मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५२ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ५२ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४४ अध्याय ५२ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर गिरौ निलीनावाज्ञाय नाधिगम्य पदं नृप ।ददाह गिरिमेदोभिः समंतादग्निमुत्सृजन् ॥११॥कोणे स्थळीं जाले लीन । तें निश्चयात्मक न कळे स्थान । नाहें पळाले गिरिपासून । रक्षकगण हें कथिती ॥४४॥प्राणधाकें परम गुप्त । लपोनि राहिले इत्थंभूत । जेणें होती हस्तगत । तो उपाय येथ कवण कीजे ॥१४५॥सतरा वेळां पावलों हारी । आजि फावले येकट वैरी । येथ उपेक्षा केलियावरी । करिती बोहरी यशविभवा ॥४६॥यवनाभेणें यादवां पळणी । मुख्यचि सांपडले अडचणी । पर्वतीं राहिलें लपोनि । घेतां हुडकणी नातुडती ॥४७॥यांचिये हननीं कवण यत्न । तो मज सांगा सर्व प्रधान । हें ऐकोनि मंत्रिगण । करिती कथन मगधेशा ॥४८॥सचिवीं जुहारूनि नृपवरा । म्हणती ऐका जी मगधेश्वरा । वधावया वसुदेवकुमरां । वृथा विचारा विवरितसां ॥४९॥भेणें पळतां उरीं फुटलीं । धाके काळिजें उलोनि गेलीं । रक्तें वमूनि बापुडीं मेलीं । असती पडिलीं गिरिकुहरी ॥१५०॥मागध म्हणे हुडता प्रेतें । तंव अमात्य बोलती परम ज्ञाते । पर्वतीं श्वापदें क्रूरें क्षुधितें । तिहीं तत्प्रेतें भक्षिलीं ॥५१॥आतां कोठूनि सांपडती । पुन्हा हुडकितां सैन्यें शिणती । सार्वभौमविजयकीर्ति । भर्ता निश्चिती तूं आतां ॥५२॥ऐसीं ऐकोनि प्रधानवचनें । मागध म्हणे ये संभावने । ऐकोनि तोष न मनिजे मनें । शत्रुविंदानें न तर्कती ॥५३॥आतां एक विचार कीजे । पर्वत इन्धनीं आच्छादिजे । भवंता अग्नि चेतविजे । शत्रु सहजे संहरती ॥५४॥ऐसा विचार विवंचून । अवघे वाहती इंधन । यथाविभागें पर्वत पूर्ण । आच्छादून टाकिला ॥१५५॥समंतात् म्हणिजे सर्वांकडूनी । एकसराचि लाविला अग्नि । प्रबळ ज्वाळा लागल्या गगनीं । गिरिकाननीं महाप्रळय ॥५६॥वृक्ष गुल्म लता तृणें । भस्म झालीं इन्धनाग्नीनें । मूळें वांचलीं सजळपणें । भगवत्करुणामृतलेशें ॥५७॥विविध श्वापदें पक्षिनिचय । देखोनि दावाग्नीचा पळय । करूनि अचळमौळाश्रय । सजल ठाय ते धरिती ॥५८॥सामान्य ज्म्तु पर्वतीं लीन । पर्वताआंगींचे आर्द्रतेकरून । जाळूं न शके हुताशन । त्राता भगवान त्यां तेथ ॥५९॥वृक्ष जळती कडकडाटें । पाषाण फुटती तडतडाटें । शिळा लोटती घडघडाटें । प्रदीप्त इन्धनें कोसळती ॥१६०॥सेनापरिधि पर्वतातळीं । तो त्रासल संतप्त शिळीं । जळत इंधनाची कोसळी । तेणें होळी सैन्याची ॥६१॥देखोनि अग्नि अनावर । पर्वतापासूनि कांहीं दूर । माघारला शत्रुभार । रामश्रीधर विलोकिती ॥६२॥सतरा वेळा साधिला जय । आजि मागधा दीजे विजय । भीमहस्तें याचा लय । होतां समय पुढें असे ॥६३॥ऐसें परस्परें विवरून । काय करिती रामकृष्ण । तें तूं राया करीं श्रवण । म्हणे नंदन व्यासाचा ॥६४॥तत उत्पत्य तरसा दह्यमानतटादुभौ । दशैकयोजनोत्तुंगान्निपेततुरदो भुवि ॥१२॥त्यानंतरें राममुरारि । अकरा योजनें उच्च गिरि । उभे ठाकूनि त्याच्या शिखरीं । खगेंद्रापरी उडाले ॥१६५॥अग्निभयें व्याकुळ कटकें । प्रदीप्तपर्वतीं दृष्टि न टिके । सभय सर्वही ऐसिये घटिके । माजि नेटके झगटले ॥६६॥तरसा म्हणिजे मारुतगती । गगनगर्भीं प्रवेशती । जळत पर्वताचिये प्रांतीं । हूनि यदुपति ते दोघे ॥६७॥उच्च एकादश योजनें । तेथूनि तिर्यक उत्पवनें । करूनि भूंईवरी उत्पतनें । केलीं सैन्यें न लक्षितां ॥६८॥पर्वताभोंवतें सेनावलय । दुश्चित मानूनि अग्निभय । त्यापासूनि दुरी जो ठाय । तेथ यदुवर्य उतरले ॥६९॥अलक्ष्यमाणौ रिपुणा सानुगेन यदूत्तमौ । स्वपुरं पुनरायातौ समुद्रपरिखां नृप ॥१३॥सेना सैनिक समागध । पाहत असतांही सावध । कोण्हा विदित न होतां भेद । गेले अगाध चापल्यें ॥१७०॥रत्नाकराचा ज्यासि अगड । ऐसा द्वारकागड अवघड । तया स्वपुरामाजि सुघड । गेले उघड न लक्षितां ॥७१॥दुरी नेऊनि ससैन्य शत्रु । रामकृष्ण वसुदेवपुत्र । पुढती प्रवेशलं स्वक्षेत्र । आप्त स्वगोत्र तोषविले ॥७२॥समुद्रपारिखा द्वारकापुरी । ऐसी वदली शुकवैखरी । राया या वाक्यामाझारी । हा अर्थ चतुरी जाणावा ॥७३॥रामकृष्ण जाळिले असतां । यदुकुळदळणीं मागधा आस्था । तो कां स्वपुरा जाला जाता । हें नृपनाथा सुचविलें ॥७४॥रामकृष्णांचें केलें दहन । ऐसी लाधली कीर्ति गहन । ते द्वारका न लक्षतां भग्न । होईल म्हणोन परतला ॥१७५॥समुद्राचा जयेसि अगड । स्वर्णमृत्तिका रत्नें दगड । त्वाष्ट्रनिर्मित गड अवघड । जाणोनि सुघड हांव त्यजी ॥७६॥सोऽपि दग्धाविति मृषा मन्वानो बलकेशवौ । बलमाक्रम्य सुमहन्मगधान्मागधो ययौ ॥१४॥तोही मागध महाबळी । बळकेशव जळाले अचळीं । मृषा वार्ता हे तये वेळीं । साच मानूनि निघाला ॥७७॥प्रवर्षणगिरीचा काढिला वेढा । पुरस्सर यूथप करूनि पुढां । पार्ष्णिग्राह मागिलीकडां । सेना चहूंकडा सांभाळी ॥७८॥ठोकिल्या विजयकुंजरभेरी । पताका झळकती विविधाम्बरी । नृत्यगीतवादित्रगजरीं । चालिला भारीं स्वपुरातें ॥७९॥रामकृष्ण भस्म केले । कंसनिष्कृतिशल्य फेडिलें । सपत्रवार्तिक पाठविले । आप्त पूजिले तच्छ्रवणें ॥१८०॥देशोदेशींचे नृपवर । मार्गी जरासंधासमीर । भेटोनि अर्पिती सर्वोपचार । सांगे सादर त्यां वार्ता ॥८१॥विजयलक्ष्मी वरूनि भाजा । स्वपुरा गेला मागधराजा । अस्ति प्राप्ति उभयात्मजा । आनंद वोजा पावविल्या ॥८२॥कुमरी कुढाविल्या स्वतातें । सूड घेतला प्रतापर्वतें । ऐकोनि तोष पावल्या चित्तें । जेंवि इंद्रातें वृत्रजयीं ॥८३॥असो ऐसें मागधाख्यान । कुरुनरेशा केलें कथन । पुढती सिंहावलोकन । बळभगवानचरिताचें ॥८४॥भेटले उद्धवाक्रूरादिकां । नृपबांधवां देवकप्रमुखां । येरां करूनि नतमस्तकां । सभानायकां गौरविलें ॥१८५॥बळकेशव द्वारकापुरीं । आळंगिले मातापितरीं । उग्रसेनादवभारीं । सभेमाझारी जुहारिलें ॥८६॥मग सभास्थानीं बैसले स्थित । रामकृष्ण सहोदर । कृष्णदयार्नवानुचर । येर समग्र पर नमिती ॥८७॥शुक म्हणे गा कौरवधुर्या । रामकष्णांची विवाहवर्या । त्यामाजी रामाची पूर्वींच राया । नवमस्कंधीं तुज कतिली ॥८८॥तिये कथेची आठवण । देऊनि कीजेल निरूपण । श्लोकत्रयें तें व्याख्यान । सावध होऊन अवधारीं ॥८९॥आनर्ताधिपतिः श्रीमान्रैवतो रेवतीं सुताम् ।ब्रह्मणा चोदितां प्रादाद्बलायेति पुरोदितम् ॥१५॥आनर्तदेशींचा जो भूपति । ऐकोनि ब्रह्मयाची वचनोक्ति । रैवत स्वकन्या रेवती । करी युवति बलरामा ॥१९०॥ऐसें नवमस्कंधीं कथिलें । सूत्रप्राय तें सूचविलें । तंव श्रोत्यांहीं आक्षेपिलें । आम्हां परिसविलें पाहिजे ॥९१॥आनर्तदेशनाम कोण । रैवत कोणाचें अभिधान । त्यासि ब्रमा कां करी प्रेरण । जे कन्यार्पण बलरामा ॥९२॥इतुका श्र्लोकोक्तपदविस्तार । देखोनि श्रोतयांचा आदर । जाला निरूपणीं सादर । गोविंदकिंकर दयार्णव ॥९३॥तरी ऐका जी सावधान । अशेषभूतां अधिष्ठान । जो कल्पान्तीं श्रीभगवान । उरे आपण विश्वलयीं ॥९४॥जो कां निर्गुण निराकार । क्रियातीत निर्विकार । तो विश्वात्मा विश्वंभर । प्रकृतिपर जे होय ॥१९५॥चिच्छक्तीच्या अंगीकारें । शुद्धसत्वात्मकता स्फुरे । माहविष्णुत्वें आविष्कारे । सत्तामात्रें जगज्जनक ॥९६॥तयाचिया नाभिपद्मा । रजात्मकत्वें सृजनकर्मा । जन्म पावला स्वयंभू ब्रह्मा । नारायणनामा समष्टि जो ॥९७॥तयाचा मानसपुत्र मरीचि । कश्यप महर्षि संतती त्याची । कश्यपापासूनी भास्कराची । उत्पत्ति जाली हें जाणा ॥९८॥भास्करापासूनि श्राद्धदेव । संज्ञेपोटीं ज्याचा प्रभव । मनु ऐसें त्याचेंचि नांव । श्रद्धा स्वमेव मनुपत्नी ॥९९॥श्रद्धेपोटीं दहा पुत्र । इक्ष्वाकुप्रमुख परम पवित्र । मनुऔरस धर्मतत्पर । परम शूर भूचक्रीं ॥२००॥त्यांमाजी शर्याति नामा तिसरा । परिसा तयाचिया चरित्रा । जेणें जाऊनि अंगिरससत्रा । द्वितीयाह्नतंत्रा निरूपिलें ॥१॥सुकन्यानामें शर्यातिसुता । कमललोचना सद्गुणभरिता । तयेचा वियोग न साहे पिता । वसे सर्वथा जनकापें ॥२॥अपूर्व कोणे एके दिवसीं । सवें घेऊनि सुकन्येसी । मृगयाव्याजें काननासी । च्यवनाश्रमासि नृप गेला ॥३॥च्यवनाश्रमीं च्यवनमुनि । परम तपस्वी बैसला ध्यानीं । वल्मीकरंध्रीं नयन दोन्ही । खद्योतप्राय झळकती ॥४॥तंव राजा निरत मृगयाच्छंदीं । सुकन्या वेष्टित सखींची मांदी । वल्मीकरंध्रीं कंटकें भेदी । तन्नेत्रज्योती आश्चर्यें ॥२०५॥पूर्वदैवें प्रेरिली असतां । बालभावें मुग्धावस्था । आश्चर्य मानूनि कंटकघाता । करी ते तत्वता मुनिनयनां ॥६॥नयन फोडितां कंटकघातें । बहुत रुधिर स्रवलें तेथें । देखोनि सुकन्या शंकितचित्तें । निघती जाली तेथूनी ॥७॥च्यवनभार्गव परमधीर । तपस्तेजाचा भास्कर । न दंडळितां अणुमात्र । केलें चरित्र तें ऐका ॥८॥राजा अमात्य सैनिक सैन्य । मूत्रपुरीषनिरोधन । होतां जाले परम दीन । म्हणती कोण अनय हा ॥९॥च्यवनभार्गवमुनीचें कांहीं । आम्हीं अनर्थ केलें नाहीं । मंत्रियां म्हणे पाडा ठायीं । मुनीचा अन्यायी कोण असे ॥२१०॥कोण्ही वृक्षासि दुखविलें । किंवा जंतूतें दुःख दिधलें । कोण्ही जळचरां त्रासिलें । कीं डहुळिलें स्वच्छांभ ॥११॥कोण्ही वेंचिलीं असती सुमनें । कीं फळपल्लवां केलीं लवनें । कीं आश्रमींचीं श्वापदें सुलीनें । आमुच्या भेणें पळालीं ॥१२॥भार्गवाचा अपराध कोण । घडला असे आम्हांपासून । तोविचारा धुंडूनि सैन्य । किमर्थ रोधन मळमूत्रा ॥१३॥ऐसी ऐकोनि नृपाची गोठी । मंत्रिप्रधानीं देऊनि घरटी । शोधितां अन्याय न पडे दृष्टि । होती कष्टी मळरोधें ॥१४॥गजाश्वक्रमेळनरखरवृष । मळमूत्ररोधें पावले क्लेश । तेव्हां सुकन्या स्वजनकास । कथी अशेष वृत्तांत ॥२१५॥सुकन्या म्हणे अहो जी ताता । अपूर्व ऐका जी वृत्तांता । वल्मीकरंध्रीं द्वय खद्योतां । कंटकघाता म्यां केलें ॥१६॥तेथें स्रवलें रुधिर बहु । देखोनि धाकला माझा जीवु । मनीं मानूनि परम भेंवु । आलें स्वमेव तुम्हां जवळीं ॥१७॥ऐसी सुकन्या वदतां पितरा । राजा म्हणे हा अपराध खरा । कैसी मुनीच्या अभ्यंतरा । क्शमा उपजेल या उपरी ॥१८॥सुकन्या नेणती अज्ञान । नेणोनि फोडिले मुनीचे नयन । अपराध नोहे कीं हा सान । केंवि प्रसन्न मुनि होय ॥१९॥मग जाऊनि वल्मिकानिकटीं । मुनिपादुका धरूनि मुकुटीं । म्लानवदनें अधोदृष्टि । सभय पोटीं विनवीतसे ॥२२०॥मंदंदवचनें बोले । मद्दुहितेनें अनार्य केलें । बालबुद्धीनें अयुक्त घडलें । पाहिजे क्षमिलें स्वामींहीं ॥२१॥स्वामी सर्वज्ञ अंतरसाक्षी । मी निष्कपट कृपापेक्षी । अज्ञानकुमरीच्या अपराधाविषीं । उचित तुम्हांसि सोढव्य ॥२२॥जिव्हा वोष्ठ आपुल्या दंतें । रगडल्या अपराध तो कवणातें । किंवा स्वनेत्र अंगुलिघातें । खोंचतां ज्ञाते क्षमिती कीं ॥२३॥स्वामी अभेद आत्मज्ञानीं । विश्वात्मकत्वें तनुवर्तनीं । असतां बालिश अनार्य ग्लानि । अंतःकरणीं न धरावी ॥२४॥ऐसी ऐकोनि नृपाची विनति । च्यवनभार्गव द्रवला चित्तीं । म्हणे तव तनया नेणती । प्रणीता किंवा अप्रणीता ॥२२५॥इनें नेणतां अनार्थ केलें । परंतु आमुचे नेत्र गेले । पुढें वर्तन कैसें चाले । हें विवरिलें पाहिजे ॥२६॥ऐसें मुनीचें अभिप्रेत । ऐकोनि राजा विचारवंत । म्हणे सुकन्या वरूनि गृहस्थ । मम जामात होइजे ॥२७॥ऐकोनि शर्यातीचें वचन । च्यवनभार्गवें केलें मान्य । सुकन्येसिं पाणिग्रहण । औपासन चालविलें ॥२८॥सुकन्या वरितां च्यवनऋषि । मुक्तता झाली मळमूत्रासी । आज्ञा मागूनि वधूवरांसी । निजनगरासी नृप गेला ॥२९॥सुकन्या लाधली कोपिष्ठ भर्ता । अपरसृष्टीचा सृजनकर्ता । तथापि लक्षूनि निजहितार्था । वर्त्ते चित्तानुरूप ॥२३०॥जेंवि रसरंगीं जीवन । कट्वम्लतिक्तामाजि लवण । पाचक रोचक गुणवर्धन । वर्त्ते मिळोन ते तैसी ॥३१॥देखोनि तिची सरळ वृत्ति । स्नेहं द्रवला कृपामूर्ति । म्हणे शर्यातिकन्या हे मम युवति । क्लेश पावती मत्संगें ॥३२॥पतिव्रता हे सद्गुणखाणी । कमनीय सुशीळा सुभगा तरुणी । अंध जरठ मी ईलागूनी । भर्त्ता होऊनि जाचितसें ॥३३॥वय लावण्य ईचें निपाडें । आपुले शरीरीं जेणें जोडे । ईश्वरकृपेनें हें जरी घडे । तरी हे न पीडे मत्संगें ॥३४॥ऐसा संकल्प मुनीचे मनीं । उठतां अश्विनीकुमार दोन्ही । आले आश्रमालागूनी । च्यवनें आसनीं बैसविले ॥२३५॥स्वागतप्रश्नें संतोषविले । आर्घ्यपाद्यादि आतिथ्य केलें । प्रेमें लब्धोपचार अर्पिले । मग प्रार्थिले तोषवुनी ॥३६॥तुम्ही अमरवर्य ईश्वर । आयुर्वेदविदांवर । मज करूनि दिव्योपचार । दिव्यशरीर करा माझें ॥३७॥जरठ अंध वयातीत । तो मी तरुण लावण्ययुक्त । प्रमदा देखतां धरिती हेत । मम सुरतार्थ मनोरथीं ॥३८॥दिव्यचक्षु दिव्यतनु । मज अर्पाल नवयौवन । तरी मी करीन प्रत्युपकरण । तें संपूर्ण अवधारा ॥३९॥भिषक म्हणोनि सोमाधिकारीं । तुम्हां वर्जिलें असे अमरीं । ऐसियातेंही सोमाध्वरीं । भागाधिकारी करीन ॥२४०॥शक्रप्रमुख देवतापंक्ति । तुम्हांसि नाहीं अवदानप्राप्ति । ऐसियांतेंहे सोमाहुतीं । मी निजशक्ति प्रवर्तवीन ॥४१॥ऐसें ऐकोनि च्यवनवचन । नासत्यांचें तोषलें मन । वाढ म्हणोनि अंगीकरण । मुनि आज्ञेचें तिहीं केलें ॥४२॥अंध जरठ धरूनि दोघीं । अमृतहृदीं रिघतां तिघीं । मजनमात्रें तनु अनंगीं । तुळितां गमती यवागळिया ॥४३॥तिघां समान कमनीयता । दिव्य अवयव समसाम्यता । देखोनि सुकन्येचिया चित्ता । विस्मय चिंता झळंबली ॥४४॥सुस्नात ह्रदाबाहीर आले । समान दिव्यतनु तिघेही जाले । सुकन्यामानस विस्मयें भरलें । परी व्यापिलें चिंतेनें ॥२४५॥तिघांमाजि भर्ता कोण । नोहे पूर्वील परिज्ञान । मग नासत्यां अनन्यशरण । जाले संपूर्ण सद्भावें ॥४६॥तुम्ही माझे जननीजनक । स्वर्गभूषण अमरभिषक । कन्या तुमची मी निष्टंक । भर्ता सम्यक मज दावा ॥४७॥माझें पतिव्रत न भंगे । सप्तगोत्रां कळंक न लगे । तुमची कीर्ति त्रिजगीं जागे । ऐसें सवेगें तुष्टावें ॥४८॥हें ऐकोनि सुकन्यावचन । अमरवैद्यांचें द्ववलें मन । म्हणती पतिव्रतांमाजि तूं रत्न । त्रिजगीं धन्य तूं एकी ॥४९॥म्हणती सुकन्ये शुभानने । तनुसाम्यत्व ह्रदमज्जनें । परंतु न तुळों मुनीच्या ज्ञानें । हें निजमनें निर्धारीं ॥२५०॥वेदवेदाङ्गपारंगत । च्यवनभार्गव मुनिवरनाथ । आमुसीं तुळिसी तो समर्थ । यदर्थीं भ्रांत कां होसी ॥५१॥तनुसादृश्यें नयना भ्रम । अगाध मुनीचा तपोविक्रम । तुझा कांत हा भार्गवोत्तम । घेऊनि स्वधर्म संरक्षीं ॥५२॥सुकन्या नमूनि अश्विनीकुमरां । मग वंदिलें निजभर्तारा । देखोनि यथोक्त सदाचारा । मग अंतरा दृढ केलें ॥५३॥देखोनि पातिव्रत्यसुनेमा । आह्लाद जाला भिषकोत्तमां । सुकन्येहस्तीं मुनिसत्तमा । देऊनि स्वधामा निघाले ॥५४॥उभयतांची घेऊनि आज्ञा । आरूढोनिया दिव्यविमाना । नासत्य गेले अमरभुवना । सुकन्याच्यवना बहुहर्ष ॥२५५॥स्नान संध्या औपासन । ब्रह्मयज्ञ पितृतर्पण । देवमनुष्यभूतयज्ञ । अतिथिपूजन नित्यत्वें ॥५६॥ऐसीं संपन्न सदाचारीं । आश्रमीं वसती प्रेमादरीं । तंव कोणे एके काळान्तरीं । शर्याति करी आगमन ॥५७॥स्मरोनि मुनीचा पूर्वापराद । सेना ठेवूनि समर्याद । आश्रमें प्रवेशे सावध । तंव मानी विरुद्ध दुहितेचें ॥५८॥सूर्यवर्चस्वी पुरुष तरुण । स्कन्येनिकटीं देखिला दुरून । सुकन्या जनकातें देखोन । वंदी चरण आह्लादें ॥५९॥सुकन्येनें नमितां चरण । आह्लाद न वटे नृपाच्या मना । कांहीं नेदूनि आशीर्वचना । आलिंगना उपेक्षी ॥२६०॥वदे कन्येसि निर्भर्त्सून । तुझे कैसें हें दुष्टाचरण । जगद्वंद्य जो मुनि च्यवन । जरठ म्हणून त्यजिला तां ॥६१॥स्वैरिणी असतीस संमता । जारअध्वग जोडिला भर्ता । त्यातें भजसी लंघूनि व्रता । केंवि दुष्पथा आचरसी ॥६२॥सत्कुळीं जन्मोनि ऐसी मति । उभयकुळांतें अधोगति । जार स्वीकेला उपपति । ओयीं परती निर्लज्जे ॥६३॥माझिये जठरीं तां जन्मोन । लाविलें द्वयवंशा लांछन । ऐसें ऐकोनि जनकवचन । प्रसन्नवदनें हास्य करी ॥६४॥तैसाचि प्रसन्न सस्मित मुनि । विस्मित शर्याति देखोनी । तंव सुकन्या कथी वचनीं । जनकालागूनि वृत्तांत ॥२६५॥भो भो जनका ऐकें मात । च्यवनभार्गव हा तव जामात । अश्विनीकुमारवरें प्राप्त । सम मन्मथलावण्ये ॥६६॥नासत्यवृत्तान्त सविस्तर । ऐकोनि शर्याति नृपवर । परमाह्लादें मुनीश्वर । नमूनि सादर आळंगी ॥६७॥सुकन्येसि देऊनि क्षेम । त्यजिला मनींचा विकल्पभ्रम । स्वस्थ लाहूनि मुनिसंगम । सांगें स्वनेम मुनिपासीं ॥६८॥मुनीतें म्हणे नृपोत्तम । यज्ञ करावयाचा मज काम । म्हणोनि स्वामेंचा आश्रम । ठाकूनि सप्रेम पातलों ॥६९॥ऐकोनि आह्लादला च्यवन । म्हणे तूं शर्यातिराया धन्य । करविता जाला सोमयजन । ऋत्विजगण मेळवुनी ॥२७०॥कुंडें मंडप वेदी शुद्ध । समित्कुशाज्य द्रव्यें विविध । मंत्र तंत्रोपकरणें सिद्ध । करवी प्रबुद्ध च्यवनऋषि ॥७१॥अध्वर्यु जाला स्वयें च्यवन । सोमाधिकारी नसतां पूर्ण । तयां नासत्यां सोमावदान । देता झाला स्वतेजें ॥७२॥तें देखोनि क्षोभला इंद्र । च्यवनहनना उचलिला वज्र । वज्रेंसहित अमरेंद्रकर । स्तंभी मुनिवर प्रतापें ॥७३॥जैसा अचंचळ शिळास्तंभ । तैसा सवज्र हस्त उत्तंभ । देखोनि म्हणती सुर मुनि सभ्य । सोमींचा लाभ सुरवैद्यां ॥७४॥वैद्य म्हणोनि अनर्ह सोमीं । बहिष्कृत केले होते आम्हीं । ते आजि च्यवनमुनीच्या विक्रमीं । लाधले सोमीं हविर्भाग ॥२७५॥इंद्रें जाणोनि मुनिप्रताप । शान्त केला स्वकृत कोप । क्रतुसुकृतें शर्यातिभूप । फळअर्पणें गौरविला ॥७६॥तया शर्यातीचे जठरीं । पुत्र तिघे जन्मले क्षेत्रीं । तयांचीं नामें श्रोतीं श्रोत्रीं । सुकृत पात्रीं परिसावीं ॥७७॥उत्तानबर्हि ज्येष्ठ कुमर । आनर्तनामा त्याहूनि अवर । कनिष्ठ भूरिषेण नृपवर । जाले भूधर भूपाळ ॥७८॥तया आनर्तें वसविला देश । आनर्त ऐसें नाम त्यास । कळावया हें श्रोतयांस । हा इतिहास निरूपिला ॥७९॥गोमतीरत्नाकराच्या मेळीं । कुशदैत्यानें कुशस्थळीं । निर्मूनि वसवीत होता बळी । त्या निर्दाळी त्रिविक्रम ॥२८०॥त्यावरी तैसेंचि रिक्त स्थान । बसवीत होते दस्युगण । पुढें आनर्तनंदन । करितां शासन भूचक्रा ॥८१॥तो रेवतनामा आनर्तस्त । रेवताचळींचा जो नृपनाथ । तेणें मर्दूनि दस्यु दुष्कृत । रत्नाकरांत प्रवेशला ॥८२॥रत्नाकराचा भवंता अगड । देखोनि कुशस्थळी अवघड । दुर्ग निर्मूनियां सुघड । राहिला प्रौढ प्रतापी ॥८३॥आनर्तप्रमुख देश सकळ । स्वशासनें स्वधर्मशीळ । पाळी रेवत अवनिपाळ । आनर्तबाळ तेजस्वी ॥८४॥तया रेवतापासून । जाले शतपुत्र उत्पन्न । ककुद्मिकन्या रेवत अवनिपाळ । जीचें लावण्य अद्वितीय ॥२८५॥ककुद्मीं ज्येष्ठ रेवतसुत । रैवत ऐसा ज्या संकेत । झाला कुशस्थळीचा नाथ । रेवतीवृत्तान्त अवधारा ॥८६॥रेवतीसौंदर्यपडिपाडें । शोधितां त्रिजगीं वर न जोडे । रेवत ती घेनि कोडें । गेला निवाडें विधिसदना ॥८७॥रेवतीलावण्यपंकजभ्रमर । निर्मिला असेल जो भूवर । तो ब्रह्मया पुसोन वर । व्हावें सादर तदर्पणीं ॥८८॥तंव ते ब्रह्मसभेमाझारीं । गंधर्वगायन सप्तस्वरीं । ब्रह्मा तन्मय त्यामाझारीं । न फवे अवसरीं नृपप्रश्ना ॥८९॥तया गंधर्वगायनाअंतीं । विधीतें नमोनि रेवतनृपति । कन्या द्यावी कवणाप्रति । केली विनति विधातया ॥२९०॥ऐसें ऐकोनि रेवतवचन । हांसोनि बोले चतुरानन । म्हणे राया त्वत्कालीन । भूपसंतान संहरलें ॥९१॥तां जे हृदयीं धरिले भूप । तत्पुत्रपौत्रसंतति अमूप । परंपाअ गणितां न लगे माप । जाला लोप तद्गोत्रा ॥९२॥येथ जो गायनीं लोटला क्षण । त्यामाजि युगचौकडिया पूर्ण । सप्तविंशति जाल्या जान । गेले नृपगण बहुकोटि ॥९३॥अठ्ठाविसावी चौकडी । उदैली वर्तमान रोकडी । येथ देवदेवांश अवतार प्रौढी । दुष्कृतकोडीसंहरणा ॥९४॥तो संकर्षण पुरुषरत्न । त्यासि तुझें हें कन्यारत्न । अर्पीं करूनि पाणिग्रहण । सफळप्रयत्न तैं अवघा ॥२९५॥ऐसा विधीनें आज्ञापिला । ब्रह्मया वंदूनि स्वपुरा आला । तंव राक्षसीं विध्वंस केला । स्ववंश लाविला दिगंतीं ॥९६॥आपुले वंशज गोत्रवर्ग । कुशस्थळीचा करूनि त्याग । राक्षसभयें विपत्तियोग । अष्ट दिग्भाग वसविती ॥९७॥ऐसें देखोनि विटला मनीं । म्हणे अश्लाघ्य राहणें मर्त्यभुवनीं । मग रेवतीकन्या सवें घेऊनी । पातला वृष्णिप्रवरापें ॥९८॥आनकदुंदुभि वृष्णिप्रवर । तत्सुत विष्णूचा अवतार । स्वकन्येसि तो केला वर । मानूनि यंत्र स्रष्ट्याचा ॥९९॥आर्षमार्गें पाणिग्रहण । करविलें अर्पूनि कन्यारत्न । वंदूनि वृष्णि यादवगण । बदरिकारण्य प्रवेशला ॥३००॥परम विरक्त भूप ककुद्मीं । जाऊनि नारायणाश्रमीं । तपश्चर्या नित्य नेमीं । मुनिसंत्तमीं मिरवला ॥१॥श्रोतीं केला होतां प्रश्न । आनर्तदेश नाम कोण । रेवत कोणाचा नंदन । विध्याज्ञापन तें कैसें ॥२॥तरी शर्यातीचा आनर्त तनय । आनर्तदेश तद्राष्ट्रीय । रेवत आनर्ताचा तनय । कथिला अन्वय प्रश्नाचा ॥३॥ऐसा पूर्वींच नवमस्कंधीं । संकर्षणाचा विवाहविधि । कथिला असतां इयेसंधी । पुन्हा बोधी सिंहदशा ॥४॥तैसेंच समासें वक्षमाण । रुक्मिणीचें पाणिग्रहण । करिता जाला श्रीभगवान् । तें निरूपण अवधारा ॥३०५॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP