मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४७ वा| श्लोक ४६ ते ५० अध्याय ४७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५० श्लोक ५१ ते ५५ श्लोक ५६ ते ६० श्लोक ६१ ते ६५ श्लोक ६६ ते ६९ अध्याय ४७ वा - श्लोक ४६ ते ५० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४६ ते ५० Translation - भाषांतर किमस्माभिर्वनौकोभिरन्याभिर्वा महात्मनः । श्रीपतेराप्तकामस्य क्रियेतार्थः कृतात्मनः ॥४६॥हें ऐकोनि येरी वनिता । वास्तवबोधें परमार्थता । कृष्ण परमात्मा तत्त्वता । त्या हे वृथा उपयोग ॥२२॥महान् आत्मा म्हणिजे धीर । षड्गुणैश्वर्यवंत सधर । त्यासि केतुला राज्यभार । कायसा दारपरिग्रह ॥२३॥जो कां प्रत्यक्ष लक्ष्मीपति । त्या हे केतुली नृपसंपत्ति । आवाप्तकाम आत्मस्थिति । न धरी आसक्ति लक्ष्मीची ॥२४॥कृतात्मा जो पूर्ण स्वयें । कोण अर्थ त्या साक्षेप होय । वृथा त्यातें आत्मविषयें । कवळितां विरहें संतप्ता ॥५२५॥तो सर्वत्र अनासक्त । सर्वसाक्षी सर्वातीत । त्याची आशा धरूनि व्यर्थ । विरहें संतप्त होतसां ॥२६॥परं सौख्यं हि नैराश्यं स्वैरिण्यप्याह पिंगला । तज्जानतीनां नः कृष्णे तथाप्याशा दुरत्यथा ॥४७॥ज्या कारणास्र्तव कृष्णरति । दुर्लभ सनकादिकांप्रति । तद्दुराशा धरूनि चित्तीं । व्याकुळा निश्चिती होतसों ॥२७॥यास्तव ऐका वो निरुतें । परमसुख नैराश्यापरौतें । नाहीं ऐसें जाणतसां तें । नैराश्य सर्वांतें दुष्कर ॥२८॥दुष्कर म्हणाल कोणेपरी । तेंही ऐका हो सुंदरी । सर्प लटिका कळल्या दोरी । उचलूनि करीं मग घेती ॥२९॥दोरी घेतलिया हातीं । सर्पभयाची होय निवृत्ति । तैसी आशा बाधक कळल्या चित्तीं । नैराश्यस्थिति न बाणे ॥५३०॥करकंकणा दर्पण काई । आम्हां हें कळलें असता बाई । दृढ नैराश्य न धरे देहीं । इतरां काई म्हणावें ॥३१॥आम्ही जाणतसों पिंगळा । वेश्या स्वैरिणी अमंगळा । नैराश्यसुखाचा सोहळा । भोगूनि सकळांतें वदली ॥३२॥पिंगळा म्हणाल कोठील कोण । ऐका तयेचें संक्षेप कथन । उद्धवासि बल्लवीगण । अनुवादोन जाणविती ॥३३॥मिथिला विदेहाची नगरी । पिंगला वेश्या तिये पुरीं । वर्तत असतां स्वैराचारी । तिसी अवसरी हे घडली ॥३४॥नित्य नूतन पुरुष तरुण । त्यासि दावी तनुलावण्य । कुलटाकौशल्यें भुलवून । स्वभोगदानें धन इच्छी ॥५३५॥कोणे एके सुदैवदिवशीं । भोगार्थ पुरुष न जोडे तिसी । आशा धरूनि निजमानसीं । पन्यवीथीसी निरखितसे ॥३६॥ऐसी क्रमिली अर्धरात्री । पुरुषमात्रा खुणावी नेत्रीं । कोण्ही न जोडे सकामगात्री । न पडे श्रोत्रीं तच्चर्चा ॥३७॥म्हणे वृथा हा श्रृंगार । वृथा सुकले सुमनहार । वृथा उदविलें शयनागार । वृथा उपचार रतियोग्य ॥३८॥वृथा चालिली आजिची रजनी । पुरुष सधन तरुण शयनीं । आलिंगनीं मजलागुनी । स्मररंगणीं न जोडे ॥३९॥आतां नराशा निराश जाली । दुराशा दुःखद मनीं उरली । अर्ध रजनी क्रमोनि गेलेले । गळीं मासोळीसम करपे ॥५४०॥पूर्वभाग्यें तिच्या मनीं । विरक्ति उपजली ते क्षणीं । म्हणे आशा ही पापिणी । दुःखश्रेणी मज वोपी ॥४१॥ऐसें विवरूनि मानसीं । विटली ग्राम्यजनविषयांसी । दृढनैराश्यें हृदयस्थासी । भजतां स्वसुखासी पावली ॥४२॥तेणें निष्कृष्टनराशा त्यजिली । दृढनैराश्यें सुख पावली । आम्हांसि ते हे प्रतीति आली । परी न वचे त्यजिली हरि आशा ॥४३॥यालागीं नैराश्य दुर्लभतर । साधावया मुनीश्वर । शिणती परंतु दुराशा घोर । न कढी बिढार अंतरींचें ॥४४॥हें ऐकोनि येरी ललना । म्हणती मृगांभा अमृतपाना । साम्य करितां अंतःकरणा । कां शंकाना साध्वी हो ॥५४५॥क उत्सहेत संत्यक्तुमुत्तमश्लोकसंविदम् । अनिच्छतोऽपि यस्य श्रीरंगान्न च्यवते क्कचित् ॥४८॥जैशी दुराशा सांसारिक । मुनिसुरमर्त्यां भवदायक । तैसा नोहे उत्तमश्लोक । हा परमपुरुष परमात्मा ॥४६॥कृष्णसंगाची दुराशा वाढे । तेणें भवभ्रम समूळ मोडे । कृष्णध्यान जैं हृदयीं जडे । तैं अभीष्ट चढे फळ हाता ॥४७॥कृष्णसुखाची एकांतवार्ता । त्यागावयार्थ उत्साह चित्ता । कोण मानी अभाग्य पुरता । निजात्महंता निर्दैव ॥४८॥कृष्ण न इच्छी कमलासंग । परी ते न टकी त्याचें अंग । कोणे काळींही वियोग । न करी अव्यंग सुखवासी ॥४९॥नारदशुकसनकादिक । कंजजहृत्कंजीं पदांक । ध्याती विसरोनि सांसारिक । ललनावेधक तो येथें ॥५५०॥हृदयीं विसर पाडूं त्याचा । सहसा स्मरण न करूं वाचा । अभिलाष न धरूं तत्संगाचा । स्मारकसाचा परि तो कीं ॥५१॥स्मारक होय कवण्या गुणें । उद्धवा कथिती तियें लक्षणें । पूर्वीं रक्षिलीं गोधनें । क्रीडाचरणें तें ऐक ॥५२॥सरिच्छैलवनोद्देशा गावो वेणुरवा इमे । संकर्षनसहायेन कृष्णेनाचरिताः प्रभो ॥४९॥क्रुष्ण स्ववेधें वेधी प्रबळ । वेधें वेधिलें व्रजमंडळ । कोण्हा आंगीं ऐसें बळ । जे तद्वेध शिथिल करावया ॥५३॥कृष्णविस्मृति आम्हां पडती । दुःखनिवृत्ति तेणें घडती । परी तें न घडे स्मृति वाढती । कोणे रीती तें ऐका ॥५४॥तिहीं श्लोकीं स्मृतिवर्धन । श्रीकृष्णाचें लीलाचरण । शुक भूपातें करवी श्रवण । तें व्याख्यान अवधारा ॥५५५॥यमुनाप्रमुख अनेक सरिता । रोधस्वती कां पुलिनवंता । कृष्णक्रीडेसि यथोचिता । आठव चित्ता त्या देती ॥५६॥गोवर्धनप्रमुख अचळ । उपात्तभूमि गंडशैल । रोध सानु शिखरें उपळ । तें क्रीडास्थळ हरि स्मरवी ॥५७॥दरे दरकुट्या गुहा विवरें । प्रस्रवप्रपातजलें निर्झरें । शैलकक्षा द्रुमकोटरें । पाहतां स्मरे हरि हृदयीं ॥५८॥मधुवन तालवन कुमुदवन । बेलभांडीरमुंजाविपिन । क्षुद्रकानन कामोद्यान । बहुळारण्य हरि स्मरवी ॥५९॥कदंबद्रोणी बृहद्वन । कृष्णप्रियतम वृंदाविपिन । व्रजीं केलें जें बाल्याचरण । तें तद्ध्यान उद्बोधी ॥५६०॥तृणावर्त्तप्रपातन । वत्सासुराचें निबर्हण । लीला केलें बकदारण । कृष्णाचरण तें स्मरवी ॥६१॥पादस्पर्शें भंगिला शकट । पूतनेचा भरिला घोंट । अघासुराचा रोधिला कंठ । स्मरे वैकुंठ तद्योगें ॥६२॥यमुनाह्रदीं कालियमथन । केशिअरिष्टप्रलंबहनन । व्योमासुराचें केलें दमन । तें तें कारण हरि स्मरणा ॥६३॥इत्यादि वनोपवनींच्या क्रीडा । गाईगोपाळांमाजिवडां । वेणुवादकां परम सुघडा । माजि पवाडा कृष्णाचा ॥६४॥सप्तस्वरीं तानमानें । आरोहावरोहरागज्ञानें । षाडवऔडवपरिज्ञानें । वेणुवादनें मन मोही ॥५६५॥सवें संकर्षण संवगडा । सुबळ स्तोककृष्ण बोबडा । पेंधा श्रीदामा वडजा वेडा । धामा वांकुडा कृष्णसखे ॥६६॥इत्यादिवयस्यांसमवेत । श्रृंग मोहरी वेत्र धृत । वन्यस्रजाबर्हभूषित । चीर सुपीत कौशेय ॥६७॥ऐसी क्रीडा वनोपवनीं । अवनीं जीवनीं नंदभुवनीं । घोषवीथी कां वृंदावनीं । सशिशु नवनीतादि हरी ॥६८॥प्रभो म्हाणोनि उद्धवासी । सर्वज्ञ समर्थ जाणोनि त्यासी । गोपी संबोधिती संतोषीं । म्हणती क्रीडा ऐसी हरि स्मरवी ॥६९॥देतां घेतां भूषणें लेतां । खातां जेवितां प्राशन करितां । कृष्णक्रीडा आठवे चित्ता । तद्गुणकथा ते स्मरवी ॥५७०॥पुनः पुनः स्मारयंति नंदगोपसुतं बत । श्रीनिकेतैस्तत्पदकैर्विस्मर्तुं नैव शक्नुमः ॥५०॥बत आश्चर्यें पुनः पुन्हा । खेदें म्हणती व्रजांगना । नित्य नूतन देती स्मरणा । क्रीडा नाना कृष्णाच्या ॥७१॥नंदगोपाचा नंदन । दधिदुग्धांचें करी हरण । यशोदे सन्निध बल्लवीगण । करिती येऊन बोभाट ॥७२॥श्रीवत्सचिह्न वक्षस्थळीं । सुरेख कस्तुरी केशर भाळीं । माथां मयूरपिच्छावाळी । श्रवणयुगळीं कर्णिकारें ॥७३॥सालंकृत सविभ्रम । क्रीडामंडित मिरवी धाम । सबाह्य प्रकटे मेघश्याम । विस्मृतिधर्म केंवि घडे ॥७४॥विसरो न शकों कृष्णा । विरहतापें क्षोभे तृष्णा । साहों न शकों वियोगउष्णा । पुसों तत्प्रश्ना गतत्रपा ॥५७५॥ऐकोनि हरीचा वेणुगीत । परिष्वंगा इच्छी चित्त । ऐकें उद्धवा तो वृत्तांत । लीलाइंगित क्रीडेसी ॥७६॥ N/A References : N/A Last Updated : May 08, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP