण । सकारण तें ऐका ॥६४॥साद्यंत दशम न विवरितां । रुक्मिणीस्वयंवरमात्रकथा । श्रीप्रभूनें वाखाणितां । मंगलाचरिता हरि नमिला ॥३६५॥गणेश शारदा कुलदैवत । जनार्दन जगन्मय सद्गुरुनाथ । अभेदएकात्मतेचा तंतु । श्रीएकनाथाथोक्त अवधारा ॥६६॥ श्रीएकनाथोवाच । ॐ नमो जी श्रीकृष्णनाथा । गणेशसरस्वतीनामें धरिता । तूंचि तूं श्रीकुळदेवता । कवणा आतां प्रार्थूं मी ॥६७॥तूंचि अखिल अवघे जन । सहज गुरु तूं जणार्दन । कृष्णकथेसि लाविसी मन । निजात्मगुण गावया ॥६८॥ऐकोनि श्रीकृष्णगुणलावण्य । तेणें चित्तवृत्ति वेधली जाण । कर्माकर्मीं अखंडपण । लागलें ध्यान भीमकीसी ॥६९॥भगवाञ्श्रोतुमिच्चामि कृष्णस्यामिततेजसः ।यथा मागधशाल्वादीञ्जित्वा कन्यामुपाहरत् ॥१९॥ब्रह्मन्कृष्णकथाः पुण्या माध्वीर्लोकमलापहाः । कोऽनु तृप्येत शृण्वानः श्रुतज्ञो नित्यनूतनाः ॥२०॥भगवंता शुकाचार्या । आम्हीं इच्छितों परिसावया । श्रीकृष्णाची प्रतापचर्या । सांगोनि हृदया निववावें ॥३७०॥मागधशाल्वादिकां दृप्तां । जिणोनि जैसी भीष्मकसुता । अमिततेजस्वी जाला हर्ता । सांगे कथा त्या हरिची ॥७१॥शुकयोगींद्राप्रति । प्रश्न केला परीक्षिति । भीमकीहरण श्रीपति । कायनिमित्त पैं केलें ॥७२॥कां करितोसि म्हणसी प्रश्न । तरी मी त्यक्तोदक जाण । वदनकथामृतश्रवण । तें जीवन मज तुझें ॥७३॥विशेष हें कृष्णचरित्र । तुझेनि शुद्धमुखें पवित्र । श्रवण करितां माझें श्रोत्र । अधिकाधिक भुकेलें ॥७४॥इतर कथा नव्हे फुडी । नित्य नूतन ईची गोडी । सेवूं जाणती आवडी । ते परापर थडी पावले ॥३७५॥देखोनि प्रश्नाचा आदर । शुक कथेसि जाला सादर । कैसें बोलिला वचन गंभीर । कृपा अपार रायाची ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP