मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - तं वीक्ष्य कृष्णानुचरं व्रजस्त्रियः प्रलंबबाहुं नवकंजलोचनम् । पीतांबरं पुष्करमालिनं लसन्मुखारविंदं मणिमृष्टकुंडलम् ॥१॥अनुचर कृष्णाचा उद्धव । त्यातें व्रजस्त्रिया सर्व । देखोनि मानिति अपूर्व । तूं ते अवयव अवधारीं ॥२९॥सरळ सलंब बाहुयुगळ । नयन नवकंजदलविशाळ । मणिमंडितें कुंडलें तरळ । फांके झळाळ गंडयुगीं ॥३०॥तेणें फुल्लारपंकजवदन । दिसे अत्यंत सुप्रसन्न । हेमपीतांबरपरिधान । श्वेतप्रावरण पांघुरला ॥३१॥कंठीं विचित्र पंकजमाळा । आंगीं सौंदर्यश्रियेची कळा । त्यातें देखोनि बल्लवबाळा । वदती नृपाळा तें ऐका ॥३२॥शुचिस्मिताः कोऽयमपीच्यदर्शनः कुतश्च कस्याच्युतवेषभूषणः । इति स्म सर्वाः परिबव्रुरुत्सुकास्तमुत्तमश्लोकपदांबुजाश्रयम् ॥२॥अपीच्य म्हणिजे सुंदरतर । ज्याचें दर्शन मनोहर । तिलक भूषणें अलंकार । वेषें अपर हरिसाम्य ॥३३॥अगे हा कोण कोठोनि आला । येथ कोणाचा प्रेरिला । हरिवेषासम भूषाथिला । नव्हे हा पहिला अक्रूर ॥३४॥कृष्णपदांबुजाश्रय । उद्धव परमपार्षदवर्य । त्यातें वेष्ठूनि वधूसमुदाय । कृतविस्मय मिळाला ॥३५॥सर्वदा कृष्णविरह पोटीं । तेचि सर्वत्र अचगमे गोठी । श्रवणीं पदतां शब्दसृष्टि । तद्गूपें उठी अर्थबोधु ॥३६॥दृष्टी पडे तें तावक । ऐसें तव वेधाचें लावक । तावी विरहाचा पावक । तेणें नावेक गतशंका ॥३७॥नाममात्र त्या अक्रूर । क्रिया पाहतां परम क्रूर । याचें कोमळ सदयांतर । वाटे अनुचxx कृष्णाचा ॥३८॥ऐसा करूनि दृढ निश्चय । सादर गोपींचा समुदाय । सांडूनि लौकिकशंकाभय । करिती काय तें ऐका ॥३९॥तं प्रश्रयेणावनताः सुसत्कृतं सव्रीडहासेक्षणसूनृतादिभिः ।रहस्यपृच्छन्नुपविष्टमासने विज्ञाय संदेशहरं रमापतेः ॥३॥हा कृष्णाचा संदेशहर । तेणें धाडिला समाचार । ऐसें जाणोनि वनितानिकर । जाला तत्पर सप्रेमें ॥४०॥उद्धवाप्रति नम्रपणें । सत्कारपूर्वक केलीं नमनें । सत्कारिला कवण्या गुणें । तियें लक्षणें अवधारा ॥४१॥सलज्ज मन्दहसित वदनें । व्यंकटकटाक्षनिरीक्षणें । सूनृत म्हणिजे सुललित वचनें । सम्मुखीकरणें पैं केलीं ॥४२॥इत्यादि संस्कारीं सुसंस्कृत । नम्रभावें नमस्कृत । आसनीं बैसला आनंदभरित । गुह्यवृत्तांत त्या पुसती ॥४३॥प्रेमोत्सुका आपुले पोटीं । अन्योक्तीच्या वदती गोष्टी । त्या तूं ऐकें श्रवणपुटीं । कुरुवरकोटीरललामा ॥४४॥जानीमस्त्वां यदुपतेः पार्षदं समुपागतम् । भर्त्रेह प्रेषितः पित्रोर्भवान्प्रियचिकीर्शया ॥४॥श्रीकृष्णाचा पार्षद ऐसा । निश्चय करूनि दृढमानसा । आम्ही तूंतें उत्तम पुरुषा । आलासि ऐसा जाणतसों ॥४५॥बरव्या प्रकारें आलासि येथें । किमर्थ ऐसें कल्पितां चित्तें । तुझिया स्वामीनें धाडिलें तूंतें । ज्या कार्यातें तें ऐका ॥४६॥नंदयशोदा पितरें जाण । त्यांच्या चित्ताचें समाधान । करावयाचें इच्छेंकरून । तुजलागून पाठविलें ॥४७॥निजपितरांचें प्रियतम करणें । हेतुगर्भित हें बोलणें । उद्धवें जाणावया निजमनें । वदती वचनें तें ऐका ॥४८॥अन्यथा गोव्रजे तस्य स्मरणीयं न चक्ष्महे । स्नेहानुबंधो बंधूना मुनेरपि सुदुस्त्यजः ॥५॥मातापितरें बंधु स्वजन । यांचा स्नेह दुस्त्यज जाण । केलियाही संन्यासग्रहण । स्नेहबंधन तुटेना ॥४९॥माता ठेवूनि बंधूपासीं । आपण जाइला जरी संन्यासी । बंधु पावल्या पंचत्वासी । तैं लागे मातेसि पोसावें ॥५०॥तस्मात् दुस्त्यज मातापितरें । त्यांप्रति धाडिलें तुउज यदुवीरें । येर्हवीं त्याचे सखे सोयरे । व्रजीं दुसरे कोण पां ॥५१॥इये गाईच्या गोठणी । कैंचे जिवलग त्यालागुनी । ज्या तो स्मरेल अंतःकरणीं । ऐसें कोण्ही न देखों ॥५२॥जरी तूं म्हणसी व्रज समस्त । गोविंदासि जिवलग आप्त । तरी ते कार्यापुरती मात । सदृष्टांत अवधारीं ॥५३॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP