मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ३६ ते ४० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ३६ ते ४० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ३६ ते ४० Translation - भाषांतर मय्यावेश्य मनः कृत्स्नं विमुक्ताशेषवृत्ति यत् । अनुस्मरंत्यो मां नित्यमचिरान्मामुपैष्यथ ॥३६॥पूर्वीं मत्संगसेवनें । मनिष्थ जालीं तुमचीं मनें । आइतीं स्तिमित विरहध्यानें । अन्यसाधनें न लगती ॥५९॥कृत्स्न म्हणिजे समग्र मन । माझ्या ठायीं प्रवेशून । अनुवेदनें माझें स्मरण । करितां संपूर्ण महत्प्राप्ति ॥४६०॥समग्र मन तें म्हणाल कैसें । अषेष करणवृत्तिसरिसें । एकवटोनि अवस्थानाशें । विषयाध्यासें सुटलें जें ॥६१॥जैसा सूर्य किरणगौळा । करूनि टाकी अस्ताचळा । तेंवि करणवृत्तिमेळा । मानसें सकळा आवरूनि ॥६२॥करणवृत्तिसहित मन । मनमाजि प्रवेशतां पूर्ण । तुटले विषयासक्तिगुण । निर्मुक्तपण सहजेंचि ॥६३॥जेव्हां विमुक्त अशेष वृत्ति । तेव्हांचि जाली भवनिवृत्ति । तस्मात् बाणल्या ऐसी स्थिति । तैं मत्प्रपति अतिशीघ्र ॥६४॥अवज्ञा हेलन सन्निधानें । मानस वेधे विरहध्यानें । ज्या कारणास्तव तीं लक्षणें । तुम्हीं संपूर्ण अनुभविलीं ॥४६५॥आतां माझें अनुस्मरण । मन्निष्ठता अनुवेदन । तेणें मदैक्य पावलां पूर्ण । चिरकाळ साधन न करितां ॥६६॥म्हणाल समाधानास्तव । ऐसिया उक्तीचें गौरव । दावूनि माधुर्यरसाची ठेव । स्नेहलाघव पोखणें ॥६७॥यदर्थीं ऐका वो कल्याणी । प्रतीति बाणे तुमच्या मनीं । ऐसें बोलिला चक्रपाणि । ते हे हरिवाणी अवधारा ॥६८॥या मया क्रीडता रात्र्यां वनेऽस्मिन्व्रज आस्थिताः । अलब्धरासाः कल्याणो माऽपुर्मुद्वीर्यचिंतया ॥३७॥मजसीं वनितां क्रीडता रातीं । जाणूनि प्रेमनिर्भरा चित्तीं । धांवोनि येतां मजप्रति । गृहीं स्वकांतीं रोधिल्या ॥६९॥ अप्रपत माझी रासक्रीडा । भर्तृनिरोधें पावल्या पीडा । क्रीडाध्यानीं त्यांस चाडा । देहसांकडाहूनि सुटल्या ॥४७०॥त्या माझेनि वीर्यचिंतनें । मजसीं मिनल्या माझेनि ध्यानें । हें जाणिजे तुमचेनि मनें । तरी संशय करणें कां येथ ॥७१॥ऐसीं कृष्णाचीं शब्दरत्नें । उद्धव पारखूनि देतां यत्नें । व्रजवनिताही घेऊनि श्रवणें । अंतःकरणें निवालिया ॥७२॥कुरुकुलमलयाचलचंदन । श्रोता परीक्षिति विचक्षण । सादर देखोनि पुढां कथन । करी संपूर्ण शुकयोनी ॥७३॥श्रीशुक उवाच - एवं प्रियतमादिष्टमाकर्ण्य व्रजयोषितः । ता ऊचुरुउद्धवं प्रीतास्तत्संदेशागतस्मृतीः ॥३८॥गोपीमानसप्रियतम कृष्ण । तदुक्त संदेश करूनि श्रवण । पूर्वस्मृतीचें लाहूनि स्मरण । करिती भाषण उद्धवेंसीं ॥७४॥गोप्य ऊचु :- दिष्ट्याहितो हतः कंसो यदूनां सानुगोऽधकृत् ।दिष्ट्याप्तैर्लब्धसर्वार्थैः कुशल्यास्तेऽच्युतोऽधुना ॥३९॥उद्धवातें म्हणती गोपी । यादवांचा वैरी पापी । दुःखदायक खटाटोपी । वधिला प्रतापी रामकृष्णीं ॥४७५॥ऊर्जितदैवें परमानंदें । सानुगशत्रूचे खाणोनि कांदे । स्वजनसुहृदेंसीं मुकुंदें । ऐश्वर्य समुदें सेविजतें ॥७६॥यादव लागले देशोदेशीं । कृष्णें संपदा वोपूनि त्यांसीं । सर्वही करूनि मथुरावासी । आतां तिहींसीं कुशळ असे ॥७७॥कुशळ रामकृष्ण बंधु । कुशल स्वपक्ष सात्वतसिंधु । आतां किमर्थ स्नेहसंबंधु । कीं तो व्रजवधू स्मरेल ॥७८॥ऐशा बल्लवी वदल्या एकी । तंव विरहोत्सुका ज्या आणिकी । अभीष्ट गोष्टी पुसती मुखीं । तें श्रोतीं कौतुकीं परिसावें ॥७९॥कथं रतिविशेषज्ञः प्रियः स पुरयोषिताम् । नानुबध्येत तद्वाक्यैर्विभ्रमैश्चानुभाजितः ॥४०॥देव मानव आब्रह्मभुवन । रमवूं जाणे रति अभिज्ञ । परम प्रियतम तो जोडला कृष्ण । भाग्यसंपन्न पुरवनिता ॥४८०॥रतिविशेष जेथ जे जैसे । कृष्ण तेथ ते जाणे तैसे । पुरवनितां तो जोडला असे । त्या स्वविलासें भजविती ॥८१॥चाटुचटुला मधुरा वचनीं । सलज्ज मंद स्मित ईक्षणीं । वक्र व्यंकट कटाक्षबाणीं । नागरा स्वगुणीं अर्चिती ॥८२॥इत्यादि ललनालालसललितीं । लाघवललाम लावण्यदीप्ति । स्ववश करितां हरिहक्पातीं । स्नेहावर्ती कां न पडे ॥८३॥पुरस्त्रीस्नेहें बांधला हरि । कोठूनि आमुचें स्मरण करी । आम्ही वृथा वराका नारी । झुरों अंतरीं तद्विरहें ॥८४॥ऐशा एकी बोलों सरल्या । तंव आणिकी उदिता जाल्या । कृष्णप्रेमें विरहाथिल्या । काय बोलिल्या तें ऐका ॥४८५॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP