मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ५६ ते ६० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ५६ ते ६० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ५६ ते ६० Translation - भाषांतर सरिद्वनगिरिद्रोणीर्वीक्षन्कुसुमितान्द्रुमान् । कृष्णं संस्मारयन्रेमे हरिदासो व्रजौकसाम् ॥५६॥यमुनाप्रमुख नानासरिता । कुंजकाननें पिहितलता । गोवर्धनादि अधोर्ध्व भंवता । पाहे पुरता हरिचर्या ॥६२०॥गुहागह्वरें वप्रें शिखरें । प्रफुल्ल वल्ली द्रुम कांतारें । कृष्णक्रीडितें पाहोनि नेत्रें । सप्रेमभरें हरि हृदयीं ॥२१॥हरिक्रीडेचीं पाहतां भुवनें । उद्धव निवे स्वांतःकरणें । गोपी गोपाळ व्रजस्थें जनें । तत्तत्स्मरणें निववितसे ॥२२॥हरिदासां जो अग्रगणी । तो उद्धव निवोनि स्वांतःकरणीं । हरिक्रीडेच्या अनुस्मरणीं । व्रजा लागूनि अभिरमवी ॥२३॥ऐसा उद्धव कित्येक मास । करितां व्रजजनीं सहवास । गोपिकांचा प्रेमोत्कर्ष । देखोनि संतोष पावला ॥२४॥नंद यशोदा सुहृदां स्वजनां । अजा अविका पशु गोधना । कृष्नें वेधलें व्रजस्थां जनां । परी न पवती तुळणा गोपींची ॥६२५॥जीवन जिवलग सर्वां जीवां । तेंवि व्रजजन प्रिय केशवा । मत्स्या वियोग न साहवे केव्हां । गोपीभावा ते तुळणा ॥२६॥कुलटा स्वैरिणी जारनिपुणा । कुंकुमकज्जलवसनाभरणा । सालंकृता लावण्यगुणा । कामुकां तरुणां भुलविती ॥२७॥मधुरनर्मोक्तिभाषणें । ठाणठकारें कटाक्षबाणें । चाटुचटुलकुलटाचिह्नें । विंधिती मनें भुजगांचीं ॥२८॥तैशा स्वैरिणी नव्हती गोपी । निष्काम साधक जपी तपी । योगी विरक्त निर्विकल्पी । तेंवि हरिरूपीं रंगल्या ॥२९॥ज्ञानी विवेकविरांगवंत । व्यतिरेकबोधें निजत्मरत । साधनसंपन्न्न उपरमयुक्त । कृष्णीं निरत या तैशा ॥६३०॥नाहं देहो नेंद्रियगण । नाहंकार नाहं प्राण । इत्यादि व्यतिरेकें निरसन । करिती सज्ञान गुरुवचनें ॥३१॥गोपीलागिं ते स्वयंभ दशा । बाणली न करितां शास्त्राभ्यासा । होऊनि भवभानीं उदासा । कृष्णपरेशा अनुसरल्या ॥३२॥तनुलावण्या वस्त्राभरणा । गात्रा नेणती नग्नानग्ना । पतिपुत्रादि स्वजना सदना । सर्व ईषणा न स्मरती ॥३३॥दृश्याभासा घालूनि पाणी । विमुख जालिया तन्मात्रज्ञानीं । केवळ निद्रिता भवभानीं । रतल्या कृष्णीं आत्मत्वें ॥३४॥सांख्यवेदांतपरिशीलनें । नित्यानित्यविवेकज्ञानें । साधनसंपतिव्याख्यानें । तें स्वयंभ लक्षणें गोपींचीं ॥६३५॥शास्त्राधारें शब्द वदती । आंग्मीं दुर्लभ अपरोक्षस्थिति । दशासिद्धि त्यां केउती । मा कृष्णप्राप्ति केंवि घडे ॥३६॥गोपिकांचा अगाध महिमा । वेधें विसरल्या भवसंभ्रमा । प्रेमें रतल्या आत्मयारामा । पूर्णकामा श्रीकृष्णा ॥३७॥ऐसा विवेक बहुधापरी । उद्धव आपुले हृदयीं विवरी । तो तूं कुरुवर्या अवधारीं । शुकवैखरी वदतसे ॥३८॥दृष्ट्वैवमादि गोपीनां कृष्णावेशात्मविक्लवम् । उद्धवः पप्रमप्रीतस्ता नमस्यन्निदं जगौ ॥५७॥ऐसी पूर्वोक्त बहुतां परी । ऐकोनि गोपींची वैखरी । व्रजीं राहोनि चिरकाळवरी । अवस्था नेत्रीं पाहोनी ॥३९॥कृष्णाकार जालीं मनें । कृष्णीं उपरम पावलीं करणें । कृष्णावेशें आविष्करणें । जिणें मरणें तन्निष्ठा ॥६४०॥शरीरभावीं परम ग्लानि । क्षुधे तृषेची नेणती हानि । कृष्णविरहाचा दावाग्नि । तावी म्हणोनि बरळती ॥४१॥क्षुधा तृषा नेणती कांहीं । तेणें प्राणांसि विकळता देहीं । परी ते मनासि ठाउकी नाहीं । ध्यानप्रवाहीं उन्मन तें ॥४२॥सर्वदा कृष्णक्रीडाध्यान । तेणें सदैव मन उन्मन । प्रवृत्तीसी पडिलें शून्य । प्रपंचभान मावळलें ॥४३॥ऐसी गोपींची देखोनि स्थिति । उद्धवें चमत्कारूनि चित्तीं । धन्य मानूनि परम प्रीति । करी प्रनति गोपींतें ॥४४॥पुरस्कारोनि वारंवार । सप्रेम घाली नमस्कार । म्हणे धन्य हा व्यभिचार । कैवल्यपर अवघाचि ॥६४५॥नमीत होत्साता गोपींतें । उद्धव विवरी आपुल्या चित्तें । शास्त्रज्ञ दोष देखती येथें । धर्मशास्त्रातें लक्षूनी ॥४६॥प्रत्यक्ष जो कां आपुलीं जननी । अथवा सर्वत्र गुरूची पत्नी । सामान्य सर्वत्र वर्णा ब्राह्मणी । नमितां श्रेणी पुण्याच्या ॥४७॥वैश्यवर्णीं गोपवनिता । म्यां क्षत्रियें यालागिं नमितां । वर्णविभागें अयोग्यता । धर्मशास्त्रता प्रतिभासे ॥४८॥शास्त्रदृष्टीच्या परिहारा । वर्णी गोपींच्या अधिकारा । म्हणे प्रेमळा कैवल्यपरा । महत्त्वें थोरा व्रजललना ॥४९॥श्लोकपंचकें उद्धवगीत । क्षणैक परिसा सावधचित्त । ज्याच्या श्रवणें सभाग्य भक्त । अधिकारवंत जाणवती ॥६५०॥एताः परं तनुभृतो भुवि गोपवध्वो गोविंद एव निखिलात्मनि रूढभावाः । वांछंति यद्भवभियो मुनयो वयं च । किं ब्रह्मजन्मभिरनंतकथारसस्य ॥५८॥उद्धव म्हणे इये धरणीं । देहधारी जितुके प्राणी । त्यांमाजि या व्रजमानिनी । धन्य जन्मोनि भूलोकीं ॥५१॥धन्य सफळ जन्म यांचें । ऐका रहस्य या वाक्याचें । नैसर्गिक प्रेम साचें । परमेश्वरीं यां घडलें ॥५२॥गोप्ता गोमय गोगोविंद । अखिलात्मा जो परमानंद । त्याच्या ठायीं कृतसौहार्द । प्रेमा विशद पैं यांचा ॥५३॥सदनीं धनीं तनुसंतानीं । पृथक्प्रेमा वाढे मनीं । प्रवृत्तिविसरें एकवटुनी । अवघा कृष्णीं तो यांचा ॥५४॥नितरां म्हणिजे अतिशयेंसीं । रूढभाव म्हणिजे ज्यासी । नैसर्गिक तो प्रेमा यांसीं । पूर्वपुण्येंसीं जोडला ॥६५५॥जन्ममरणांचा ज्यासि धाक । तापत्रयाची धुकधुक । कर्मबंधें त्रासले लोक । मोक्ष निष्टंक इच्छिती ॥५६॥ऐसिया मुमुक्षुवर्गाप्रति । नैसर्गिक भगवद्गति । श्रमतां न जोडे कल्पांतीं । जे व्रजयुवती लाधलिया ॥५७॥अथवा मनातें धरूनि मुठी । मननशीळही मुनिजन हठी । येहीं कष्टतां बहुसंकटीं । प्रेमा पोटीं हा नुपजे ॥५८॥संकल्पाचा करूनि न्यास । कर्मत्यागें कृतसंन्यास । गोपींऐसा प्रेमा विशेष । तेहीं निःशेष न लाहती ॥५९॥योगाभ्यासी जितप्राण । त्यांसही हा प्रेमा गहन । न लभे करितां अनेक शीण । बल्लवीगणसमसाम्य ॥६६०॥अथवा आम्ही सात्वत भक्त । भगवत्प्रेमें भवविरक्त । ऐसिया आम्हांही अप्राप्त । प्रेमा निश्चिंत गोपींचा ॥६१॥तीर्थवासी मरती शिणें । याज्ञिकें श्रमती मखसाधनें । तापसें करिती व्रताचरणें । तनुशोषणें कृच्छ्रादि ॥६२॥वेदशास्त्रादि स्तोत्रपाठ । नानादेवताराधननिष्ठ । पुरश्चरणाचे साहती कष्ट । परि हा उद्भट भावन त्यां ॥६३॥निसर्गप्रेमा दुर्लभ दानीं । न लभे आपूर्तादिसाधनीं । न जोदे जपजाप्यविधानीं । गोपींलागूनि फळला जो ॥६४॥यालागीं पावन भगवत्प्रेमा । किमर्थ योनि उत्तम अधमा । वृथाचि अभिजात्यादिगरिमा । पुरुषोत्तमा भाव प्रिय ॥६६५॥जनकशुक्लें जननीजठरीं । गात्र परिणमे नवमासवरी । जन्म पावे योनिद्वारीं । तें निर्धारीं शौक्ल जन्म ॥६६॥शौक्ल जन्म सर्वां जाती । विशेष वर्णाग्र्यमहंती । तेथिंची ऐकावी व्युत्त्पत्ति । सावध श्रोतीं होऊनी ॥६७॥करावया वेदपठन । अधिकारसिद्ध व्रतबंधन । सावित्र जन्म त्या अभिधान । वैश्यान्तत्रिवर्णंपर्यंत ॥६८॥यज्ञाधिकारसिद्धीसाथीं । ब्राह्मण सर्वां वर्णां मुकुटीं । श्रौतदीक्षा मखपरिपाटीं । तृतीय जन्म्न दैक्षाख्य ॥६९॥वृथाचि ऐसीं त्रिविध जन्में । वृथाचि श्रौतस्मार्तादि कर्में । वृथा वाहिजे वर्णाग्र्यगरिमे । हरिपदप्रेमें न रंगतां ॥६७०॥अग्रवर्णाच्या या गोठी । तेथ कायशा सामान्यकोटी । असो जो सर्वलोकांही मुकुटीं । तो ब्रह्मा शेवटीं न तुळेचि ॥७१॥येथ ब्रह्माचि न सरता । कायसी ब्रह्मलोकाची कथा । ब्रह्मलोकावाप्ति वृथा । कर्मठें इच्छितां न लजती ॥७२॥विद्या वयसा रूप बळ । सत्ता संपदा कुळ शीळ । भगवत्प्रेमेंवीण वोफळ । जैसें मृगजळ श्रम न हरी ॥७३॥श्रेष्ठजन्माचा अतिशय वृथा । सत्यलोकादि कायसी कथा । भगवत्प्रेमा प्राप्त नसतां । शीणचि नुसता सर्वत्र ॥७४॥हो का कोण्ही जातिविशेष । कोण्हे योनिमाजि वास । परि गोपींऐसा प्रेमोत्कर्ष । लाहतां सारांश हरिप्राप्ति ॥६७५॥तेंचि जन्म उत्तमोत्तम । कुळ शीळ रूप नाम । धन्य तेंचि धर्म कर्म । भगवत्प्रेम जे ठायीं ॥७६॥शुक म्हणे गा कुरुकुळनरपा । हरिरति दुर्लभ कंजजगरपां । ते हे सुलभ अबळां गोपां । प्रौढां स्तनपां गोवत्सां ॥७७॥ऐसीच आणखी एक परी । भगवत्प्राप्ति निजनिर्धारीं । तेही राया तूं अवधारीं । उद्धव वैखरी जें वदला ॥७८॥अनंताचिया अनंत काथा । त्रिजगीं विस्तृता गुणगणभरिता । तद्रसपानीं सादर श्रोता । गोपीसमता तो पावे ॥७९॥जातिवर्ण त्या न लगे श्रेष्ठ । सप्रेमभावें श्रवणनिष्ठ । विधिहरशक्रांहूनि वरिष्ठ । मानी वैकुंठ प्रियतम त्या ॥६८०॥तस्मात् महत्त्वा कारण । तो हा भगवत्प्रसाद पूर्ण । भगवत्प्रेमोपलब्धीविण । जन्म वर्ण सर्व वृथा ॥८१॥भगवत्प्रेमाचिये प्राप्ति । कुळ शीळ वर्ण जाति । अथवा ज्ञानाची संपत्ति । न लगे व्युत्पत्ति बहुशास्त्रीं ॥८२॥तरी ते केंवि चढे हाता । ऐसा संदेह बाधी चित्ता । केवळ भजनें हरिएकांता । प्रेमोत्कटता वश होय ॥८३॥तें या श्लोकीं निरूपण । उद्धव विवरी अनुतापोन । श्रोतीं करूनि मनाचे कान । हें व्याख्यान परिसावें ॥८४॥क्केमाः स्त्रियो वनचरीर्व्यभिचारदृष्टाः कृष्णे क्क चैष परमात्मनि रूढभावः । नन्वीश्वरोऽनुभजतोऽविदुषोऽपि साक्षाच्छ्रेयस्तनोत्यगदराज इवोपयुक्तः ॥५९॥उद्धव म्हणे कोण या स्त्रिया । वनौकसा वनचरप्रिया । नेणती विधानविधिचातुर्या । श्रुतिपथचर्या अश्रुत यां ॥६८५॥केवळ मूढा श्वापदवत । परम तुच्छ यांचें जीवित । अधिकार पाहतां अपाड बहुत । कीं हरिएकांत यां योग्य ॥८६॥तथापि व्यभिचारप्रेमेंकरून । ज्यांचें वर्तन सदूषण । व्यभिचारदुष्टा हें अभिधान । श्रुतिधर्मज्ञ ठेविती ॥८७॥ऐसियां आणि हरिएकांत । उन्मत्तपुष्पीं उमाकांत । तेंवि व्यभिचारें त्रैलोक्यनाथ । रानटां प्राप्त अघटित हें ॥८८॥अहो श्रुतिपथधर्माभिमानी । युगीं युगीं चक्रपाणि । नानारूपें अवतरोनी । धर्मस्थापनीं प्रवर्त्ते ॥८९॥तो हा अधर्मव्यभिचारपथें । इहीं स्ववश केला येथें । अधर्ममार्गें स्वधर्मकृत्यें । इहीं समस्तें लाजविली ॥६९०॥श्रुताध्यय्यनीं विमुखा नारी । तथापि केवळ या वनचरी । अधर्मस्वधर्ममार्गकुसरी । कोणे संसारीं नेणती ॥९१॥तिहीं व्यभिचारप्रेमभावें । भगवन्निष्ठा वरिली जीवें । विधिविधान नाहींच ठावें । मा जेणें घडावें दूषण ॥९२॥तस्मात् वेदशास्त्रपुराणयोग्यता । तुळिता न तुळे सप्रेमपथा । प्रेमें पाविजे हरिएकांता । विधान वृथा तद्रहिता ॥९३॥बाळक शब्दचातुर्य नेणे । कोडोळ्यासि कोमडें म्हणे । परि तें माता अंतर जाणे । तेंवि सर्वज्ञें जगदीशें ॥९४॥गोवाची पुदी बोबडावाणीं । बाळक मागे अज्ञानपणीं । त्या गुळाची पुरी वोपी जननी । अनर्थचि आणी सरळार्था ॥६९५॥कीं तें अनन्यभावें जननी । वांचूनि त्रिजगीं श्रेष्ठ न मनी । तेंवि निरूढ प्रेमा कृष्णीं । व्रजकामिनीबहुपुण्यें ॥९६॥भजनोपलब्धप्रेमभरें । कृष्णीं रंगल्लिया व्यभिचारें । अंतर जाणोनि कमलावरें । आत्माकारें रमविलिया ॥९७॥बहुतेक ईश्वर जो सर्वज्ञ । त्यासि अविदुष ज्ञानहीन । भजतां त्याचें न्यून पूर्ण । करी कल्याण प्रसादें ॥९८॥परिस जैसें कां लोहाचें । दैत्य फेडूनि कांचन साचें । करी तैसेंचि व्यभिचाराचें । दूषण पालटि हरितुष्टि ॥९९॥कीं तमाढ्य कुहुचे रातीं । दैवें उगवलिया गभस्ति । तैं तो तामत्त्वा करी निवृत्ति । धवळी जागती निज तेजें ॥७००॥कीं उपयुक्त सुधारस । सर्व रोगांचा करी नाश । न पाहे आयुर्विधानास । चिकित्सा त्रिदोष न विचारी ॥१॥तेंवि भजनोपलब्धप्रेमें । अविदुष भजतां अविधिक्रमें । परि अनन्य जाणोनि पुरुषोत्तमें । कैवल्यधामें गौरविजे ॥२॥साक्षाच्छ्रेय तो अपवर्ग । वोपी न मगतां अव्यंग । बळिष्ठ सप्रेमभजनमार्ग । त्याविण व्यंग विधिपदवी ॥३॥जाति चंपक शेवंती बकुळा । पासूनि कनकौळें जासनीळा । प्रियतम न गणोनि परिमळा । तेंवि गोपाळा व्रजललना ॥४॥तें या श्लोकीं निरूपण । उद्धव बोले चमत्कारून । शुकें नृपासि केलें कथन । तें व्याख्यान अवधारा ॥७०५॥नायं श्रियोंऽगज नितांतरतेः प्रसादः स्वर्योषितां नलिनगंधरुचां कुतोऽन्याः । रासोत्सवेऽस्थ भुजदंडगृहीतकंठलब्धाशिषां य उदगाद्वजबल्लवीनाम् ॥६०॥अपूर्व गोपींवरी प्रसाद । करिता झाला जो मुकुंद । पोर्वीं श्रियादि प्रेमळ वृंद । कोणी विशद न लाहती ॥६॥ललनारत्न लक्ष्मी श्रेष्ठ । सागरसंभवा वरिष्ठ । ऐश्वर्यसौभाग्यें एकनिष्ठ । तेही फलकट गोपींसीं ॥७॥लक्ष्मी निजांगीं वक्षस्थळीं । पादसेवनीं चरणकमळीं । तीसि हे प्रसादनव्हाळी । कोण्हे काळीं अप्राप्त ॥८॥जयेसि सर्वदा एकांतरति । अनन्यनिरता सुभगा सती । गोपीप्रसादाची प्राप्ति । तेही कल्पांतीं न लाहे ॥९॥उकरार्थें आश्चर्य मोठें । हेंचि राया आम्हांसि वाटे । जें न लाहती नितांत निकटें । तें लाहती रानटें गोवळियें ॥७१०॥आणि लक्ष्मीच्या सहोदरी । ज्या जन्मल्या क्षीराब्धिजठरीं । पद्मगंध ज्यांच्या शरीरीं । पद्मकांति पद्माक्षी ॥११॥पद्माकृति करपदतळें । पद्मवदना लावण्यमेळें । मनसिज ज्यांच्या प्रतापबळें । जिंके सगळें ब्रह्मांड ॥१२॥ज्यांचा तापसांसि दरारा । ऐसिया स्वर्गांगना अप्सरा । गोपींसमान त्याही चतुरा । प्रसादपरा न होती ॥१३॥तेथ इतरा प्राकृतनारी । केंवि या प्रसादा अधिकारी । म्हणसी कोणते प्रसादथोरी । ते अवधारीं कुरुनरपा ॥१४॥लक्ष्मी चिरकाळ इच्छी रति । तीसि दुर्लभ श्रीपदप्राप्ति । तो बलात्कारें कमलापति । गोपींप्रति आळंगी ॥७१५॥रासक्रीडेच्या आनंदें । भुजदंड पसरूनि श्रीमुकुंदें । आलिंगूनि आनंदकंदें । बल्लवीवृंदें तोषविलीं ॥१६॥कंठीं संलग्न होतां हरि । लाधल्या प्रासदसिंधुलहरी । तेचि दुर्लभ सर्वांपरी । समता न करी कमलाही ॥१७॥तया आनंदाचा लेश । दुर्लभ सहसा विधिहरांस । कदा न लाहती खगेंद्रशेष । सनकादिकांस अप्राप्य ॥१८॥ ऐसा गोपींचा भाग्यमहिमा । वर्णूं न शके फणींद्र ब्रह्मा । तो तुज कथिला श्रवणकामा । नृपसत्तमा संक्षेपें ॥१९॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP